Ajit Pawar Politics : काल गिरीश महाजनांना भुजबळांचा सल्ला, आज अजित पवारांनी थेट घोषणाच केली

Ajit Pawar challenge to BJP : जळगाव जिल्हा हा भाजपचा बालेकिल्ला मानला जातो. मात्र, येथे शिवसेना शिंदे गट आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने जोरदार विस्तार मोहीम सुरू केली आहे. त्यामुळे भाजपची राजकीय कोंडी होण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
Girish Mahajan & Ajit Pawar
Girish Mahajan & Ajit PawarSarkarnama
Published on
Updated on

Summary :

  • जळगावात शिवसेना शिंदे गटासोबत राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट)नेही जोरदार मोर्चेबांधणी सुरू केली आहे.

  • भाजपचा बालेकिल्ला मानल्या जाणाऱ्या जळगावात गिरीश महाजन यांच्यावर दबाव वाढणार आहे.

  • उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जळगाव राष्ट्रवादीमय करण्याचा निर्धार व्यक्त केल्याने राजकीय वातावरण तापले आहे.

Ajit Pawar News : नाशिक जिल्ह्याच्या पालकमंत्री पदावरून सुरू झालेली राजकीय शेरेबाजी थेट जळगावपर्यंत पोहोचली आहे. राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी शनिवारी जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांना जळगाव जिल्ह्याकडेही लक्ष देण्याच्या सूचना केल्या होत्या. त्याला मंत्री महाजन यांनी आज तेवढ्याच तत्परतेने उत्तर देखील दिले. पण या उत्तराच्या काहीच तासांच्या आत थेट अजित पवार यांनीच याला उत्तर दिलं आहे. त्यांनी भाजपचा बालेकिल्ला असणाऱ्या जळगाव जिल्ह्यात मोठा पक्ष प्रवेश करून घेतला आहे. यामुळे सध्या भुजबळ यांच्या सल्ल्याची जोरदार चर्चा होताना दिसत आहे.

आगामी स्थानिकच्या तोंडावर राज्यात मोठे राजकीय हालचाली होताना दिसत आहेत. विविध जिल्ह्यात मोठे पक्ष प्रवेश होत आहेत. महायुतीचे घटक पक्ष असलेल्या भाजप आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात पक्ष विस्ताराची स्पर्धाही पाहायला मिळत आहे. यादरम्यान उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत आदिवासी क्षेत्रात कार्यरत सामाजिक कार्यकर्त्या प्रतिभा शिंदे यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. त्यांच्या समवेत 28 सरपंचांसह विविध नेत्यांचा समावेश होता.

Girish Mahajan & Ajit Pawar
Ajit Pawar leader advice : स्थानिकच्या निवडणुकीमध्ये महायुती विसरून ताकद असल्यास लढा; अजितदादांच्या पक्षाच्या बड्या नेत्याचा सल्ला

यावेळी झालेल्या कार्यक्रमात उपमुख्यमंत्री पवार यांनी आपण सत्तेत का आहोत याचे स्पष्टीकरण देखील दिले. छगन भुजबळ यांसह येथे उपस्थित असलेले विविध नेते 30 ते 35 वर्ष राजकीय जीवनात काम करीत आहेत. सत्तेत असलो की लोकांची कामे करता येतात. कारण निर्णय घेण्याचे स्वातंत्र्य आपल्या हाती असते. त्यामुळेच आम्ही सत्तेत जाण्याचा निर्णय घेतल्याचे पवार म्हणाले.

यावेळी श्रीमती प्रतिभा शिंदे यांच्या निमित्ताने आदिवासींचे वन जमिनींचे पट्टे तसेच घरकुल आणि शेतीविषयक प्रश्न सोडविण्यासाठी पुढाकार घेणार आहे. लवकरच याबाबत संबंधित मंत्र्यांच्या उपस्थितीत अधिकाऱ्यांची बैठक घेतली जाईल. श्रीमती शिंदे यांना पक्षात आल्याचे समाधान वाटेल असे वातावरण आम्ही निर्माण करू.

माजी मंत्री अनिल भाईदास पाटील यांसह छगन भुजबळ, नरहरी झिरवाळ, माणिकराव कोकाटे यांसह कृषिमंत्री दत्ताभाऊ भारणे या सगळ्यांना सूचना करून प्रतिभाताई शिंदे यांच्या माध्यमातून धुळे आणि नंदुरबार पुण्यातही आदिवासी समाजाचे प्रश्न सोडवण्यासाठी पक्ष काम करेल, अशीही ग्वाही अजित पवार यांनी यावेळी दिली.

श्रीमती शिंदे यांच्या प्रवेशामुळे ग्रामीण भागात राष्ट्रवादी काँग्रेसला विस्ताराला अधिक संधी उपलब्ध होईल. त्या माध्यमातून आगामी काळात जळगाव जिल्हा राष्ट्रवादीमय करण्याचा निर्धार सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी केला पाहिजे. यासाठी मी सत्तेच्या माध्यमातून उपलब्ध होणारी सर्व ताकद तुमच्या मागे उभी करीन असे उपमुख्यमंत्री पवार यांनी सांगितले.

जळगाव हा भारतीय जनता पक्षाचा बालेकिल्ला आहे. महायुतीचा घटक म्हणून शिवसेना शिंदे पक्षाने जळगावमध्ये आपला विस्तार जोमाने सुरू केला आहे. आता त्यात राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षानेही ताकद झोकून देण्याचे ठरवले आहे. त्यामुळे सत्तेच्या माध्यमातून भाजपची राजकीय कोंडी होणार हे नक्की. अप्रत्यक्षपणे गिरीश महाजन यांना जळगाव जिल्ह्यात अधिक लक्ष द्यावे लागेल, असा संदेश त्यात आहे. शनिवारी भुजबळ यांनी महाजन यांना असाच सल्ला दिला होता. आज लगेचच उपमुख्यमंत्री पवार यांनी जळगाव राष्ट्रवादीमय करण्याचा निर्धार जाहीर केल्याने तो चर्चेचा विषय ठरला आहे.

Girish Mahajan & Ajit Pawar
Ajit Pawar : ‘शक्तिपीठ’वरून अजित पवारांनी सतेज पाटलांना फटकारलं, सावध पवित्राही घेतला; म्हणाले 'हा विषय महायुतीला न परवडणारा'

FAQs :

प्र.१: जळगाव कोणत्या पक्षाचा बालेकिल्ला मानला जातो?
उ: जळगाव हा भारतीय जनता पक्षाचा बालेकिल्ला मानला जातो.

प्र.२: अजित पवार यांनी काय घोषणा केली?
उ: त्यांनी जळगाव राष्ट्रवादीमय करण्याचा निर्धार व्यक्त केला आहे.

प्र.३: गिरीश महाजन यांच्यावर दबाव का येणार आहे?
उ: कारण शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेसने जळगावात जोरदार विस्तार मोहीम सुरू केली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com