Sharad Pawar news: आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यभरात पक्षांतराचे लोन पसरले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने नाशिकमध्ये आयात केलेल्या दोन उमेदवारांबाबत सध्या गोंधळाचे वातावरण आहे. हे दोन्ही उमेदवार राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पक्षात पक्षात अस्वस्थ असल्याचे चित्र आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने विधानसभा निवडणुकीत नाशिक जिल्ह्यात विविध प्रयोग केले होते. मात्र त्याला यश आले नाही. नाशिक जिल्ह्यात यंदा मालेगाव मध्य वगळता सर्वच्या सर्व जागांवर महायुतीचे आमदार निवडून आले. सबंध राज्यातच विरोधी महाविकास आघाडीची धुळधान झाल्याचे पडसाद नाशिकलाही उमटले.
https://www.sarkarnama.in/topic/uddhav-thackeray
नाशिक पूर्व मतदारसंघात भाजपचे माजी स्थायी समिती सभापती गणेश गीते यांना राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाने उमेदवारी दिली होती. सिन्नर मतदारसंघात पक्षाला शेवटपर्यंत प्रबळ उमेदवार न मिळाल्याने शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे उदय सांगळे यांना उमेदवारी देण्यात आली होती. हे दोन्ही आयात उमेदवार निवडणुकीत पराभूत झाले. निवडणूक निकालापासून हे दोन्ही उमेदवार पक्षात अस्वस्थ आहेत.
गणेश गीते हे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्या संपर्कात आहेत. अनेक दिवसांपासून भारतीय जनता पक्षात प्रवेश मिळावा म्हणून त्यांचे जोरदार प्रयत्न सुरू आहेत. त्याला भाजपच्या स्थानिक नेत्यांचा तीव्र विरोध आहे. त्यामुळे त्यांची घर वापसी सातत्याने लांबणीवर पडत आली आहे. येत्या मंगळवारीच त्यांचा प्रवेश होण्याची शक्यता आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसने २०१९ मध्ये देखील भाजपचे माजी महापौर बाळासाहेब सानप यांना उमेदवारी दिली होती. त्यांचा विधानसभा निवडणुकीत राहुल ढिकले यांनी पराभव केला. विधानसभेच्या निकालानंतर काही दिवसातच राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मन रमत नसल्याने श्री सानप यांची भारतीय जनता पक्षात घरवापसी झाली होती.
श्री सानप यांच्याप्रमाणेच गणेश गीते हे देखील घरवापसीसाठी उत्सुक आहेत. त्यांच्या प्रवेशासाठी जलसंपदा मंत्री गिरीश महाजन अनुकूल आहेत. गणेश गीते यांच्या बाबत अनेक गंभीर आरोप आहेत. मात्र त्यांना भाजपने प्रवेश न दिल्यास ते आपल्या प्रभागात भाजपला नुकसान पोहोचवू शकतात. त्यामुळे त्यांना पक्षाने प्रवेश द्यावा यासाठी मंत्री महाजन आग्रही आहेत.
सिन्नरचे उदय सांगळे यांनी आपली अधिकृत भूमिका अद्याप जाहीर केलेली नाही. सिन्नर मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे माणिकराव कोकाटे हे कृषिमंत्री आहेत. शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे राजाभाऊ वाजे हे खासदार आहेत. या दोन्ही नेत्यांची जिल्हा परिषद निवडणुकीत प्रतिष्ठा पणाला लागणार आहे.
कृषिमंत्री कोकाटे आणि खासदार वाजे या पारंपारीक विरोधकांत तिसरा गट म्हणून उदय सांगळे जिल्हा परिषद निवडणुकीची तयारी करीत आहेत. भाजप आणि अन्य पक्षांकडून सांगळे यांना मधाचे बोट लावले जात आहे. त्यामुळे श्री सांगळे आपले स्वतंत्र अस्तित्व दाखवतात की निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अन्य पक्षाचा मार्ग स्वीकारतात याची उत्सुकता आहे.
एकंदरच राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने विधानसभा निवडणुकीला आयात केलेले दोन्ही उमेदवार सध्या पक्षात अस्वस्थ आहेत. ते नव्या घरोब्याच्या शोधात आहेत. बाबत रोज बातम्या आणि नवी माहिती बाहेर येत आहे. मुळे शरद पवार यांनी विधानसभेला आयात केलेले दोन्ही उमेदवार त्यांना निरोप देण्याचा मुहूर्त शोधत आहेत.
---------
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.