Sangram Jagtap Hindutva controversy : पक्षानं नोटीस काढली, प्रश्न करताच, संग्राम जगतापांची 'सूचक कृती'; अजितदादांशी बोलणार, म्हणत घेतला काढता पाय!

Sangram Jagtap Reacts to Ajit Pawar Notice Over Hindutva Stance : प्रखर हिंदुत्वावादीच्या भूमिकेत असलेल्या अहिल्यानगरमधील आमदार संग्राम जगताप पक्षाचे सर्वेसर्वा अजित पवार यांच्या नोटिशीला कसं उत्तर देणार याची चर्चा आहे.
Sangram Jagtap Hindutva controversy
Sangram Jagtap Hindutva controversySarkarnama
Published on
Updated on

Sangram Jagtap NCP news : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा अजित पवार यांनी अहिल्यानगरमधील आमदार संग्राम जगताप यांना पक्षामार्फत नोटीस काढली आहे. या नोटिशीली आमदार जगताप कसं उत्तर देणार याकडे आता लक्ष लागलं आहे. याबाबत संग्राम जगताप यांना प्रतिक्रिया विचारल्यावर त्यांनी केलेली कृती लक्ष वेधून घेणारी ठरली.

पक्षाच्या नोटिशीवर संग्राम जगताप काहीसे नरमल्याचे त्यांच्या कृतीवरून दिसले. तसंच मी अजितदादांची भेट घेणार आहे, एवढचं सांगितलं. त्यामुळे अजितदादा अन् संग्राम जगताप यांची भेट कधी होणार? नोटिशीचं काय होणार? नोटिशीला उत्तर दिलं जाणार का? संग्राम जगताप त्यांच्या हिंदुत्वावादी भूमिकेवर ठाम पुढे जाणार हे आगामी काळात स्पष्ट होईल.

महामानव भारतरत्न डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याची विटंबनाप्रकरणी आमदार संग्राम जगताप यांच्या नेतृत्वाखाली आज अहिल्यानगरमध्ये जनआक्रोश मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात त्यांनी 'डेमोग्राफिक जिहाद'वर घणाघात केला. तसंच 'AIMIM'चे प्रमुख असदुद्दीन ओवैसी आणि प्रदेशाध्यक्ष इम्तियाज जलील यांच्यावर टीका केली. यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी पक्षानं काढलेल्या नोटिशीवर प्रतिक्रिया विचारली असता, संग्राम जगताप (Sangram Jagtap) यांनी केलेली कृती लक्ष वेधून घेणारी ठरली.

अजितदादांनी (Ajit Pawar) नाराजी व्यक्त करता पक्षामार्फत नोटीस काढली आहे. या प्रश्नावर संग्राम जगताप म्हणाले, 'अजितदादांशी या प्रश्नावर बोलू. सविस्तर बोलू आम्ही त्याबाबतीत, असे म्हणत, त्यांनी हात जोडले.' माध्यमांच्या या प्रश्नावर पुढे प्रतिक्रियाी देण्याऐवजी संग्राम जगताप यांनी काढता पाय घेतला. जगताप यांची ही कृती सूचक असली, तरी नोटिशीला कोणत्या पद्धतीने घेतात? त्याचं नक्की उत्तर देणार का? अजितदादांशी कधी भेट घेणार तिथं काय चर्चा होणार? असे एक ना अनेक मुद्दे आता चर्चेत आले आहेत.

Sangram Jagtap Hindutva controversy
Sangram Jagtap AIMIM criticism : 'चिकणी चमेली'ला 'खुराड बोकड'नं प्रत्युत्तर; ओवैसी, जलीलांना सुनावताना, संग्राम जगतापांचा 'डेमोग्राफिक जिहाद'वर घणाघात

संग्राम जगताप यांच्या आमदारकीची ही तिसरी टर्म आहे. राष्ट्रवादी फुटल्यानंतर त्यांनी अजितदादांची साथ दिली. विधानसभेनंतर मात्र त्यांनी आक्रमक हिंदुत्व पुकारलं. महाराष्ट्रातील हिंदुत्ववादी मोर्चांमध्ये ते सहभागी होत आहे. सुरूवातीलाच अजितदादांकडे यावरून तक्रारी झाल्या. विशेष म्हणजे, पक्षातील मुस्लिम पदाधिकाऱ्यांनी तक्रारी केल्या. अजितदादांनी दखल घेत, संग्राम जगताप यांना समज देत प्रश्न निकाली निघाल्याचे जाहीर केले.

Sangram Jagtap Hindutva controversy
पी. चिदंबरम यांच्या वक्तव्यामुळे चर्चेत आलेलं अन् इंदिरा गांधींच्या हत्येला कारणीभूत ठरलेलं 'ऑपरेशन ब्लू स्टार' नेमकं काय होतं?

हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांचा राबता

यानंतर मात्र, संग्राम जगताप यांनी पुन्हा हिंदुत्वाच्या भूमिकेवर अधिक आक्रमक झाले. विशेष म्हणजे, त्यांच्याभोवती अहिल्यानगर शहरातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते देखील हिंदुत्वाची भूमिका घेऊन पुढे जात आहेत. तसंच त्यांच्या कार्यालयात देखील अलीकडच्या काळात हिंदुत्ववादी संघटनेच्या कार्यकर्तांचा राबता सर्वाधिक पाहायला मिळतो आहे. संघाचे कार्यकर्ते, पदाधिकारी यांच्याशी आता त्यांचा जवळचा संबंध आला आहे.

नोटिशीनंतर देखील भाष्य

यातच त्यांनी पुन्हा हिंदुत्वाची भूमिका पुन्हा उचलून धरली आहे. करमाळा इथल्या सभेत हिंदुंकडूनच दिवाळीची खरेदी करा, आपल्याच व्यापाऱ्यांकडे नफा राहिला पाहिजे, विधान केले. या विधानावरून पुन्हा वाद उफळला आहे. त्यावर अजितदादांनी देखील जाहीर नाराजी व्यक्त केली. आता पक्षामार्फत अजितदादांनी नोटीस पाठवून कारणं विचारली आहे. परंतु अहिल्यानगर इथं जनआक्रोश सभा घेत, हिंदुत्वाची भूमिका मांडताना, त्यांनी 'डेमोग्राफिक जिहाद'वर भाष्य केले आहे.

अजितदादांच्या भेटीकडं लक्ष...

या सर्व राजकीय घटनाक्रमानंतर संग्राम जगताप यांनी पक्षाच्या नोटिशीवर आपण अजितदादांशी भेटून सविस्तर चर्चा करणार असल्याचे सांगून अधिक भाष्य करण्याचे टाळले आहे. त्यामुळे पक्षाच्या नोटिशीला संग्राम जगताप यांनी खरचं गांभीर्यानं घेतलं आहे का, अशी चर्चा सुरू झाली. अजितदादांकडे ते काय भूमिका मांडणार आता याकडे अहिल्यानगरमधील त्यांच्या समर्थकांचे लक्ष लागलं आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com