Chhagan Bhujbal : शिंदेंच्या शिवसेनेपेक्षा राष्ट्रवादीचा स्ट्राइक रेट जास्त, मंत्रिमंडळ विस्ताराआधीच भुजबळांचा मोठा दावा

Chhagan Bhujbal On Mahayuti Strike rate : राज्यात सध्या सत्तास्थापनेच्या हालचाली सुरू आहेत. तसंच अजित पवारांच्या राष्ट्रवादीला जास्त खाती मिळणार की एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला याबाबतच्या चर्चा सुरू असतानाच छगन भुजबळांनी केलेल्या एका वक्तव्यामुळे शिवेसना आणि राष्ट्रवादीत नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता नाकारता येत नाही.
Eknath Shinde, Chhagan Bhujbal
Eknath Shinde, Chhagan BhujbalSarkarnama
Published on
Updated on

Mumbai News, 03 Dec : विधानसभा निवडणुकीत राज्यातील जनतेनं महायुतीला चांगला कौल दिला आहे. त्यामुळे राज्यात आता महायुतीचं एकहाती सरकार येणार हे निश्चित झालं आहे. या निवडणुकीत महायुतीला 230 जागा मिळाल्या आहेत.

त्यामध्ये सर्वाधिक 132 येवढ्या जागा एकट्या भाजपला मिळाल्या आहेत. तर एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला 57 आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला 41 जागा मिळाल्या आहेत. मात्र, या निवडणुकीत शिंदेंच्या शिवसेनेपेक्षा राष्ट्रवादी काँग्रेसचा स्ट्राइक रेट जास्त असल्याचं वक्तव्य छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी केलं आहे.

राज्यात सध्या सत्तास्थापनेच्या हालचाली सुरू आहेत. एकनाथ शिंदे हे गृहमंत्रिपदासाठी आग्रही आहेत तर भाजप शिंदेंच्या सेनेला गृहमंत्रिपद द्यायला तयार नसल्याच्या चर्चा सुरू आहेत. तर अजित पवारांच्या राष्ट्रवादीला जास्त खाती मिळणार की एकनाथ शिंदेंच्या (Eknath Shinde) शिवसेनेला याबाबतच्या चर्चा सुरू असतानाच भुजबळांनी केलेल्या वक्तव्यामुळे शिवेसना आणि राष्ट्रवादीत नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता नाकारता येत नाही.

Eknath Shinde, Chhagan Bhujbal
Top 10 News : शिंदेंनाच विरोधी पक्षनेता बनवणार, जानकरांची मोठी घोषणा...-वाचा महत्वाच्या घडामोडी

कारण नुकतंच दोन दिवसांपूर्वी शिवसेना (Shivsena) शिंदे गटाचे नेते गुलाबराव पाटील यांनी अजित पवारांना सोबत घेतलं नसतं तर आमच्या शंभर जागा निवडून आल्या असत्या, असं वक्तव्य केलं होतं. त्यांच्या या वक्तव्यावरून शिंदेंची शिवसेना आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीत शाब्दिक चकमक सुरू होती. अशातच आता भुजबळांनी केलेल्या वक्तव्यावर शिंदे गटाकडून काय प्रतिक्रिया येते हे पाहणं महत्वाचं आहे.

Eknath Shinde, Chhagan Bhujbal
Sanjay Raut : भाजपकडून एकनाथ शिंदेंना विरोधी पक्षनेता बनवण्याचा प्रयत्न, दमानिया यांच्या दाव्यावर राऊतांचं सूचक वक्तव्य

छगन भुजबळ नेमकं काय म्हणाले?

छगन भुजबळ म्हणाले, "शिंदेंच्या शिवसेनेपेक्षा अजित पवार (Ajit Pawar) गटाचा स्ट्राइक रेट जास्त आहे. स्ट्राइकरेटनुसार आम्ही 2 नंबरवर आहोत. अजित दादासोबत आमची बैठक झाली तेव्हा स्ट्राइक रेटचा विषय झाला. राज्यात एक नंबर भाजप आहे तर दोन नंबरला आम्ही आहे. मंत्रिमंडळात नवीन चेहऱ्यांना संधी नेहमी देण्यात येते. मात्र, यावेळी जरा अडचण जास्त आहेत. कारण दरवेळी 160 आमदार असतात, यावेळी आमदारांची संख्या जास्त आहे. सर्व पक्षांमध्ये नवीन जुने चेहरे येतील."

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com