Crime News: नगर जिल्ह्यात 400 ते 500 जणांच्या जमावाकडून दोन कुटुंबांवर प्राणघातक हल्ला; 71 जणांवर अॅट्राॅसिटीचा गुन्हा

Gram Panchayat Elections : ग्रामपंचायत निवडणुकीच्या वादावरून हा हल्ला झाल्याचे सांगितले जात आहे.
Crime News
Crime NewsSarkarnama
Published on
Updated on

Ahmednagar News: नगर जिल्ह्यातील निर्मळ पिंप्री गावात 400 ते 500 जणांच्या जमावाने दोन कुटुंबांवर जीवघेणा हल्ला केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या हल्ल्यामागे ग्रामपंचायत निवडणुकीची पार्श्वभूमी असल्याची माहिती सांगण्यात येत आहे. या प्रकरणात तब्बल 71 जणांच्या विरोधात अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल झाला आहे.

या प्रकारानंतर पीडित कुटुंबांनी पोलिस ठाण्याचा आसरा घेतला आहे, तर 400 ते 500 लोकांच्या जमावाने घराची तोडफोड करत जाळपोळ केली असून यांचे मणिपूर करा, असे सांगण्यात येत होते, असा गंभीर आरोप पीडित कुटुंबाने केला आहे. सध्या या गावात तणावाचे वातावरण असून, या ठिकाणी मोठा पोलिस बंदोबस्त (Crime News ) तैनात करण्यात आला आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Crime News
Pratap Dhakane On Rajale: राष्ट्रवादीच्या ढाकणेंनी आमदार राजळेंच्या घराण्याची सत्ताच काढली; म्हणाले...

नेमकं प्रकरण काय ?

गावातील लोकांसोबत काही दिवसांपूर्वी वाद झाला होता, पण त्यानंतर हा वाद सामोपचाराने मिटवण्यात आला होता. मात्र, बुधवारी अचानक मोठा जमाव आला आणि दगडफेक करत शेड पाडले. घरावर दगडफेक केली. यानंतर घरासमोरील गाडीचीही तोडफोड करत नुकसान केले. मात्र, यानंतर घटनास्थळी पोलिस आल्यामुळे आमचा जीव वाचला. पोलिस आल्यानंतर त्यांनी जमावाला पांगवले, असं दाखल फिर्यादीत म्हटलं आहे.

दरम्यान, या हल्ल्यामागे काही दिवसांपूर्वी झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीची पार्श्वभूमी असल्याचं बोललं जात आहे. त्यामुळे आता या संपूर्ण प्रकरणाची पोलिस कसून चौकशी करणार आहेत. सध्या 71 जणांविरोधात अॅट्रॉसिटीचा गुन्हा (FRI) दाखल झाला असून, पोलिसांनी आरोपींचा शोध सुरू केला आहे.

(Edited by- Ganesh Thombare)

Crime News
Nagar News : भाजपचे आमदार आणि शरद पवार गटाचे सरचिटणीस यांच्यात 'कलगीतुरा'...

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com