Ajit Pawar politics: आता पुढची पाच वर्षे तुमच्यासाठी...अजितदादांनी नितीन पवारांच्या मतदारसंघात पाडला योजनांचा पाऊस!

Ajit Pawar; Dy CM Ajit Pawar assures to lift up Nashik District Bank in financial sustainable -नाशिक जिल्हा बँकेला ऊर्जितावस्थेत आणण्यासाठी निश्चितपणे प्रयत्न करणार.
Ajit-Pawar
Ajit-PawarSarkarnama
Published on
Updated on

Ajit Pawar News: मी एकदा शब्द दिला म्हणजे तो पूर्ण केल्याशिवाय राहत नाही. आता पुढील पाच वर्ष मी तुमच्यासाठी काम करणार आहे. केंद्रातले आणि राज्यातले सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहील.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत आज कळवण येथे शाळा इमारतीच्या भूमिपूजनाचा कार्यक्रम झाला. यावेळी आयोजक व पदाधिकाऱ्यांनी परिसरातील शेती व सिंचनाशी संबंधीत विविध मागण्या केल्या. यासंदर्भात परिसरातील धरणाचे अपूर्ण राहिलेले काम पूर्ण केले जाईल. त्यासाठी कुठेही निधी कमी पडू दिला जाणार नाही, असे आश्वासन त्यांनी दिले.

Ajit-Pawar
Congress Politics: ऑपरेशन सिंदूर; आता काँग्रेस देणार भाजपला उत्तर; २१ मेस जळगावला काँग्रेस काढणार तिरंगा यात्रा!

नाशिक जिल्हा बँक सध्या आर्थिक अडचणीत आहे. उर्जितावस्थेत आणण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. राज्य सहकारी बँकेच्या मदतीने बुलढाणा सहकारी बँक आपण अडचणीतून बाहेर काढण्यात यशस्वी झालो. बँकेलाही सर्व प्रकारची मदत करण्यासाठी कटिबद्ध आहोत. यापूर्वीच मी काम सुरू केले आहे, असे उपमुख्यमंत्री पवार म्हणाले.

Ajit-Pawar
Chhagan Bhujbal : 'PMLA कायद्याचा पहिला बळी मीच', माझी अडीच वर्ष तुरुंगात गेली ; भुजबळांची खंत...

उपमुख्यमंत्री पवार म्हणाले, निवडणुकीत तुम्ही तुमचे काम चोखपणे केले आहे. नाशिक जिल्ह्यातून नितीन पवार यांसह पक्षाचे विविध आमदार विजयी झाले आहेत. त्यामुळे आता यापुढे पाच वर्ष ही सर्व मंडळी तुमच्यासाठी काम करील. आम्ही सर्वच काम करणारे लोक आहोत, त्यामुळे तुम्ही निश्चित असावे.

यंदा शासनाने कृत्रिम बुद्धिमत्ता (ए.आय.) तंत्रज्ञानाचा वापर शेतीसाठी करण्याचे ठरविले आहे. यामध्ये तंत्रज्ञानाच्या मदतीने खते, पाणी, मशागत या सगळ्यांमध्ये कपात होऊन खर्चात बचत होईल. ऊस, कापूस, कांदा, सोयाबीन आधी पिकांचा त्यात समावेश करण्यात आला आहे. शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीला त्यामुळे हातभार लागेल.

शेतकऱ्यांना तीन ते साडेसात अश्‍वशक्तीच्या पंपांचे विज बिल माफ करण्यात आले आहे. त्यासाठी ४४ लाख शेतकऱ्यांचे वीस हजार कोटी रुपयांचा आर्थिक भार राज्य शासन सोसणार आहे. त्यामुळे शेती आणि शेतकऱ्यांना मदत करणारे हे सरकार आहे. कृषी खाते देखील आपल्याकडेच आहे.त्याचा निश्चितच शेतकऱ्यांना लाभ होईल.

राज्य शासन सौरऊर्जेचा पर्याय घेऊन पुढे आले आहे. सध्या साडेनऊ हजार मेगावात वीज निर्मितीचे प्रकल्प राज्यभर सुरू आहेत. प्रकल्पांसाठी पुरेसा निधी राज्य शासनाने उपलब्ध केला आहे. हे उद्दिष्ट साध्य झाल्यावर शेतकऱ्यांना दिवसादेखील वीज उपलब्ध होईल. त्यामुळे शेतकरी सायंकाळ नंतर आपल्या कुटुंबासोबत वेळ घालवू शकेल.

यावेळी आमदार नितीन पवार यांनी स्थानिक शेतकऱ्यांसाठी धरणांच्या सिंचनाचा प्रश्न मांडला. माजी खासदार देविदास पिंगळे, जिल्हाध्यक्ष रंजन ठाकरे यांसह विविध पदाधिकारी आणि लोकप्रतिनिधी यावेळी उपस्थित होते.

-------

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com