Ajit Pawar : अजित पवारांनी एकाच फटक्यात कॉंग्रेसला पाडलं मोठं खिंडार, बड्या नेत्याचा एनसीपीत प्रवेश

Congress setback : आगामी स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर खान्देशात कॉंग्रेसला मोठा धक्का बसला आहे. अजित पवारांच्या राष्ट्रवादीत हजारो कार्यकर्त्यांसह महिला नेत्याने प्रवेश केला.
 Ajit Pawar
Ajit PawarSarkarnama
Published on
Updated on

Jalgaon politics : आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या तोंडावर कॉंग्रेसला धक्क्यावर धक्के बसत आहे. आता राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार यांनी खान्देशात कॉंग्रेसला मोठा धक्का दिला आहे. यापूर्वी अजित पवारांनी जळगाव जिल्ह्यातील राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या अनेक दिग्गज नेत्यांना गळाला लावत आपल्या पक्षात प्रवेश करुन घेतला. त्यानंतर आता अजित पवारांनी आपला मोर्चा कॉंग्रेसकडे वळवला आहे.

जळगावात आज (दि. १७) राष्ट्रवादीचा मेळावा पार पडला. या मेळाव्या दरम्यान काँग्रेसच्या प्रदेश उपाध्यक्ष प्रतिभा शिंदे यांनी आपल्या हजारो कार्यकर्त्यांसह राष्ट्रवादी अजित पवार गटात प्रवेश केला आहे. त्यामुळे जळगाव जिल्ह्यात कॉंग्रेसला मोठं खिंडार पडलं आहे.

प्रतिभा शिंदे यांनी काही दिवसांपूर्वीच आपल्या पदाचा तडकाफडकी राजीनामा दिला होता. त्या राष्ट्रवादी अजित पवार गटात प्रवेश करणार असल्याची चर्चा सुरू होती. अखेर ती चर्चा प्रत्यक्षात उतरली, शिंदे यांनी आज अजित पवार यांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादी पक्षात प्रवेश केला. शिंदे यांचं जिल्ह्यात मोठं वलय आहे, त्या उत्तर महाराष्ट्रातील कॉंग्रेसचा चेहरा म्हणून ओळखल्या जात होत्या. त्यामुळे त्यांचे पक्ष सोडून जाणे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हा काँग्रेससाठी मोठा धक्का मानला जात आहे.

 Ajit Pawar
Chhagan Bhujbal : नाशिकमध्ये आपले 7 आमदार, इथेही शक्ती लावा.. रायगडचं उदाहरण देत भुजबळांनी टाकला पालकमंत्रीपदाचा बॉम्ब

दोनच वर्षांपूर्वी प्रतिभा शिंदे यांनी कॉंग्रेसमध्ये प्रवेश केला होता. कॉंग्रेसने त्यांना दुसऱ्यांदा प्रदेश उपाध्यक्षपदाची जबाबदारी दिली होती. आदिवासी नेत्या म्हणून त्या परिचित आहे. परंतु त्यांनी आता कॉंग्रेसला रामराम ठोकत अजित पवारांचे घड्याळ हाती बांधले आहे. अल्पसंख्याक समजाला आम्ही न्याय देऊ, प्रतिभा शिंदे यांच्या विश्वासाला कधीही तडा जाऊ देणार नाही असा शब्द पक्षप्रवेशावेळी अजित पवारांनी दिला.

 Ajit Pawar
Manikrao Kokate : रात गयी बात गयी, आता पुढची इनिंग..; पत्रकाराच्या 'त्या' प्रश्नावर कोकाटेंचं जोरदार उत्तर

अजित पवार पुढे म्हणाले, शिंदे ताई तुम्हाला राष्ट्रवादीत येण्याची चूक केली असं कधीही वाटणार नाही, आमचे सर्व सहकारी तुमच्यासोबत एकत्र काम करतील. सत्तेत असलो तरच निर्णय घेता येतात व धोरण ठरवता येते. जळगाव जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसमय करून दाखवू असंही अजित पवार म्हणाले. यानंतर धुळे आणि नंदुरबार जिल्ह्यातही सभा घेणार आहोत असं अजित पवारांनी सांगितलं. दरम्यान शिंदे यांच्या प्रवेशाने जिल्ह्यात अजित पवार गटाची ताकद वाढली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com