Rohit Pawar Vs Ram Shinde : पेपर लोकसभेचा; पण रोहित पवार अन् राम शिंदेंची तयारी विधानसभेची

Loksabha Election : सुजय विखेंना उमेदवारी दिली तर राम शिंदेंची भूमिका काय असणार?
Rohit Pawar, Ram Shinde
Rohit Pawar, Ram ShindeSarkarnama
Published on
Updated on

Ahmednagar Political News : आमदार रोहित पवारांनी लोकसभा नाही तर कर्जत-जामखेडमधून विधानसभा लढवणार असल्याचे स्पष्ट केले आहे, तसेच भाजपच्याविरोधात तगडा उमेदवार निश्चित करून त्याला निवडून आणण्यासाठी सर्वतोपरी राजकीय ताकद लावणार असल्याचेही पवारांनी सांगितले, तर दुसरीकडे सुजय विखे आणि राम शिंदेंचे राजकीय वैर सर्वश्रुत आहे.

पक्षाने संधी दिल्यास लोकसभा निवडणूक लढण्यासाठी इच्छुक असल्याचे आमदार प्रा. राम शिंदेंनीही जाहीर केले आहे. मात्र राज्यात ४५ प्लसचा नारा असल्याने सीटिंग उमेदवारांना संधी मिळू शकते. परिणामी लोकसभा निवडणुकीच्या माध्यमातून आमदार पवार आणि शिंदेंची पुन्हा एकदा कर्जत-जामखेडसाठी राजकीय ताकदीची परीक्षा पाहावयास मिळणार आहे.

Rohit Pawar, Ram Shinde
Jitendra Awhad : राम मांसाहारी म्हणणाऱ्या आव्हाडांना घरचा आहेर; रामाच्या झेंड्यांनी कळवा भगवामय

कर्जत-जामखेड मतदारसंघात राजकीय अथवा सामाजिक कोणत्याही कार्यक्रमात रोहित पवार (Rohit Pawar) आणि राम शिंदे एकमेकांवर टीका-टिप्पणी करताना दिसत आहेत. कधी-कधी बोलण्याची भाषा तर एकेरीवरदेखील जाते. मतदारसंघात आपणच खमके आणि तगडे उमेदवार असल्याचे दोघांच्या बोलण्यातून सध्या जाणवते.

विधानसभेला अवकाश आहे. पण त्याआधी या दोघांना लोकसभेत आपल्याच पक्षाचा खासदार कसा निवडून येईल, याकडे लक्ष द्यावे लागणार आहे. परीक्षा खासदारकीची असली तरी मतदारसंघावर कोणाची छाप आहे ? यासाठी आमदारकीचा पेपर पवार आणि शिंदेंना सोडवावा लागणार आहे. दरम्यान, दक्षिण नगरमधून लोकसभेला उमेदवार कोण, यापेक्षा कर्जत-जामखेडवर पकड कोणाची, याची कसोटी रंगल्याचे दिसून येत आहे.

Rohit Pawar, Ram Shinde
AJit Pawar News : अजित पवारांच्या हाती 'धनुष्यबाण' ; निशाणा कुणावर?

सत्ताबदलानंतर आणि मागील वर्षी राष्ट्रवादीचे अजित पवार (Ajit pawar) यांनी महायुतीत सामील झाल्यानंतर स्थानिक पातळीवरदेखील राजकीय उलथापालथ घडत आहे. स्थानिक नेत्यांपैकी कोणीच समोर येत नाही. पण त्यांना लोकप्रतिनिधींकडून आलेल्या अनुभवाची परतफेड करण्यास अनेकजण सरसावले आहेत.

सत्तेसाठी किंवा सत्ताबदलानंतर आयाराम-गयाराम, निष्ठावान आणि तळ्यात-मळ्यातील नेते-कार्यकर्ते काय करतील, याची शाश्वती कोणच देऊ शकत नाही. ते मात्र एखाद्याचे विजयाचे गणित नक्की बिघडून टाकतील, अशी चर्चा कर्जत-जामखेडमध्ये आहे. त्यामुळे लोकसभेला उमेदवार कोण राहील, हे मतदारसंघात सांगता येत नसले तरी आपला मतदारसंघ कोणाच्या ताब्यात द्यायचा, याची छुपी रणनीती सुरू असल्याचे पाहावयास मिळत आहे.

Rohit Pawar, Ram Shinde
NCP Ajit Pawar : अजित पवार गटाचं मुंबईत शक्तिप्रदर्शन; भुजबळांचं मोठं विधान, शिंदे गटाला डिवचलं

रोहित पवारांची आक्रमक भूमिका

उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या बंडानंतर आमदार रोहित पवारांनी आक्रमक भूमिका घेतल्याचे दिसून येत आहे. ते सत्ताधाऱ्यांच्या चुकीच्या प्रश्नावर आणि निर्णयावर उघडपणे प्रतिक्रिया देत अंगावर घेत आहेत. कर्जत-जामखेडवर आपलीच पकड आहे, हे सिद्ध करताना पवार पूर्ण ताकदीने लोकसभेच्या प्रचारात उतरणार असल्याचे दिसून येत आहे. मतदारसंघातील राम शिंदेंवर नाराज भाजपाला आपल्यासोबत घेत पवारांनी विजयाचे समीकरण आखण्याची शक्यता असेल.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

राम शिंदेंपुढे पर्यायच नसेल...

मागील विधानसभेला आमदार राम शिंदेंनी, खासदार विखेंसह प्रवरेच्या यंत्रणेवर पूर्ण विश्वास टाकला होता. मात्र विश्वासघात झाल्याचा त्यांनी उघडपणे आरोप केले होते. तसेच नगर जिल्ह्यातील भाजपा पराभूत उमेदवारांची मोट बांधत विखे पक्षविरोधी कारवाई करीत असल्याची तक्रारही राम शिंदे (Ram Shinde) यांनी वरिष्ठांकडे केली होती. आता तर शिंदेंनी लोकसभेसाठी इच्छुकच असल्याचे सांगत विखे कुटुंबास उघड आव्हानच दिले होते. मात्र मिशन ४५ नुसार सुजय विखेंना संधी दिली तरी राम शिंदे त्यांचे कामच करतील का ? असा सवालही उपस्थित होत आहे. त्यात आमदार नीलेश लंके आणि त्यांची मैत्री जिल्ह्यात सर्वश्रुत आहे.

(Edited by Sunil Dhumal)

R...

Rohit Pawar, Ram Shinde
Ajit Pawar CM News : ‘एकच वादा, भावी मुख्यमंत्री अजितदादा’; राष्ट्रवादीच्या महिला मेळाव्यात घुमला नारा

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com