NCP On BJP Government: ‘उत्पन्न दुप्पट करू सांगणाऱ्यांनी शेतकऱ्याच्या हाती उत्पन्नच ठेवले नाही’

Ajit Pawar & Sharad Pawar Politics, Jayant Patil Criticized Ajit Pawar Group-राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी राज्यातील शिंदे सरकारने शेतकऱ्यांची उपेक्षा केल्याचा आरोप केला.
Jayant Patil & CM Eknath Shinde
Jayant Patil & CM Eknath ShindeSarkarnama
Published on
Updated on

Maharashtra Politics : राज्यातील शेतकरी उध्वस्त झाला आहे. मात्र सरकारला त्याचे सोयरेसुतक नाही. ते त्यांच्याच कार्यक्रमांत व्यस्त आहेत. दाराशी आल्याशिवाय काही द्यायचेच नाही, असे राज्यातील सरकारचे धोरण असल्याची टिका राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर केली. (NCP deemands Reshuffle loans of all Farmers in The state due to Unseasonal rains)

अवकाळी पावसाने झालेले नुकसान तसेच शेतकऱ्यांच्या (Farmers) प्रश्नांवर आज राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांच्या नेतृत्वाखाली दिंडोरी येथे आक्रोष मोर्चा काढण्यात आला. यावेळी त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यावर देखील टिका केली.

Jayant Patil & CM Eknath Shinde
NCP Vs BJP Politics : राजकारणात होरपळलेल्या येवल्याला कोणी पाणी देतं का पाणी!

आज दिंडोरी येथे शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे ट्रॅक्टर मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात लगतच्या तालुक्यातील शेतकऱ्यांनीही भाग घेतला. त्यामुळे दिंडोरीत काही काळ वाहतूक कोंडी झाली. यावेळी तहसीलदारांना निवेदन देण्यात आले.

यावेळी श्री. पाटील यांनी शेतकऱ्यांचे झालेले नुकसान न भरून येणारे आहे. सुरवातीला दुष्काळी स्थिती होती. त्यानंतर अवकाळी पाऊस झाला. त्यामुळे शेतकरी हतबल आहे. याबाबत दिवाळीपूर्वी पिकविम्याची रक्कम देणार ही कृषीमंत्र्यांची घोषणा फोल ठरली. कांदा उत्पादकांना ३५० रुपये प्रती क्विंटल भरपाई देण्याचे आश्वासन प्रत्यक्षात आलेले नाही. द्रांक्षांच्या बागा नष्ट झाल्या. कापुस, केळी उत्पादकांना काहीच मिळालेले नाही. त्यामुळे राज्य सरकारने तातडीने दुष्काळ जाहीर करून आवश्यक सवलती द्याव्यात. शेतकऱ्यांचे पीककर्ज माफ करावे. बँकांनी वसुली स्थगित करावी, यांसह विविध दिलासादायक निर्णय घ्यावेत, अशी मागणी केली.

शेतकऱ्यांचे जेव्हा जेव्हा, जीथे नुकसान होईल, शेतकरी अडचणीत असेल, तेव्हा सर्वप्रथम त्याच्या मदतीला धाऊन जाणारे शरद पवार आहेत. त्यांनी आपल्या दहा वर्षांच्या कृषीमंत्री असतानाच्या कारकिर्दीत शेतकऱ्यांना दिलासा देणारे निर्णय घेतले. मात्र सध्याचे सरकार शेतकऱ्यांची कोंडी करीत आहेत. त्यांनी कांदा निर्यातीवर ४० टक्के शुल्क लागू केले आहे. त्यामुळे अगदी शेजारच्या बांगलादेशात देखील शेतकऱ्याचा माल जात नाही.

सध्याच्या केंद्र सरकारने शेतकऱ्याचे उत्पन्न दुप्पट करण्याचे आश्वासन दिले होते. मात्र आता त्यांनी अशी धोरणे राबविली की, शेतकऱ्याला उत्पन्नच राहीलेले नाही. त्यामुळे या सरकारला धडा शिकविण्याची वेळ आली आहे. शेतकरी व जनता त्यांना नक्कीच योग्य उत्तर देईल.

Jayant Patil & CM Eknath Shinde
Maratha Vs OBC : ओबीसी नेते बबनराव तायवडेंवर अखेर गुन्हा दाखल; काय आहे प्रकरण ?

यावेळी आमदार सुनिल भुसारा, मोर्चाचे समन्वयक दत्तात्रय पाटील, माजी आमदार शिरीष कोतवाल, कोंडाजी मामा आव्हाड, डॉ. सयाजी गायकवाड, माजी आमदार दीपिका चव्हाण, नितीन भोसले, पुरषोत्तम कडलग, शेखर माने, इंद्रजीत गावित, भास्कर भगरे आदी उपस्थित होते.

Jayant Patil & CM Eknath Shinde
Eknath Khadse On BJP:...तेव्हा भाजपने सनातन धर्म खुंटीवर टांगला होता का ?; एकनाथ खडसेंचा सवाल

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com