Ahmednagar Politics : शरद पवार गटात प्रवेश करणार का? वैभव पिचड यांनी दिलं स्पष्टीकरण; म्हणाले, "पवारांची भेट..."

Ahmednagar Politics Vaibhav Pichad On Sharad Pawar Meeting: शुक्रवारी (ता. 19 जुलै) रोजी अकोला येथे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार यांची मधुकर पिचड आणि वैभव पिचड हे भेट घेणार असल्याचंही बोललं जात होतं. मात्र या सर्व चर्चांना वैभव पिचड यांनी पूर्णविराम दिला आहे.
Sharad Pawar, Vaibhav Pichad, Madhukar Pichad
Sharad Pawar, Vaibhav Pichad, Madhukar PichadSarkarnama
Published on
Updated on

Ahmednagar News, 19 July : अहमदनगर जिल्ह्यातील भाजप नेते मधुकर पिचड आणि वैभव पिचड हे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार (NCP) पक्षात प्रवेश करणार असल्याच्या चर्चा मागील काही दिवसांपासून सुरु आहेत. शिवाय आज शुक्रवारी (ता. 19 जुलै) रोजी अकोला येथे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार यांची मधुकर पिचड आणि वैभव पिचड हे भेट घेणार असल्याचंही बोललं जात होतं.

मात्र या सर्व चर्चांना वैभव पिचड (Vaibhav Pichad) यांनी पूर्णविराम दिला आहे. आम्ही शरद पवार गटात प्रवेश करणार या अफवा असून आम्ही भाजपमध्येच राहणार असल्याचं वैभव पिचड यांनी स्पष्ट केलं आहे.

आज अहमदनगर जिल्ह्यात होणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचा भव्य मेळाव्याला गर्दी व्हावी यासाठी विरोधकांनी ही अफवा पसरवल्याचा दावा देखील वैभव पिचड (Vaibhav Pichad) यांनी केला. तसंच आपण शरद पवारांची (Sharad Pawar) भेट घेतली नसल्याचंही त्यांनी सांगितलं. माध्यमांशी बोलताना ते म्हणाले, "गेल्या तीन दिवस मी पूर्णपणे मतदारसंघात वेगवेगळ्या कार्यक्रमाच्या निमित्ताने फिरत आहे.

तसंच मी विधान परिषदेच्या निवडणुकीच्या आदल्या दिवशी मुंबईत एका बैठकीसाठी गेलो होतो. राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrishna Vikhe Patil) साहेब यांच्याकडे जाऊन मतदारसंघातील कामासंदर्भात चर्चा केली. मी मतदारसंघातच आहे. कुठेही बाहेर गेलेलो नाही. कोणाची भेट घेतली नाही. या चर्चा कुठून येतात हे मला माहिती नाहीत."

Sharad Pawar, Vaibhav Pichad, Madhukar Pichad
BJP News: आजार एक अन् उपचार मात्र दुसरेच...! भाजप आणखी किती गाफील राहणार

सध्या लोक शेताच्या कामात आहेत त्यामुळे विरोधकांच्या कार्यक्रमाला गर्दी जमणार नाही हे माहिती असल्यामुळे कार्यक्रमला लोकांनी यावं यासाठी तिथे पिचड साहेब येणार असल्याचं सांगून गर्दी जमवण्यासाठी समोरच्या लोकांनी अफवा पसवरल्याचंही पिचड म्हणाले.

Sharad Pawar, Vaibhav Pichad, Madhukar Pichad
Assembly Election 2024 : विधानसभेची सापशिडी, युतीचे गांगरलेले गडी अन् आघाडीचे खेळाडू मुडी!

यावेळी त्यांनी आपण भारतीय जनता पक्ष सोडणार नसल्याचंही वैभव पिचड यांनी यावेळी स्पष्ट केलं. ते म्हणाले, "काही मंडळी चर्चेत राहण्यासाठी नको त्या चर्चा करतात. तिकिटाबाबत राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आणि भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी विश्वास दिला आहे. या मतदारसंघावर अन्याय होऊ देणार नाही, असं त्यांनी सांगितलं आहे. आमचा त्यांच्यावर विश्वास आहे. तसंच आम्ही भाजपमध्ये रुळलो आहे. त्यामुळे भाजप सोडून कुठेही जाणार नाही." असं स्पष्टीकरण वेभव पिचड यांनी दिलं आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com