
Jalgaon News : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या बनावट स्वाक्षरीचा वापर करत मंत्रालयात नोकरी देण्याचे आमिष दाखवून चाळीसगावमधील एका युवतीची फसवणूक झाल्याचा खळबळजनक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणात चाळीसगाव तालुक्यातील तिघांविरोधात फसवणुकीचा गुन्हा नोंदवण्यात आला असून, पोलीस तपास सुरु आहे."
चाळीसगाव तालुक्यातील सायगाव गावातील एका युवतीला मंत्रालयात लिपिक पदावर नियुक्ती मिळवून देण्याचे आमिष दाखवण्यात आले होते. तिला देण्यात आलेले जॉइनिंग लेटर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नावाने बनावट लेटरहेडवर आणि नकली स्वाक्षरीसह तयार करण्यात आले होते, ज्यामुळे ते खरे असल्याचा भास निर्माण झाला. मात्र, मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयातील अधिकृत प्रक्रियेनुसार अशा प्रकारच्या नियुक्ती पत्रांवर विभागप्रमुख किंवा सचिवांची स्वाक्षरी आवश्यक असते, हे लक्षात येताच तरुणीला शंका आली.
गीता कापडणे असं फसवणूक झालेल्या तरुणीचे नाव आहे. त्या चाळीसगाव तालुक्यातील रहिवासी आहेत. ज्याने हे जॉइनिंग लेटर गीता यांना मिळवून दिले होते, त्या सर्वेश भोसले याच्याकडे गीताने चौकशी केली. त्याने रणजीत मांडोळे या व्यक्तीच्या मदतीने इंटरनेटवर मिळालेल्या मुख्यमंत्र्यांच्या नाममुद्रा पत्रावर मजकूर टंकलिखीत करून देवेंद्र फडणवीस यांची बनावट स्वाक्षरी टाकून जॉइनिंग लेटर तयार केल्याची कबूली दिली. या संपूर्ण प्रकारात तीन जणांचा समावेश आहे. तुषार उर्फ रोहित बेलदार असं तिसऱ्या संशयिताचे नाव आहे.
दरम्यान या बनावट दस्तऐवज प्रकरणामुळे चाळीसगाव तालुक्यात खळबळ उडाली आहे. अशाप्रकारे आणखी किती लोकांची फसवणूक झाली आहे, याची सखोल चौकशी व्हावी अशी मागणी होत आहे. दरम्यान शहरात मोठ्या फसवणूक रॅकेटचा संशय व्यक्त केला जात आहे. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस निरीक्षक राहुलकुमार पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक योगेश माळी करीत आहेत. (jalgaon news)
संशयितांनी नेमकं काय केलं?
यासंबधी पोलिसांनी संशयित सर्वेश प्रमोद भोसले याच्याकडे चौकशी केली असता त्याने खळबळजनक कबुली दिली. त्याने इंटरनेटवर "cm officer letter Maharashtra" असे सर्च करून मिळालेल्या नमुन्यावरून खडकी येथील स्वामी ग्राफिक्सवर रणजीत मांडोळे यांच्या मदतीने बनावट मजकूर तयार केला आणि त्यावर मुख्यमंत्री फडणवीस यांची नक्कल सही टाकून जॉइनिंग लेटर तयार केल्याचे उघड झाले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.