Ajit Pawar and Chhagan Bhujbal News: छगन भुजबळांनी मतदारसंघातील कामासाठी मागितला निधी अन् अजित पवारांनी..!

Maharashtra Monsoon Session 2024 : पक्षात नाराज असल्याची चर्चा असलेल्या मंत्री भुजबळ यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांची आज भेट घेतली.
Ajit Pawar and Chhagan Bhujbal
Ajit Pawar and Chhagan BhujbalSarkarnama

Assembly Monsoon Session 2024 : विधिमंडळाचे अधिवेशन आज(गुरुवार)पासून सुरू झाले. आगामी विधानसभा निवडणुकीपूर्वीचे हे अधिवेशन असल्याने सरकारचा आमदारांसह जनसामान्यांना खूश करण्यासाठी विविध प्रकल्पांना मंजुरी देण्याकडे कल आहे.

राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांच्या मतदारसंघातील तीर्थक्षेत्र विकास आराखड्याला लवकरच मंजुरी मिळणार आहे. निवडणुकीपूर्वीच्या आजपासून(गुरुवार) सुरू झालेले अधिवेशनात अनेक आमदारांना गिफ्ट देण्याचा सत्ताधारी पक्षाचा प्रयत्न दिसत आहे. त्याचाच एक भाग म्हणून मंत्री भुजबळ यांची कामेही मार्गी लागणार असल्याची चिन्हं आहेत.

पक्षात नाराज असल्याची चर्चा असलेल्या मंत्री भुजबळ यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उपमुख्यमंत्री अजित पवार(Ajit Pawar) यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी मतदारसंघातील कोटमगाव येथील जगदंबा देवस्थानच्या 75 कोटींच्या तीर्थक्षेत्र विकास आराखड्यासाठी निधी व मंजुरी देण्याची मागणी केली. उपमुख्यमंत्री पवार यांनी देखील लगेचच त्याला होकार दिला.

Ajit Pawar and Chhagan Bhujbal
Maharashtra Politics : मोठी बातमी! राज्य सरकारची नजर राज्यपाल नियुक्त 12 आमदारांवर, विधानसभेपूर्वी हालचालींना वेग

या बैठकीसाठी नियोजन विभागाचे अपर मुख्य सचिव डॉक्टर राजगोपाल देवरा, वित्त विभागाचे अपर मुख्य सचिव ओ. पी. गुप्ता, ग्राम विकास विभागाचे प्रधान सचिव एकनाथ डवले आणि पर्यटन संचालक जयश्री भोज उपस्थित होत्या. नाशिकचे जिल्हाधिकारी जलद शर्मा ऑनलाईन सहभागी झाले होते.

भुजबळ(Chhagan Bhujbal) यांच्या मतदारसंघातील या देवस्थानाचा विकास करण्याची आवश्यकता आहे. येथे मोठ्या प्रमाणावर भाविक येत असतात. त्यांना विविध अडचणींना सामोरे जावे लागते. त्यामुळे त्यांच्यासाठी आवश्यक सुविधा उपलब्ध करण्याचा आराखडा तयार करण्यात आला आहे. 75 कोटींच्या या आराखड्याला मंजूर देण्याची विनंती त्यांनी केली.

या आराखड्याला येत्या आठवड्यात मंजुरी देऊन जिल्हास्तरीय समितीची मंजुरी घेतली जाईल. शिखर समितीमध्ये या बैठकीत निर्णय घेऊन हा प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन उपमुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले.

Ajit Pawar and Chhagan Bhujbal
Amol Mitkari Vs Praveen Darekar : 'भाजपच्या काही वाचाळवीरांनी शांत बसावं, अन्यथा...'; मिटकरी अन् दरेकरांमधला वाद टोकाला

आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मंत्री भुजबळ यांनी आपल्या मतदारसंघातील एक महत्त्वाचे काम मार्गी लावले आहे. राज्य शासनाने देखील निवडणुकीपूर्वी अधिवेशन होत असल्याने लोकप्रिय निर्णय घेण्यावर भर दिला आहे. त्यामुळे सत्ताधारी पक्षाचे आमदार खूश आहेत. या निमित्ताने मंत्री भुजबळ यांना देखील 75 कोटींचे गिफ्ट मिळाले आहे असे म्हणता येईल.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com