Pratap Dhakane On Rajale: राष्ट्रवादीच्या ढाकणेंनी आमदार राजळेंच्या घराण्याची सत्ताच काढली; म्हणाले...

Pratap Dhakane VS Monika Rajale: पाथर्डीत राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपमध्ये राजकारण तापलं.
Pratap Dhakane and Monika Rajale
Pratap Dhakane and Monika RajaleSarkarnama
Published on
Updated on

Ahmednagar News: राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार गट) प्रदेश सरचिटणीस अ‍ॅड. प्रताप ढाकणे यांनी भाजप आमदार मोनिका राजळे यांचा नामोल्लेख टाळून टीका केली आहे. पाथर्डी तालुक्यातील राजकारण गेल्या 20 ते 25 वर्षांपासून एका घराण्याभोवती सुरू आहे. तरी देखील या तालुक्यात एकही भरीव काम झालेले नाही. साधा पाण्याचा प्रश्न देखील सोडवता आला नाही. या लोकप्रतिनिधीच्या काळात एक जरी तलाव तालुक्यात निर्माण झाला असल्यास राजकारण सोडून देवू, असे म्हणत प्रतापराव ढाकणे यांनी राजळे घराण्याची सत्ताच काढली.

पाथर्डी तालुक्यातील बीड राज्य महामार्गावर टाकळीमानूर ते करोडी या रस्त्याचे काम सुरू करावे आणि महावितरणचा असलेला गालथान कारभार सुधारावा, या प्रमुख मागण्यासाठी अ‍ॅड. प्रताप ढाकणे यांच्या नेतृत्वाखाली हा रस्ता रोको करण्यात आला. यावेळी ढाकणे यांनी राजळे कुटुंबावर सरसंधान साधले.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Pratap Dhakane and Monika Rajale
Latur News : मध्य गोदावरी खोऱ्यातील लातूरच्या हक्काचे पाणी मांजरा धरणात सोडा !

बाजार समितीचे माजी सभापती गहिनाथ शिरसाट यांच्या नियोजनातून झालेले रस्ता रोको आंदोलनासाठी राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष शिवशंकर राजळे, शिवसेना ठाकरे गटाचे तालुकाप्रमुख भगवान दराडे, शिंदे गटाचे तालुकाप्रमुख विष्णूपंत ढाकणे, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष नासीर शेख, पांडुरंग शिरसाट, डॉ.राजेंद्र खेडकर उपस्थित होते.

ढाकणे म्हणाले, "अलीकडच्या काळात या लोकप्रतिनिधींचे काय काम, असा सवाल करत ज्या कामामुळे पिढ्यानपिढ्या लोकांचे कल्याण होईल, असे कोणतेही काम दाखवा. मी राजकारण सोडून देतो. प्रताप ढाकणे हे नाव दिल्लीपर्यंत पोहोचण्यासाठी ह्याच परिसरातील टाकळीमानूर भागाने मोठी मदत केली. त्यामुळे मला हा परिसर विसरता येणार नाही".

"या भागातील जेवढे तलाव असतील, तसेच रस्ते हे (कै.) बबनराव ढाकणे यांनी त्यांच्या काळात निर्माण केले, एवढेच नाही, तर या तालुक्याला 1968 साली प्रथम वीज आणण्याचे काम केले. मोठमोठी तलावं, पाण्याची प्रकल्प तयार करून पाणी साठवण्यासाठी भरीव काम बबनराव ढाकणे यांनी केल्यामुळेच पाऊस पडल्यानंतर या भागात पाण्याचा प्रश्न उद्भवत नाही",असे अ‍ॅड.प्रताप ढाकणे म्हणाले.

"महत्त्वपूर्ण निर्णायक कामे बबनराव ढाकणे यांच्या काळात झाली, ती आत्ताच्या काळात नाही. ज्या कुटुंबाने पंचवीस वर्ष सत्ता भोगली. मात्र, त्यांना लोकांचे कायमस्वरूपीचा प्रश्न सोडवता आले नाही", असा आरोप देखील प्रताप ढाकणे यांनी केला.

(Edited by- Ganesh Thombare)

Pratap Dhakane and Monika Rajale
Prajakt Tanpure : 'हर घर जल' या योजनेविषयी तक्रारींचा पाढा; आमदार तनपुरेंनी अधिकाऱ्यांना घेतले फैलावर

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com