Ajit Pawar Politics: कोकाटे संतापले, "उदय सांगळे गद्दार आणि विश्वासघातकी त्यांना निवडणुकीत संपवा"

Manikrao Kokate criticism Uday Sangle NCP: आमदार माणिकराव कोकाटे यांनी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे उदय सांगळे यांच्यावर शरसंधान केले.
Manikrao Kokate & Uday Sangle
Manikrao Kokate & Uday SangleSarkarnama
Published on
Updated on

Sinnar Assembly constituency: सिन्नर मतदार संघाच्या निवडणुकीत आरोप आणि प्रत्यारोपांना चांगलीच धार आली आहे. आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांची सभा झाली. यावेळी आमदार माणिकराव कोकाटे यांनी प्रतिस्पर्धी उदय सांगळे यांचा तिखट शब्दात समाचार घेतला.

आमदार माणिकराव कोकाटे यांनी मी निवडणूक विकासासाठी लढतो. सिन्नर तालुक्याचा सर्वांगीण विकास करण्याचे माझे ध्येय आहे. गेल्या पाच वर्षात अनेक विकास कामे केली. मात्र अद्यापही बरीचशी कामे करण्याची राहून गेली आहेत. माझ्या मनासारखा सिन्नरचा विकास करण्यासाठी मला एक संधी द्या, असे आवाहन त्यांनी केले.

Manikrao Kokate & Uday Sangle
Ajit Pawar Politics: अजित पवार म्हणाले, `तुम्ही कोकाटेंना आमदार करा, मी त्यांना मंत्री करतो`

आमदार कोकाटे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार उदय सांगळे यांची उमेदवारी हा सिन्नरला कलंक आहे. अशी माणसे निवडणुकीला उभे राहण्याचे धाडस कसे करतात?. त्यांना मतदारांनी कमीत कमी एक लाख मताधिक्याने पराभूत करावे, म्हणजे ते पुन्हा निवडणूक लढविण्याचे धाडसच करणार नाहीत, असे सांगितले.

Manikrao Kokate & Uday Sangle
Mallikarjun kharge Politics: खर्गे यांचा भाजपला टोला, "हा महाराष्ट्र आहे 370 नव्हे, सोयाबीनचे बोला"

आमदार कोकाटे म्हणाले, लोकसभा निवडणुकीच्या आधी सांगळे यांनी मला एक प्रस्ताव दिला होता. खासदार राजाभाऊ वाजे यांना पराभूत करण्यासाठी तुम्ही आतून मदत करा. त्यानंतर विधानसभेला व अन्य निवडणुकांमध्ये त्याची परतफेड केली जाईल, असा हा प्रस्ताव होता. मात्र तो प्रस्ताव मी फेटाळला. मी छत्रपती शिवाजी महाराजांचा वंशज आहे. गद्दारी आणि फंद फितुरीचे काम मी करत नाही. मी पाठीत खंजीर खुपसत नाही. समोरासमोर लढतो, असे सांगून तो प्रस्ताव मी फेटाळला.

आमदार कोकाटे म्हणाले, आज माझ्यासमोर जे उमेदवार आहेत त्यांनी नाशिक शहरात आरक्षण बदलणे, जमिनी हडप करणे, आदिवासींच्या जमिनी विकत घेणे. वंजारी समाजाच्या जमिनी घशात घालणे अशा प्रकारचे काम केले आहे. आयुष्यभर ते धंदा करीत आले आहेत. असे लोक आता निवडणुकीला उमेदवारी करीत आहेत. याची लाज वाटते.

श्री. सांगळे यांना अडीच वर्ष जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद मिळाले होते. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने त्यांनाही संधी दिली. या संधीचा उपयोग त्यांनी कोणासाठी केला, हे त्यांनी सांगावे. सिन्नर मतदारसंघातील एकाही व्यक्तीला उभे करण्याचे काम त्यांनी केले नाही. कुठला निधी आणला नाही. कुठला विकास केला नाही. फक्त आपल्या पैशाचा माज दाखवला. हा माज जिरवण्यासाठी येथे वीस तारखेला त्यांना कायमचे गाडून टाका आणि ही विश्वासघाताची परंपरा संपवा असे आवाहन त्यांनी केले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com