Ahmednagar Political News : लंकेंच्या कार्यक्रमात विवेक कोल्हेंचा पारा चढला; विखेंचं टेन्शन वाढलं...

BJP Political News : नीलेश लंके प्रतिष्ठानतर्फे आयोजित शिवपुत्र संभाजी महानाट्याच्या तिसऱ्या दिवशी महाविकास आघाडीच्या नेत्यांची हजेरी.
Vivek Kolhe, Radhakrishna Vikhe
Vivek Kolhe, Radhakrishna VikheSarkarnama
Published on
Updated on

Ahmednagar News : शिर्डी येथे भाजपचे युवा नेते, जिल्हा सहकारी बॅंकेचे संचालक विवेक कोल्हे यांनी मोर्चा काढून जिल्हा नियोजन समितीच्या विकास निधी वाटपावरून पालकमंत्री राधाकृष्ण विखे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आशुतोष काळे यांच्यावर निशाणा साधला होता.

यावर मंत्री विखे यांनी कोण मोर्चा काढतोय, यामध्ये मी लक्ष घालत नाही, अशा शब्दांत सुनावले होते. (Ahmednagar Political News) यावरून कोल्हे यांनी पुन्हा काही तासांतच मंत्री विखे यांचे नाव न घेता त्यांच्यावर पलटवार केला आहे. हे करताना कोल्हे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार नीलेश लंके प्रतिष्ठानच्या व्यासपीठावरून या वेळी टायमिंग साधले. 

विवेक कोल्हे (Vivek Kolhe) यांनी दोन दिवसांपू्वी शिर्डी येथील अपर जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा नेत राहाता आणि कोपरगाव तालुक्यांतील ग्रामपंचायतींना जिल्हा नियोजन समितीच्या विकास निधी वाटपात दुजाभाव करत असल्याचा आरोप केला.

विवेक कोल्हे यांनी या मोर्चातून मंत्री विखे (Radhakrishna Vikhe) आणि आमदार काळे (Ashutosh Kale) यांच्यावर टीकेची झोड उठवली होती. यावर मंत्री विखे हे नगरमध्ये दौऱ्यावर आले असता त्यांना माध्यमांनी विचारले असता, 'मी अशा मोर्चाकडे लक्ष देत नाही', असे म्हणत दुर्लक्ष केले.

Vivek Kolhe, Radhakrishna Vikhe
Ramdas Athawale : 'रिपाइं'तील गटबाजी उफाळली; जिल्हाध्यक्ष नियुक्तीचा वाद, रामदास आठवले घेणार 'अ‍ॅक्शन'

मंत्री विखे यांच्या या प्रतिक्रियेवर विवेक कोल्हे यांनी अवघ्या काही तासांतच पलटवार केला. यासाठी विवेक कोल्हे यांनी नीलेश लंके (Nilesh Lanke) प्रतिष्ठानच्या व्यासपीठावरून टायमिंग साधला. विवेक कोल्हे यांनी मंत्री विखे यांचे नाव न घेता घणाघाती टीका केली.

कोल्हे म्हणाले, "नीलेश लंके यांनी अनेकांचे राजकीय नाट्य थोपवले आहे. नगर दक्षिणेत त्यांच्या माध्यमातून सुराज्य घडो. त्यांच्याकडून देशाबरोबर नगर दक्षिणची सेवा घडावी. नीलेश लंके हे डॉक्टर नीलेश लंके झालेले आहेत. ते माणसांचे डॉक्टर नसले, तरी ते चांगले-चांगले राजकीय आजार बरे करू शकतात. नगर जिल्ह्याला लागलेला कॅन्सर हे नीलेश लंकेच दूर करू शकतात".

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

महायुतीच्या बैठकीत हे गणित सुटणार?

नीलेश लंके प्रतिष्ठान आयोजित 'शिवपुत्र संभाजी' या महानाट्याच्या तिसऱ्या दिवसाच्या प्रयोगाला, व्यासपीठावर महाविकास आघाडीच्या (Mahavikas Aghadi) नेत्यांची सर्वाधिक गर्दी दिसली. नीलेश लंके हे महायुतीत आहेत. परंतु, लोकसभा निवडणुकीपूर्वी (Lok Sabha Election) महानाट्याचा कार्यक्रम नगर शहरात घेऊन 'नगर दक्षिण'ची सर्व राजकीय गणितं फिरवली आहेत.

ही राजकीय गणिते सोडवण्यासाठी महायुतीची पाच आणि सहा मार्चला होत असलेल्या बैठकीकडे भाजपच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांचे लागले आहे. 'शिवपुत्र संभाजी' महानाट्याच्या तिसऱ्या दिवशीच्या प्रयोगाला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे नेते प्रतापराव ढाकणे, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे बाळासाहेब बोराटे यांच्यासह जुने शिवसैनिक उपस्थित होते.

R

Vivek Kolhe, Radhakrishna Vikhe
MLA Nilesh Lanke : आमदार नीलेश लंके, 'शिवपुत्र संभाजी' महानाट्य अन् चौकशीची चर्चा

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com