Ahmednagar News : CM शिंदे, फडणवीसांंकडून गेल्यावर्षी नगरच्या नामांतराची घोषणा; यंदाच्या सोहळ्याकडे लक्ष

Ahmednagar Becomes Ahilya Nagar : गेल्यावर्षी जयंतीला नगर जिल्ह्याच्या नामांतराची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी करत अहिल्यानगर केल्याची घोषणा केली होती.
Ahmednagar News
Ahmednagar NewsSarkarnama
Published on
Updated on

Ahmednagar News : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जयंती उत्सवाला जामखेडमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, केंद्रीय मंत्री रामदास आठवले, पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, माजी मंत्री पंकजा मुंडे, महादेव जानकर उपस्थित राहणार असल्याची माहिती आमदार राम शिंदे यांनी दिली.

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या 299 व्या जयंती सोहळा शुक्रवारी (ता. 31) श्रीक्षेत्र चौंडी (ता.जामखेड) येथे आयोजित केला आहे. या सोहळ्याला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार उपस्थित राहणार असल्याची माहिती आमदार प्रा.राम शिंदे यांनी दिली.

Ahmednagar News
Hit And Run Case : पुण्यानंतर फडणवीसांच्या नागपुरात हिट अ‍ॅन्ड रन केस; मद्यधुंद कारचालकाने तिघांना उडवलं

गेल्यावर्षी जयंतीला नगर जिल्ह्याच्या नामांतराची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी करत अहिल्यानगर केल्याची घोषणा केली होती. लोकसभेच्या निवडणुकीनंतर होत असलेल्या या जयंती सोहळ्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काय घोषणा करतात याकडे आता लक्ष लागले आहे.

या सोहळ्याला केंद्रीय मंत्री रामदास आठवले, पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, माजी मंत्री पंकजा मुंडे, महादेव जानकर उपस्थित राहणार आहेत. यावेळी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे चौंडी जन्मस्थळ आहे. दरवर्षी या ठिकाणी 31 मे रोजी जयंती उत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. गेल्या काही वर्षांपासून विविध विकास कामांमुळे चौंडीला विशेष महत्व प्राप्त झाले आहे. दरवर्षी जयंती उत्सवाला धनगर बांधव मोठ्या संख्येने उपस्थित राहत असतात. यंदाच्या जयंती सोहळ्यापासून त्रिशतकीय जयंती उत्सवास प्रारंभ होत असल्याने यंदाच्या कार्यक्रम विशेष असणार आहे.

या जयंती उत्सवाला नगर जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींसह राज्यभरातील प्रमुख नेत्यांना आमंत्रित करण्यात आले आहे. गेल्या वर्षी जयंती सोहळा विशेष झाला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नगर जिल्ह्याचे नामांतर अहिल्यानगर करणार असल्याची घोषणा केली होती. या घोषणेनंतर राज्य मंत्रिमंडळात तसा ठराव मंजूर करण्यात आला. हा ठराव आता केंद्र सरकारकडे पाठवण्यात आला आहे. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांची नगरमध्ये सात मे रोजी सभा झाली होती. या सभेत देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नगरचा उल्लेख अहिल्यानगर, असा केला होता.

देशात तिसऱ्यांदा पंतप्रधानपदी नरेंद्र मोदी विराजमान झाल्यावर नगरच्या नामांतराचा ठराव केंद्र मंजूर करेल, आणि अहिल्यानगर नावावर शिक्कामोर्तब होईल, अशी आशा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी व्यक्त केली होती. त्यामुळे आता होत असलेल्या या जयंती सोहळ्याकडे नगर जिल्ह्यासह राज्यभरातील धनगर बांधवांचे लक्ष लागले आहे.

तसेच लोकसभा निवडणुकीनंतर राज्यात विधानसभा महानगरपालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका होत आहेत. या निवडणुकीच्या अनुषंगाने जयंती सोहळ्याच्या व्यासपीठावरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काय विचार मांडतात आणि काय घोषणा करतात याकडे आता लक्ष लागले आहे.

(Edited By Deepak Kulkarni)

Ahmednagar News
Anandrao Adsul Statement : शिंदे गटाचा नेताच म्हणतो; 'लोकसभेला 'महायुती' नव्हे तर 'मविआ'ने आघाडी घेतली...

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com