Ajit Pawar News: उपमुख्यमंत्री अजित पवार सध्या कर्जमाफीच्या आश्वासनाने चांगलेच चर्चेत आले आहेत. विधानसभा निवडणुकीच्या प्रचार सभेत त्यांनी विज बिल माफी पासून तर शेतकऱ्यांच्या कर्जमाफीपर्यंतच्या घोषणा दिल्या होत्या. सर्व घोषणा आता ते स्वतःच विसरल्याचे चित्र आहे
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विधानसभा निवडणुकीच्या पिंपळगाव बसवंत येथील जाहीर सभेत अनेक आश्वासने दिली होती. आमदार दिलीप बनकर यांच्या प्रचार सभेत ही आश्वासने देण्यात आली. उत्साही गर्दी आणि तेवढेच उत्साही अजित पवार यांनी यावेळी अक्षरशः आश्वासनाचा पाऊस पाडला होता.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रचार सभेत बुलढाणा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला तीनशे कोटी रुपयांचे अर्थसहाय्य दिले होते. या बँकेने आपला कारभार सुधारावा. शेतकऱ्यांना मदत करावी आणि बँक ऊर्जेतावस्थेत यावी हा हेतू असल्याचे त्यांनी सांगितले.
ऑक्टोबर महिन्यात पावसाळा सुरू होता. सगळीकडे पाणीच पाणी होते. त्यात घोषणांचा पाऊस देखील होता. त्यात पुन्हा विधानसभा निवडणुकीचा प्रचार त्यामुळे नाशिकच्या नागरिकांना आणि शेतकऱ्यांसाठी अल्हाददायक चित्र होते. मात्र सध्या वृक्ष उन्हाळा आणि मार्च एंडिंग सुरू असल्याने सगळेच अडचणीत सापडले आहेत.
नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला ७०० कोटी रुपयांची गरज आहे. शासनाकडून हे अर्थसाह्य करण्यात येईल. बँक आर्थिक अडचणीतून बाहेर पडण्यास मदत मदत होईल. शेतकऱ्यांना कर्ज देऊ शकेल. असे आश्वासन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यावेळी दिले होते.
प्रत्यक्षात मात्र या संदर्भात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या दालण्यात एक बैठक झाली देखील. या बैठकीस कृषिमंत्री माणिकराव कोकाटे, औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ आणि विविध लोकप्रतिनिधी उपस्थित होते. आमदार दिलीप बनकर यांच्या पुढाकारानेच ही बैठक झाली.
मंत्रालयात झालेले या बैठकीत विविध प्रस्तावांवर चर्चा करण्यात आली. जिल्हा बँकेचा बँकिंग परवाना रद्द होण्याची समस्या आहे. त्यासाठी बँकेतर्फे शासनाला साडेसहाशे कोटी रुपयांचे अर्थसहाय्य देण्याचे पत्र देण्यात आले होते. तातडीने कारवाई करण्याची सूचना होती.
सध्या मात्र आर्थिक वर्ष संपत आले आहे. बँक कर्ज वसुली आणि अन्य विषयांवर प्रयत्न करून आर्थिक अडचणीतून बाहेर पडण्याचा प्रयत्न करीत आहे. त्यामुळे उपमुख्यमंत्री अजित पवार निवडणुकीच्या कालावधीत दिलेले स्वतःचेच आश्वासन विसरले की काय अशी चर्चा सुरू आहे.
-------
२५ वर्षे पूर्ण करणारा ई-सकाळ आता कॉमस्कोअरमध्ये Number One डिजिटल माध्यमांच्या क्षेत्रातील नवी झेप
-----
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.