Ajit Pawar News: अजित पवार गटाकडून मुंबईत होणार पदाधिकारी संवाद मेळावे

Participation of Dcm Ajit Pawar, Praful Patel, Sunil Tatkare, Chhagan Bhujbal : उपमुख्यमंत्री अजित पवार, प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे, छगन भुजबळ यांचा सहभाग
Sameer Bhujbal, EX M.P.
Sameer Bhujbal, EX M.P.Sarkarnama

Nashik News : आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (अजित पवार गटा) च्या वतीने येत्या 7 जानेवारी पासून मुंबई शहरात षण्मुखानंद सभागृहात पदाधिकारी संवाद मेळावा होणार आहे. अजित पवार गटाचे मुंबई अध्यक्ष माजी खासदार समीर भुजबळ यांनी ही माहिती दिली.

आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाने ही सर्व स्तरावर पक्ष बांधणीला प्राधान्य दिले आहे. या संदर्भात मुंबई शहरातही विविध कार्यक्रम होणार आहेत. माजी मंत्री नवाब मलिक यांनी अजित पवार गटात जाण्याचे ठरविल्यानंतर आता हा कार्यक्रम होत आहे. माजी खासदार समीर भुजबळ यांची मुंबई शहराध्यक्षपदी नियुक्ती करण्यामागे शहरात संघटनात्मक विस्तार हे प्रमुख उद्दिष्ट होते.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Sameer Bhujbal, EX M.P.
Chhagan Bhujbal News : छगन भुजबळांचे सावित्रीबाईंना अभिवादन, राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांकडून शुद्धीकरण

यादृष्टीने गेले तीन महिने समीर भुजबळ यांनी विविध स्तरांवर प्रयत्न केले आहेत. यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या अनेक कार्यकर्त्यांशी संपर्क निर्माण करण्यात आला आहे. नव्या कार्यकर्त्यांना प्रवेश देण्याबरोबरच निवडणुकीच्या दृष्टीने प्रभावी उमेदवारांचा देखील शोध घेण्यात आला होता. आता यातील पुढचा टप्पा म्हणून थेट पदाधिकाऱ्यांशी पक्षाचे वरिष्ठ नेते संवाद साधणार आहेत. या संवाद मेळाव्यासाठी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह खासदार प्रफुल्ल पटेल, खासदार सुनील तटकरे, मंत्री छगन भुजबळ यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे. या कार्यक्रमासाठी पदाधिकारी मोठ्या संख्येने सहभागी होतील, असा विश्वास मुंबई अध्यक्ष समीर भुजबळ यांनी व्यक्त केला आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर पक्षाचे दोन गट झाले आहे. शरद पवार गटातील पदाधिकारी, अजित पवार गटाचे पदाधिकारी एकमेकांवर टीका करत दररोज आरोप प्रत्यारोपांच्या फैरी एकमेकांवर झाडत आहेत. शिर्डी राहता येथे राष्ट्रवादी काँग्रेसचे राज्यस्तरीय अधिवेशन सुरु असून त्यामध्ये पक्षाचे अध्यक्ष शरद पवार हे मार्गदर्शन करत आहेत. या पार्श्वभूमीवर आपणही कुठे मागे नाही, असा मेसेज कार्यकर्त्यांना देण्यासाठी हा परिसंवाद मेळावा बोलविण्यात आला असल्याची चर्चा आता सुरू झाली आहे.

Edited by : Chaitanya Machale

Sameer Bhujbal, EX M.P.
Anganwadi Sevika : सरकारं आली अन् गेली, 40 वर्षांपासून अंगणवाडी सेविका तिथेच

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com