Lok Sabha Election 2024: अजित पवारांच्या सभेत घोषणा, 'रामकृष्ण हरी अन्...; व्हिडिओ व्हायरल

Nagar Lok Sabha Election 2024: नीलेश लंके यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना लोकसभा निवडणूक लढवणे हा आपला आवाका नाही, असे सुचवले होते. परंतु लंके अजितदादांची साथ सोडून शरद पवारांच्या गटात सामील होत लोकसभेच्या रिंगणात आले.
Ajit Pawar
Ajit PawarSarkarnama

Nagar Lok Sabha Constituency: नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघात महायुतीचे उमेदवार सुजय विखे (Sujay Vikhe) यांना मतदानाचं लीड देण्यासाठी पारनेरमध्ये अजित पवारांनी (Ajit Pawar) घेतलेली सभा वादळी झाली. वादळानंतर संततधार पावसात झालेल्या अजितदादांच्या या सभेत 'रामकृष्ण हरी, गाडा तुतारी', अशा घोषणा ऐकायला मिळाल्या. अजितदादांनी या घोषणांकडे लक्ष दिले नाही. मात्र, आता सभेतील तो व्हिडिओ व्हायरल होऊ लागला आहे.

नीलेश लंके (Nilesh Lanke) महाविकास आघाडीचे उमेदवार आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाकडून ते नगर दक्षिणमधून निवडणूक लढवत आहेत. महायुती भाजपचे (BJP) उमेदवार खासदार सुजय विखे यांच्याशी त्यांची थेट लढत आहे. तिसर्‍या टप्प्यातील मतदान संपल्यानंतर चौथ्या टप्प्यात नगर जिल्ह्यात मतदान होत आहे. नगर जिल्ह्यात शनिवारी सायंकाळी प्रचाराची सांगता होत आहे. त्यामुळे महायुती आणि महाविकास आघाडीचे (MVA) नेते ताकदीने प्रचारात उतरल्याचं दिसत आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

लोकसभा निवडणूक (Lok sabha Election) लढवण्यासाठी नीलेश लंके यांनी अजितदादांची साथ सोडली. आमदारकीचा राजीनामा दिला. नीलेश लंके यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार यांना लोकसभा निवडणूक लढवणे हा आपला आवाका नाही, असे सुचवले होते. परंतु नीलेश लंके यांनी अजितदादांची साथ सोडून शरद पवारांच्या (Sharad Pawar) गटात सामील होत लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात आले.

Ajit Pawar
Ajit Pawar : अजितदादांचा दोन दिवसांत दोन नेत्यांना दम; ऐन पावसात महाराष्ट्राचं राजकारण तापलं

राष्ट्रवादी काँग्रेसच्या पक्ष फुटीनंतर नीलेश लंकेंनी अजितदादांची (Ajit Pawar) साथ सोडली. नीलेश लंके आमदार असताना पारनेर मतदारसंघात अजितदादांना आणून विकासकामांचे उद्घाटन करून घेतले होते. अजितदादांनी नीलेश लंकेंच्या घरी देखील हजेरी लावली होती. त्यावेळी झालेल्या कार्यक्रमात अजितदादांनी लंकेंचे कौतुक केले होते. पंरतु लोकसभा निवडणुकीसाठी लंकेंनी दादांची साथ सोडली. अजितदादा महायुतीत असल्याने त्यांच्या लाडक्या लंकेंविरोधात नगर दक्षिणमध्ये सभा घेतात का? याकडे सर्वांचं लक्ष लागले होते.

अशातच आज अजितदादांनी नगर दक्षिणमध्ये कर्जत-जामखेड आणि पारनेर विधानसभा मतदारसंघात सभा घेतली. पारनेरमधील सभा दुपारी झाली. या सभेपूर्वी पारनेरला वादळी पाऊस झाला. पावसाची रिपरिप चालू असतानाही पारनेरमधील बाजारतळावर अजितदादांची सभा झाली. या सभेत अजितदांदानी त्यांच्या 'दादा' शैलीत नीलेश लंकेंच्या कार्यपद्धतीचा समाचार घेतला.

या निवडणुकीत नीलेश लंकेंचा बंदोबस्त करायचा म्हणजे करायचा, असं अजितदादांनी सांगितलं. अजितदादांचे भाषण सुरू असताना समोरील लोकांना दादांनी कांद्यावर बोलावा, असा आग्रह धरला. परंतु दादांनी त्यावर बोलणे टाळले. याचवेळी काहींनी 'रामकृष्ण हरी गाडा तुतारी', अशा घोषणा दिल्या. तसे व्हिडिओ समाज माध्यमांवर व्हायरल होऊ लागले आहेत.

(Edited By Jagdish Patil)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com