NCP Ajit Pawar Politics: भाजप, शिवसेनेत प्रवेश सोहळे, अजित पवारांची महापालिका निवणुकीसाठी खास रणनीती!

Ajit Pawar; NCP Ajit Pawar's party has also started preparations, former corporator in contact-राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाच्या संपर्कात माजी नगरसेवक असल्याचा शहराध्यक्ष रंजन ठाकरे यांचा दावा
Ajit Pawar
Ajit PawarSarkarnama
Published on
Updated on

NCP Ajit Pawar News: महायुतीचा घटक असलेल्या भाजप आणि शिवसेना एकनाथ शिंदे पक्ष सातत्याने प्रतिस्पर्धी पक्षांच्या नगरसेवकांना फोडण्यासाठी कार्यरत आहे. निवडणुकीच्या या धामधुमीत राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्ष मात्र थेट निवडणुकीच्या तयारीला लागला आहे. त्यांनी याबाबत स्वतंत्र रणनिती आखली आहे.

भारतीय जनता पक्षात मंगळवारी मेगा प्रवेश सोहळा झाला. दोन माजी महापौरांसह सात नगरसेवकांनी पक्षात प्रवेश केला. याच वेळी शिवसेना एकनाथ शिंदे पक्षात चार माजी नगरसेवकांचे प्रवेश झाले. त्यामुळे मंगळवारचा दिवस महायुतीच्या या दोन्ही पक्षांनी गाजवला. त्याचीच सगळीकडे चर्चा होती.

महायुतीचे भाजप आणि शिवसेना एकनाथ शिंदे पक्ष सातत्याने विरोधी पक्षांना कमकुवत केल्याचा दावा करत आहेत. त्या तुलनेत राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाने मात्र थेट निवडणूक यंत्रणा आणि बुथ यंत्रणा यावर लक्ष केंद्रित केले आहे. यासंदर्भात पक्षाच्या सर्व पदाधिकाऱ्यांची दोन दिवसांपूर्वी बैठक झाली. त्यात शहरातील राजकीय स्थितीचा आढावा घेण्यात आला.

Ajit Pawar
Sharad Pawar Politics: शरद पवार यांनी विधानसभेला आयात केलेले दोन्ही उमेदवार पक्ष सोडण्याच्या मनस्थितीत?

राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्ष महायुतीचा घटक म्हणूनच निवडणुकीला सामोरा जाणार आहे. यासंदर्भात पक्षाच्या कोणत्याही पदाधिकाऱ्यांनी महायुती विरोधात किंवा महायुतीला बाधा येईल, असे विधान करू नये अशा सूचना वरिष्ठ नेत्यांनी दिल्या आहेत. पुढील आठवड्यात पक्षाचे वरिष्ठ नेते थेट निवडणुकीच्या तयारीचा आढावा घेऊन पुढील सूचना करणार आहेत.

राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे शहराध्यक्ष रंजन ठाकरे यांनी शहरातील सर्व प्रभागांमध्ये पक्षाची यंत्रणा सक्रिय करण्यावर भर दिला आहे. त्यासाठी बुथनिहायंत्रणा तयार केल्याचा दावा त्यांनी केला. गेल्या निवडणुकीत या पक्षाने महापालिकेच्या सर्व प्रभागांमध्ये उमेदवार दिले होते. पक्षाने अशीच तयारी केल्याची माहिती श्री ठाकरे यांनी दिली.

नाशिक जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे अन्नभाव औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ, कृषीमंत्री माणिकराव कोकाटे आणि अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ असे तीन मंत्री आहेत. यामध्ये मंत्री भुजबळ यांचा शहरातील पदाधिकारी, कार्यकर्ते आणि विविध संस्थांची संपर्क आहे. श्री भुजबळ यांचा महापालिका निवडणुकीत पक्षाला मोठा फायदा होईल असे चित्र आहे.

शिवसेना एकनाथ शिंदे आणि भारतीय जनता पक्ष या दोन्ही पक्षांचा प्रामुख्याने शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाच्या माजी नगरसेवकांना फोडण्यावर भर आहे. शिवसेना एकनाथ शिंदे पक्षात आतापर्यंत जवळपास तीसहून अधिक माजी नगरसेवकांनी प्रवेश केला आहे. हा पक्ष पूर्ण ताकदीनिशी निवडणुकीत उतरणार असल्याचे सध्याचे चित्र आहे.

या पार्श्वभूमीवर महायुतीचा प्रमुख घटक म्हणून उपमुख्यमंत्री अजित पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस महापालिका निवडणुकीसाठी काय तयारी करते आहे याची उत्सुकता सगळ्यांनाच आहे. हे मात्र महायुतीचा घटक म्हणूनच निवडणुकीला सामोरे जाण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे जागा वाटपात या पक्षाला किती न्याय मिळतो, किती जागा मिळतात यासाठी या पक्षाने अभ्यास सुरू केला आहे. युतीच्या भाजप आणि शिवसेना शिंदे पक्षाबरोबरच राष्ट्रवादी अजित पवार पक्षाने संयमाने मात्र गाजावाजा टाळून निवडणुकीच्या डेट यंत्रणा उभी करण्यावर भर दिला आहे.

--------

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com