Kasba by poll election : बंडखोर दाभेकरांची काँग्रसकडून मनधरणी; बाळासाहेब म्हणाले...

Balasaheb Dabhekar : कसब्यात काँग्रेसची डोकेदुखी वाढल्याचं चित्रंं
Sangram Thopte, Balasaheb Dabekar
Sangram Thopte, Balasaheb DabekarSarkarnama

Pune Congress : कसब्यात महाविकास आघाडीतील काँग्रेसकडून रवींद्र धंगेकर यांना उमेदवारी देण्यात आली आहे. त्यानंतर काँग्रेसचे जुने सदस्य असलेले बाळासाहेब दाभेकर यांनी बंडखोरी केली. तसेच त्यांनी मंगळवारी (ता. ७) आपला उमेदवारी अर्जही दाखल केला. दाभेकरांची बंडखोरी महाविकास आघाडीला परवडण्यासारखी नाही. त्यामुळं दाभेकर यांची आता काँग्रेसकडून मनधरणी सुरू करण्यात येत आहे.

बाळासाहेब दाभेकर (Balasaheb Dabhekar) हे महाविकास आघाडीच्या वतीने कसब्यातून निवडणूक लढविण्यासाठी इच्छुक होते. ते गेल्या ४० वर्षांपासून काँग्रेसचे सदस्य म्हणून कार्यरत आहेत. या काळात त्यांनी वारंवार उमेदवारी मागितली, मात्र काही कारणास्तवर त्यांना डावलण्यात आलं. दरम्यान याबाबत त्यांनी पक्षश्रेष्ठींकडे नाराजी व्यक्त करून यावेळेस उमेदवारीची मागणी केली होती.

Sangram Thopte, Balasaheb Dabekar
Balasaheb Thorat News : नाराजी बाजूला ठेऊन थोरात काँग्रेससाठी झटणार; थेट कसब्यात सभा...

कसब्यातील निवडणूक लढविण्यासाठी काँग्रेसमधून अनेक इच्छुक होते. त्या पार्श्वभूमिवर या मतदारसंघाचे निरीक्षक आमदार संग्राम थोपटे (Sangram Thopte) यांनी मुलाखती घेतल्या होत्या. त्यात रवींद्र धंगेकर यांच्यासह बाळासाहेब दाभेकरांचाही समावेश होता. तत्पुर्वी त्यांनी महाविकास आघाडीतील घटक पक्षांचा पाठिंबा असल्याचं वक्तव्य करून उमेदवारीबाबत दावा सांगितला होता.

Sangram Thopte, Balasaheb Dabekar
Kasba By-Election : मुनगंटीवारांच्या वक्तव्यानं संभ्रम वाढला; म्हणाले "शिवसेना दोन भावांची..."

दरम्यान, कसब्यातून काँग्रेसने रवींद्र धंगेकर (Ravindra Dhangekar) यांना उमेदवारी देणार, अशी कुणकुण लागताच दाभेकर यांनी दंड थोपटले. त्यांनी, 'धंगेकर यांना उमेदवारी दिली तर मी बंडखोरी करणार', असा इशारच दिला होता. त्यानंतर काँग्रेसने धंगेकर यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले अन दाभेकरांनी बंडखोरी केली. धंगेकर यांच्यानंतर दाभेकरांनी मंगळवारी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला.

उमेदवारी दाखल केल्यानंतर दाभेकर यांनी काँग्रेसवर टीकाही केली होती. ते म्हणाले होते की, गेल्या ४० वर्षात काँग्रेसने मला काहीही दिले नाही. आताही मागणी करून उमेदवारी दिली नाही. त्यामुळे मी बंडखोरी करून अपक्ष अर्ज भरल्याचे दाभेकरांनी स्पष्ट केले होते.

Sangram Thopte, Balasaheb Dabekar
Pune By-Election : कसबा-चिंचवडसाठी राष्ट्रवादीच्या स्टार प्रचारकांची फौज जाहीर!

आज झालेल्या अर्ज छाननीत दाभेकरांचा अर्ज वैध ठरला असून त्यांची उमेदवारी कायम राहणार आहे. आता शुक्रवारी (ता. १०) अर्ज माघारी घेण्याची शेवटची मुदत आहे. तोपर्यंत दाभेकरांनी आपला अर्ज माघारी घेण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. निरीक्षक आमदार संग्राम थोपटे (Sangram Thopte) यांनी बैठक घेत दाभेकरांना अर्ज माघारी घेण्यासाठी विनंती केली.

निवडणूक निरीक्षक आमदार संग्राम थोपटे आणि काँग्रेस शहराध्यक्ष अरविंद शिंदे (Aravind Shinde) यांच्यासोबत दाभेकर यांची बुधवारी बैठक पार पडली. बैठकीत थोपटे, शिंदे यांनी बाळासाहेब दाभेकर यांच्याशी चर्चा करून मनधरणीचे प्रयत्न केले. यावेळी दाभेकरांनी कार्यकर्त्यांशी बोलून निर्णय घेणार असल्याचे त्यांना सांगितले.

Sangram Thopte, Balasaheb Dabekar
Aam Aadmi Party : `चिंचवड`मध्ये लढण्याआधीच 'आप'ला धक्का; तर ३३ जणांचे अर्ज वैध

बाळासाहेब दाभेकर यांनी कसबा पोट निवडणुकीसाठी अपक्ष उमेदवारी अर्ज भरल्याने काँग्रेसची डोकेदुखी वाढली आहे. तसेच बैठकीनंतर बाळासाहेब दाभेकर अर्ज मागे घेतील, असा विश्वास काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com