Ajit Pawar News : मी त्या शाळेचा हेडमास्तर; अजितदादांचा लंकेंना 'दादा' स्टाईल इशारा !

Ahmednagar Lok Sabha Constituency : नीलेश लंके यांच्या होमग्राऊंड असलेल्या पारनेर विधानसभा मतदारसंघात अजितदादांची वादळी पावसानंतर झालेली सभा राजकीयदृष्ट्या वादळी ठरली. अजितदादांच्या या सभेची नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघात जोरदार चर्चा रंगली आहे.
Ahmednagar Lok Sabha Constituency
Ahmednagar Lok Sabha ConstituencySarkarnama

Nagar News : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी महाविकास आघाडीचे नगर दक्षिणचे उमेदवार माजी आमदार नीलेश लंके यांना त्यांच्या बालेकिल्ल्यात जाऊन चांगलेच फटकारले. अजितदादांची पारनेरमध्ये पावसात सभा झाली. नीलेश लंकेंची पारनेरमधील गुंडगिरीवर अजितदादांनी घाणाघात केला.'नीलेश बेट्या, तु ज्या शाळेत शिकतोय ना, त्या शाळेचा मी हेडमास्तर आहे', अशा शब्दात अजितदादांनी नीलेश लंकेंना इशारा दिला.

उपमुख्यमंत्री अजितदादा यांची आज महाविकास आघाडीचे उमेदवार माजी आमदार नीलेश लंके यांच्याविरोधात नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघातील पारनेर विधानसभा मतदारसंघात प्रचार सभा झाली. यावेळी अजितदादांनी त्यांच्या स्टाईलमध्ये सभेत नीलेश लंके यांना त्यांच्या होमग्राऊंडवर फटकारले. नीलेश लंके यांच्या होमग्राऊंड असलेल्या पारनेर विधानसभा मतदारसंघात अजितदादांची वादळी पावसानंतर झालेली सभा राजकीयदृष्ट्या वादळी ठरली. अजितदादांच्या या सभेची नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघात जोरदार चर्चा रंगली आहे. महायुतीचे उमेदवार खासदार सुजय विखेंना अजितदादांची ही सभा कितपत फायदेशीर ठरेल, निकालानंतरच समजेल.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Ahmednagar Lok Sabha Constituency
Lok Sabha Election 2024: अजित पवारांच्या सभेत 'रामकृष्ण हरी वाजवा तुतारी'ची घोषणा; सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल

अजित पवार (Ajit Pawar) म्हणाले, "उद्योजकांना सुपे 'एमआयडीसी'मध्ये चला म्हणलो की, दादा तिथे खूप त्रास होतो, असे सांगतात. या नीलेशला पारनेरच लोक माझ्याकडे घेऊन आले होते. दादा, तिकीट नीलेशलाच द्या... नीलेशलाच द्या.., अशी तुमचीच मागणी होती. तुमच्या प्रेमाखातर तिकीट दिले. गडी दिसतो बारका. पण लय पोहोचलेला आहे. घरी घेऊन गेला. मी किती साधा आहे, हे दाखवले. आई वडिलांना भेटवले.

पण नंतर... नंतर... त्याची एक-एक लक्षणे दिसली. 'अरे, नीलेश बेटा! ज्या शाळेत तू शिकतो, त्या शाळेचा मी हेडमास्तर आहे'. तू धमक्या देऊन आमच्या कार्यकर्त्यांना त्रास देतो काय? आणि मी तुझ्या मागे लागलो तर, तुझा 'कंड'च जिरवील. सतत तुझ्या डोळ्यासमोर अजित पवारच येईल. माझ्या नादी लागू नको. मी पुरता बंदोबस्त करतो. तू तर, किस झाड की पत्ती है! मी जोपर्यंत शांत आहे तोपर्यंत शांत. माझ्या कार्यकर्त्यांच्या केसाला धक्का लागल्यास बघून घेईल, असा इशारा अजितदादांनी लंकेंना दिला.

अजितदादांनी नीलेश लंकेंना सभेच्या भाषणातून झापत असताना कार्यकर्त्यांना कायदा हातात घेऊ नका. सुव्यवस्था पोलीस (Police) संभाळतील, असे सांगितले. आचारसंहितेनंतर सर्व अधिकारी यांची बैठक घेईल. तो आता आमदार पण नाही. आता तो कॉमन मॅन आहे. त्याची अरेरावी जिल्हाधिकारी, अधिकारी यांनी सहन करण्याचे कारण नाही. कार्यकर्त्यांनी देखील सहन करू नका. अरे ला, कारे म्हणायला शिका. अंगावर आल्यावर शिंगावर घ्या. याने विधानसभेत गेली साडेचार वर्षे काय काय प्रताप केले आहे, हे मला माहित आहे. झाकली मूठ सव्वालाखाची, असे सांगून लंकेची अजितदादांनी धाकधूक वाढवली.

Ahmednagar Lok Sabha Constituency
Sushama Andhare News : ठाकरे गटाची मोठी खेळी; करंजकर यांच्या दारात सुषमा अंधारे धडाडणार!

पारनेरच्या पाणी प्रश्नासंदर्भात आम्ही कमी पडणार नाही. पारनेरला कुकडीचे पाणी आणण्याचे ठरले आहे. त्याची कार्यवाही जलसंपदा विभागाला करण्याच्या सूचना दिल्या आहेत. डिंभे धरणातून पारनेरच्या हक्काचे पाणी दिली जाईल. सुजय विखे हुशार आहे. सुजयला कामाची जाण आहे. संसदेत तो प्रश्न चांगल्या पद्धतीने मांडतो आहे. चुकीचे माणसं निवडून दिल्यानंतर काय होते, हे मी पाहिले आहे. त्यामुळे आपल्या उमेदवारा मागे उभे राहा. आपला माणूस कोण, हे लक्षात घेऊन त्याचे काम करा, असे देखील अजित पवार यांनी म्हटले.

Ahmednagar Lok Sabha Constituency
Ajit Pawar : अजितदादांचा दोन दिवसांत दोन नेत्यांना दम; ऐन पावसात महाराष्ट्राचं राजकारण तापलं

महायुतीच्या उमेदवाराचे काम करताना दिवसा इकडे, रात्री तिकडे यांना ओळखा. कोण असे करत असेल, तर ते लक्षात आणून द्या. पारनेरमधील वकील, डॉक्टर, व्यापारी, व्यावसायिक यांच्याकडून फुकट घेऊन जातात काय? बिल घेऊ नका, असे निरोप दिले जातात काय? अरे, हे काय तुझ्या काकाच्या घरचं आहे काय?, असा प्रश्न अजितदादांनी सभेत उपस्थित केला. व्यावसायिधारकांना दमदाटी करत असाल, तर हे गंभीर आहे. पारनेरकरांना घाबरू नका. लोकसभेच्या निवडणुकीच्यानिमित्ताने नीलेशचा बंदोबस्त करायचा म्हणजे करायचा. मागे-पुढे पाहायचे नाही. लंकेचे पार्सल घरी पाठवायचे, असे अजितदादांनी यावेळी म्हटले.

(Edited by : Chaitanya Machale)

Ahmednagar Lok Sabha Constituency
Brijbhushn Sinh News : दिल्ली हायकोर्टाचा ब्रिजभूषण सिंहांना दणका; महिला कुस्तीपटूंच्या लैंगिक शोषणप्रकरणी आरोप निश्चित

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com