
नाशिक: देशाच्या (India) संविधानाने प्रत्येकास आपल्या आवडीनिवडीनुसार जीवन जगण्याचा अधिकार दिला आहे. कोणी कोणाशी विवाह करावा. हा त्यांचा अधिकार आहे. त्यानुसार त्यांना विवाह करू दिला पाहिजे. कुणी कुणावर प्रेम करत असेल तर याचा तुम्हाला त्रास कशाला हवा., असे परखड मत एमआयएम (AIMIM) पक्षाचे अध्यक्ष असोद्दीन ओवेसी (Asaduddin Owaisi) यांनी आज येथे व्यक्त केले. (Asaduddin Owaisi questioned, if some one love with somebody why other burnout)
एका विवाह समारंभासाठी ओवेसी शहरात आले होते. यावेळी कार्यकर्ते, समर्थक तसेच नगारिकांनी त्यांचे स्वागत केले. यावेळी खासदार ओवेसी यांनी माध्यमांशी संवाद साधला. भाजपकडून सुरु असलेल्या राजकारणावर त्यांनी आक्षेप घेतला.
वडाळा नाका येथील हॉटेलमध्ये मुक्कामी होते. बुधवार (ता.५) सकाळी परतीच्या मार्गावर असताना पत्रकारांशी केलेल्या चर्चेत त्यांनी विविध प्रश्नांवर मत मांडले. राज्यात लव जिहाद कायदासंदर्भात मोर्चे निघतायेत यावर त्यांनी बोलताना सांगितले. जेथे जेथे भाजप सरकार आहे, त्याठिकाणी जातीपातीचे राजकारण करण्यात येऊन बेकायदेशीररीत्या लव जिहाद कायदा करण्यात आला आहे.
लव जिहाद करणाऱ्या भाजपमध्ये अशी किती लोक आहेत की त्यांनी अशाप्रकारचे लग्न केले आहे. प्रत्येक प्रश्नात जातिवाद करणे सोडा. आपल्याकडे महागाई, बेरोजगारी असे एक ना अनेक प्रश्न आहे. त्याकडे लक्ष द्यावे. राज्यातील विविध नेत्यांच्या वक्तव्यांसदर्भात विचारले असता त्यांनी त्यांनाच प्रश्न विचारावे, असे सांगता प्रतिक्रिया देणे टाळले. नामांतरासंदर्भात बोलताना ते म्हणाले की सर्वसमान्य जनता महागाईत होरपळत त्यांच्या मूलभूत समस्या सुटत नाही त्यावर लक्ष द्यावे.
हा त्यांचा प्रश्न
आगामी निवडणुका संदर्भात प्रकाश आंबेडकर उद्धव ठाकरे यांच्यासह युती करणार आहेत. याबाबत विचारलेला प्रश्नांना उत्तर देताना त्यांनी सांगितले. युती करण्याबाबतचा तो त्यांचा प्रश्न आहे. आम्ही बाळासाहेबांचा पूर्वीही आदर करत होतो. आजही आदर करत आहे आणि उद्याही आदर करत राहणार. वंचित समाजास न्याय देण्याचा प्रयत्न आमचा होता. त्यांच्याबरोबर आमची युती तुटणे यामागे मोठे कारण आहे. ते आता घाईघाईत सांगणे शक्य होणार नाही. दरम्यान, त्यांनी शहरातील पदाधिकाऱ्यांशी भेटी दरम्यान संवाद साधला. यावेळी शहरातील वरिष्ठ नेता जावेद मुंशी, मुख्तार शेख़, रमझान पठाण, फरीद शेख, मोहसीन शाह, अकीब शेख, सलीम शेख, सैफ सय्यद आदी उपस्थित होते.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.