
Manikrao Kokate : विधिमंडळात रमी खेळतानाचा व्हिडीओ समोर आल्यानंतर मंत्री माणिकराव कोकाटे यांचा राजीनामा घ्यावा यासाठी विरोधकांनी रान उठवलं होतं. याच दरम्यान कोकाटे यांनी केलेल्या 'सरकार भिकारी आहे' या वक्तव्याने त्या आगीत आणखी तेल ओतलं.
रमीचा व्हिडीओ आणि वादग्रस्त वक्तव्य कोकाटेंना महागात पडलं. कृषीखाते त्यांच्याकडून काढून घेण्यात आलं. दत्ता भरणे यांना कृषीखाते देऊन त्यांच्याकडील क्रीडा आणि युवक कल्याण खात्याची जबाबदारी कोकाटे यांच्यावर सोपवण्यात आली. त्यापार्श्वभूमीवर राज्यभर कोकाटे चांगलेच चर्चेत आले.
दरम्यान आज (दि. 17) कोकाटे जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे प्रमुख अजित पवार हे जळगाव येथे आढावा घेणार आहेत. या दौऱ्यादरम्यान काही नवीन पक्षप्रवेश देखील होणार आहे. त्यासाठी कोकाटे देखील जळगावात गेले आहेत. यावेळी पत्रकारांशी बोलताना आपण नवी इनिंग जोरदार खेळणार, असे वक्तव्य त्यांनी केलं आहे.
यावेळी पत्रकारांनी कोकाटेंना कृषीमंत्री असताना आपल्यावर विरोधकांनी जोरदार टीका केली होती. यासंदर्भात प्रश्न केला. त्यावर कोकाटे म्हणाले की, रात गयी बात गई, प्रत्येक गोष्टीत मागचं उकरून काढण्यात काही अर्थ नाही. पुढे चला ना..पुढे काही विषय असतील त्याच्यावर चर्चा करा. पुढे लोकांना कसा न्याय देता येईल त्यावर विचार करायला पाहीजे. मागे खोलात जाण्याची आवश्यकता नाही असं कोकाटे यांनी म्हटलं आहे.
आपल्याकडे आता क्रीडा मंत्रीपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. क्रीडा क्षेत्रातील समस्या आपण कशा सोडवणार याविषीयी पत्रकारांनी प्रश्न केला असता कोकाटे म्हणाले, नवी इनिंग जोरदार असेल, तुम्ही काळजी करू नका, एकदम जोरदार असेल, असे त्यांनी म्हटले आहे.
दरम्यान कोकाटे हे कृषीमंत्री असताना धुळे जिल्ह्या दौऱ्यावर असताना त्यांच्याविरोधात आंदोलन झालं होतं. त्यामुळे त्यांचा जळगाव जिल्हा दौरा रद्द झाला होता. त्यासंदर्भात विचारले असता कोकाटे म्हणाले, पूर्वनियोजित कार्यक्रमामुळे माझा दौरा रद्द झाला होता. आज येथे मोठ्या प्रमाणात पक्षप्रवेश होणार असून पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार उपस्थित राहणार आहेत. त्यामुळे या जिल्ह्याचा संपर्क मंत्री म्हणून याठिकाणी उपस्थित राहणं माझं कर्तव्य आहे. त्यामुळे मी आज मेळाव्यासाठी आलो असल्याचे कोकाटे म्हणाले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.