Nashik Teacher Constituency : नाशिक शिक्षकसाठी नगरमध्ये 20 केंद्र; चार तालुक्यात सर्वाधिक मतदार

Nashik Teacher Vidhan Parishad Constituency Election : नगर जिल्ह्यातील प्रत्येक मतदान केंद्रावर केंद्राध्यक्षासह दोन सहायक मतदान केंद्र अधिकारी असणार आहेत. फिरत्या पथकासह एक व्हिडिओ ग्राफर, व्हिडिओ निरीक्षक आणि दोन पोलिसांचा समावेश असणार आहे.
darade kolhe gulave
darade kolhe gulavesarkarnama
Published on
Updated on

Ahmednagar News : नाशिक शिक्षक विधान परिषदेच्या निवडणुकीच्या मतदानासाठी नगर जिल्हा प्रशासन सज्ज झालं आहे. नगर जिल्ह्यात 17 हजार 441 मतदार असून, नगर, संगमनेर, राहाता आणि कोपरगाव या चार तालुक्यात सर्वाधिक मतदार नोंदवले गेले आहेत. मतदानासाठी 20 केंद्र तयार करण्यात आली आहे. संगमनेरमध्ये सर्वाधिक तीन मतदान केंद्र आहे.

नाशिक शिक्षक विधान परिषदेच्या निवडणुकीच्या रिंगणात शिवसेना (Shiv Sena) उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष, शिवसेना एकनाथ शिंदे गट, समता पक्षाचे उमेदवार रिंगणात आहेत. गर जिल्हा प्रशासन या विधान परिषद निवडणुकीसाठी (Election) सज्ज झाले असून, मतदान केंद्राध्यक्षांसह सूक्ष्म निरीक्षक, सहायक निरीक्षक आणि फिरत्या पथकांची नियुक्ती करण्यात आली आहे. शिक्षक विधान परिषद मतदारसंघात नाशिक , नगर, जळगाव, धुळे आणि नंदुरबार या पाच जिल्ह्यांचा समावेश आहे. एकूण 63 हजार 802 मतदार आहेत. यात नाशिक जिल्ह्यात 23 हजार 587, धुळ्यात 8 हजार 88, जळगावमध्ये 13 हजार 56, नंदुरबारमध्ये 5 हजार 419 आणि नगर जिल्ह्यात 17 हजार 441 मतदार आहेत.

नगर जिल्हा शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी 20 मतदान केंद्र असून, त्यात संगमनेर आणि नगर तालुक्यात प्रत्येकी ३ मतदान केंद्र आहेत. राहाता आणि कोपरगावमध्ये दोन मतदान केंद्र आहेत. उर्वरीत तालुक्यामध्ये प्रत्येकी एक मतदान केंद्र असणार आहे. मतदान मतपत्रिकेवर असणार आहे. उमेदवारांसमोर पसंतीक्रमांक नोंदवायचा आहे. प्रत्येक मतदान केंद्रावर केंद्राध्यक्षासह दोन सहायक मतदान केंद्र अधिकारी असणार आहेत. फिरत्या पथकासह एक व्हिडिओ ग्राफर, व्हिडिओ निरीक्षक आणि दोन पोलिसांचा समावेश असणार आहे.

darade kolhe gulave
Rajendra Vikhe : राजेंद्र विखेंची पोस्ट चर्चेत; 'शतरंज का शौकीन नहीं था, इसलिए धोखा खा गया...'

नगर जिल्ह्यातील तालुकानिहाय मतदार आणि मतदान केंद्र

अकोले 1010(1), संगमनेर 2409(3), राहाता 2107(2), कोपरगाव 2176 (2), श्रीरामपूर 1009 (1), नेवासा 1110 (1), शेवगाव 893 (1), पाथर्डी 938 (1), पारनेर 702 (1), नगर 2233 (3), श्रीगोंदा 899 (1), कर्जत 836 (1), जामखेड 335 (1).

darade kolhe gulave
Vivek Kolhe : विवेक कोल्हेंना घेरण्याचा डाव; शैक्षणिक व सहकारी संस्थांवरील छाप्यात काय सापडलं...

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com