Shivsena UBT Politics: नाशिक मध्य शिवसेना ठाकरे पक्षाला?, वसंत गिते महाविकास आघाडीचे उमेदवार? आज होणार घोषणा!

Nashik Shiv Sena Candidate Announcement: शिवसेना नेते खासदार संजय राऊत आणि काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांच्यात चर्चेनंतर निर्णय झाल्याचे कळते.
Dr Hemlata Patil, Vasant Gite & Rahul Dive
Dr Hemlata Patil, Vasant Gite & Rahul DiveSarkarnama
Published on
Updated on

MVA Candidate Nashik Central: महाविकास आघाडीच्या बहुतांश जागा वाटपाचा तिढा संपुष्टात आला आहे. काल रात्री झालेल्या मॅरेथॉन बैठकांना यश आले आहे. आज याबाबत महत्त्वाची घोषणा अपेक्षित आहे. काँग्रेस पक्षाच्या इच्छुकांसाठी धक्कादायक नाव पुढे येण्याची चिन्हे आहेत.

नाशिक मध्य मतदारसंघावरून काँग्रेस आणि शिवसेना उद्धव ठाकरे पक्ष यांच्यात जोरदार स्पर्धा होती. गेले महिनाभर त्यासाठी दोन्ही पक्षाचे नेते अडून बसले होते. त्यामुळे स्थानिक नेत्यांत देखील तणाव होता.

नाशिक मध्य मतदारसंघावरून काँग्रेस आणि शिवसेना ठाकरे पक्षात एवढे ताणले गेले होते की, दोन्ही पक्ष स्वबळावर निवडणूक लढवितात की काय? अशी स्थिती निर्माण झाली होती. याबाबत काल सकारात्मक पुढाकार घेण्यात आला.

काँग्रेस विधिमंडळ नेते बाळासाहेब थोरात आणि शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांच्यात चर्चा झाली. या चर्चेत पक्षाची संघटना शक्ती, इच्छुक आणि निवडून येण्याची क्षमता असलेला उमेदवार हे निकष प्रमुख होते. त्यानुसार रात्री आठला याबाबतचा निर्णय झाल्याचे कळते.

Dr Hemlata Patil, Vasant Gite & Rahul Dive
Devyani Pharande Politics: भाजपकडे आमदार फरांदे यांना कोणता पर्याय; काँग्रेस इच्छुक संपर्कात असल्याची चर्चा!

काँग्रेसच्या नेत्यांनी नाशिक मध्य मतदारसंघ शिवसेनेला सोडण्याची तयारी दाखविल्याचे कळते. याबाबत आज घोषणा होण्याची शक्यता आहे. दरम्यान महाविकास आघाडीच्या इच्छुकांना आज एबी फॉर्म वाटप करण्यात येणार आहे. काही उमेदवारांना एबी फॉर्म देखील देण्यात आले.

नाशिकमध्ये मतदारसंघातील शिवसेना ठाकरे पक्षाचे इच्छुक माजी महापौर वसंत गीते यांना काल पक्ष नेत्यांनी एबी फॉर्म घेण्यासाठी मुंबईत बोलविले होते. ते अद्याप मुंबईतच असून आज दुपारी ते नाशिकला दाखल होतील.

दरम्यान काँग्रेसचे इच्छुक आणि स्थानिक नेते देखील नाशिक मध्य मतदारसंघासाठी आग्रही आहेत. अद्याप मतदारसंघ कोणत्या संकपक्षाकडे असेल याचा निर्णय झाला नसल्याचा त्यांचा दावा आहे. या इच्छुकांनी नाशिक मध्य मतदारसंघ प्रतिष्ठेचा विषय केला आहे.

Dr Hemlata Patil, Vasant Gite & Rahul Dive
Anuradha Nagawade : 'मशाल' हाती घेण्यासाठी पावलं 'मातोश्री'कडे; श्रीगोंद्यात बरचं काही फिस्कटणार?

या मतदारसंघात काँग्रेसकडे 16 जणांनी उमेदवारी मागितली होती. त्यातील काहींनी जिल्हाधिकारी कार्यालयातून उमेदवारी अर्ज देखील नेले आहेत. यामध्ये प्रामुख्याने पक्षाचे प्रदेश सचिव राहुल दिवे आणि माजी नगरसेविका डॉ हेमलता पाटील या आहेत.

डॉ हेमलता पाटील यांनी आपण कोणत्याही परिस्थितीत निवडणूक लढविण्याची मानसिकता तयार केली आहे. पक्षाने हा मतदार संघ सोडू नये. आपण निवडणूक लढविणारच असा पवित्र त्यांनी घेतला. त्यामुळे त्यातून त्यांना काय राजकीय संकेत द्यायचा आहे, त्याची चर्चा सुरू आहे.

मतदारसंघ शिवसेना ठाकरे पक्षाला सोडण्यात आल्याचे बोलले जाते. आता डॉ पाटील कोणता मार्ग स्वीकारणार याविषयी देखील विविध तर्क वितर्क केले जात आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com