
Ajit Pawar : राज्यात सध्या हनी ट्रॅप प्रकरण चर्चेत आहे. यासंदर्भात विरोधकांनी सभागृहात पावसाळी अधिवेशना दरम्यान पेनड्राईव्ह बॉम्ब टाकला होता. राज्यातील तब्बल ७२ अधिकारी, राजकारणी हॅनी ट्रॅपमध्ये अडकल्याचा दावा विरोधकांनी केला आहे. दरम्यान सरकार पुरावे मागत असताना विरोधक पेनड्राईव्ह दाखवत भक्कम पुरावे असल्याचा इशारा देत आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यावरुन विरोधकांना थेट आव्हान दिलं आहे.
अजित पवार यांनी विविध विषयांवर माध्यमांशी आज संवाद साधला. त्यात हनी ट्रॅप प्रकरणावरही त्यांनी भाष्य केलं. अजित पवार म्हणाले, हनी ट्रॅप प्रकरणात दम द्यायचं बंद करा. ज्यांच्याकडे जे व्हिडीओ आहेत, पेन ड्राईव्ह आहेत हे एकदा सगळे बाहेरच येऊ द्या..काय ते नुसतच म्हणायचं.. पेनड्राईव्ह आहे. अन् बातम्या लावायच्या त्या पेक्षा कुणाकडे काय व्हिडीओ आहे, कुणाकडे काय पेनड्राईव्ह आहे , कुणाकडे आणखी हनी ट्रॅप ची काय माहिती आहे ती सगळी एकदाची बाहेर येऊ द्या असं आव्हान अजित पवारांनी केलं.
अजित पवार पुढे म्हणाले, अनेक वर्षांपासून याबद्दल बोललं जात आहे. आमच्या सरकारच्या काळातही याबद्दल बोललं जात होतं. त्या आधीच्या सरकारच्या काळात देखील बोललं जात होतं.. आणि आत्ताच्या सरकारच्या काळातही बोललं जात आहे. प्रत्येकजण काही तरी पेनड्राईव्ह घेऊन येतो अरे पण तो दाखवा तरी आणि एकदा कळू द्या काय ते.. त्यातून लोकांच्या समोर सत्य काय ते येईल.
अशापद्दतीने काय होतं की सगळे जण संशयाच्या भोवऱ्यात राहतात. तुम्हाला जशा बातम्या मिळतात तशा तुम्ही देतात. यात चार मंत्री आहेत..आयपीएस..आएएएस ऑफिसर आहेत. यात बरेच काही राजकीय लोक आहेत..असं माध्यमांनी दाखवल्यावर सगळ्या मंत्र्यांकडे व अधिकाऱ्यांकडे त्या दृष्टीने पाहण्यास सुरुवात होते. म्हणून मला असं वाटतं की काय वस्तुस्थिती आहे, ती एकदाची समोर येऊ द्या असं अजित पवार म्हणाले..
दरम्यान याप्रकरणात पुण्यात प्रफुल्ल लोढा यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. पोलिस यंत्रणा त्यावर त्यांच्या पद्दतीने तपास करेलच पण कुणाकडे काही पुरावे असतील तर ते त्यांनी ते द्यावे. त्याची रितसर चौकशी केली जाईल. त्यात कुणालाही पाठिशी घातलं जाणार नाही. त्यामुळे नुसत्या धमक्या न देता पेन ड्राईव्ह, सीडी समोर तरी आणा असं अजित पवार म्हणाले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.