Gram Panchayat Strike: राज्यभरातील गाव कारभार ठप्प; ग्रामसेवक, सरपंचाचं तीन दिवस कामबंद आंदोलन

Gram Sevak Strike : आजपासून पुढील तीन दिवस ग्रामपंचायतींचे कामकाज ठप्प राहणार
Gram Panchayat Strike
Gram Panchayat StrikeSarkarnama
Published on
Updated on

Ahmednagar News: प्रलंबित मागण्यांकडे राज्य सरकारचे लक्ष वेधण्यासाठी सरपंच व ग्रामसेवक संघटनेने तीन दिवस कामकाज बंद आंदोलनाचे हत्यार उपसले आहे. आजपासून पुढील तीन दिवस ग्रामपंचायतींचे कामकाज ठप्प राहणार आहे. राज्यपातळीवर ग्रामपंचायत कार्यालये बंद राहणार असून नगरमध्येही सर्व ग्रामसेवक आंदोलनात सहभागी होत एकही काम करणार नाहीत, अशी माहिती ग्रामसेवक संघटनेचे नेते एकनाथ ढाकणे यांनी दिली आहे.

एकनाथ ढाकणे यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा ग्रामसेवक संघटनेची ऑनलाईन बैठक झाली. या बैठकीत तीन दिवसीय बंदचा निर्णय घेण्यात आला. सरपंच संघटना, ग्रामसेवक संघटनांनी आक्रमक भूमिका घेत गाव पातळीवरील कर्मचारी, पदाधिकाऱ्यांच्या न्याय प्रश्नांची सोडवणूक होण्याकरता राज्य सरकारचे लक्ष वेधण्याकरता तीन दिवस कामकाज बंद ठेवण्याचा निर्णय राज्य स्तरावरावर घेण्यात आला आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Gram Panchayat Strike
Karjat Jamkhed MIDC : राम शिंदेंच ठरलं, रोहित पवारांवर कुरघोडीसाठी...

या बंद काळात ग्रामसेवक कोणत्याही प्रकारच्या बैठकीला हजर राहणार नाहीत. सरपंच संघटना, ग्रामपंचायत कर्मचारी संघटना, संगणक परिचालक संघटना, ग्राम रोजगार सेवक संघटना आणि ग्रामसेवक संघटना या काम बंद आंदोलनात सहभागी झाल्याने गाव कारभार ठप्प होणार आहे. नियमित कामकाज करीत असताना अतिरिक्त कामाचा प्रचंड ताण प्रामुख्याने ग्रामसेवकांवर येत आहे. तो ताण कमी झाला पाहिजे.

ज्या ज्या विभागाचे कामे आहेत, त्या त्या विभागांनी केली पाहिजेत. परंतु जिल्हा प्रशासन ग्रामसेवकांना सक्ती करत आहेत. या सक्तीमुळे ग्रामसेवक तणावात असून मानसिक त्रास होत आहे. ग्रामसेवकांच्या वेतन त्रुटी प्रश्नाकडे सातत्याने सरकारचे दुर्लक्ष होत आहे. एक गाव एक ग्रामसेवक पद निर्मिती होत नाही.

विस्तार अधिकाऱ्यांच्या जागांमध्ये वाढ होत नाही. यासह अनेक प्रश्न तातडीने मार्गी लावण्यासाठी सरकारकडे अनेक वेळा पत्रव्यवहार करण्यात आला आहे. परंतु त्यावर काहीच कार्यवाही होत नसल्याने राज्यात 22 हजार ग्रामसेवक, 27 हजार 536 ग्रामपंचायतींचे कामकाज तीन दिवस बंद ठेवून असंतोष व्यक्त करणार आहेत,अशी माहिती एकनाथ ढाकणे यांनी दिली.

(Edited by- Ganesh Thombare)

Gram Panchayat Strike
Bhaskar Jadhav News : 'अण्णांना माझा सलाम..!' ; का म्हणाले भास्कर जाधव असे...

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com