Ajit Pawar Politics: पक्ष विस्तारासाठी अजित पवार उत्तर महाराष्ट्रात कोणाला गिफ्ट देणार, गुलाबराव देवकर की डॉ. सतीश पाटील यांना?

Ajit Pawar; Who will Ajit Pawar gift in North Maharashtra, Gulabrao Deokar or Satish Patil?-महामंडळ अथवा विधान परिषदेवर संधी देऊन राष्ट्रवादी काँग्रेसचा उत्तर महाराष्ट्रात प्रभाव वाढविण्याचा विचार?
Dr Satish Patil, Ajit Pawar & Gulabrao Devkar
Dr Satish Patil, Ajit Pawar & Gulabrao DevkarSarkarnama
Published on
Updated on

NCP Ajit Pawar News: राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाला उत्तर महाराष्ट्रात फारसे प्रभावी स्थान नाही. नाशिकचा अपवाद वगळता उत्तर महाराष्ट्रात हा पक्ष चाचपडताना दिसतो आहे. त्यातून मार्ग काढण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्वतः लक्ष घातले आहे

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला मोठा हादरा देण्यात उपमुख्यमंत्री अजित पवार नुकतेच यशस्वी झाले. जळगाव मध्ये माजी मंत्री गुलाबराव देवकर आणि सतीश पाटील यांनी नुकताच अजित पवार पक्षात प्रवेश केला आहे. त्यांच्यासमवेत दोन माजी आमदार ही दाखल झाले.

Dr Satish Patil, Ajit Pawar & Gulabrao Devkar
India Air Strike: धक्कादायक...सीमेवर युद्धाचा तणाव, अधिकारी मात्र देवदर्शन, पंचतारांकीत पाहुणचार अन् वाइनरीत रमले!

राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाला उत्तर महाराष्ट्रात आपला अविष्कार करायचा आहे. उपमुख्यमंत्र्यांनी त्यासाठी विविध प्रयोग करण्याचा प्रयत्न केला. मात्र त्याला यश आलेली नाही. आता उपमुख्यमंत्री पवार कोणता नवा मार्ग स्वीकारतात याची उत्सुकता आहे.

Dr Satish Patil, Ajit Pawar & Gulabrao Devkar
MIM Malegaon Politics: मालेगावात 'एमआयएम'ची पाकिस्तान मुर्दाबादची गर्जना, म्हणाले, महिलांसह भारतीय सैन्य पाकिस्तानचा दारुण पराभव करेल!

नाशिक जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाकडे सात आमदार आहेत. माणिकराव कोकाटे आणि नरहरी झिरवाळ या दोघांना मंत्रिपदाची संधी देण्यात आली आहे. मात्र जळगाव, धुळे आणि नंदुरबार या तीन जिल्ह्यात पक्षाची पाटी जवळपास कोरी आहे.

कृषिमंत्री कोकाटे यांना उपमुख्यमंत्र्यांनी नंदुरबार जिल्ह्याचे पालकमंत्री केले आहे. हा जिल्हा गुजरात लगत आणि दुर्गम असल्याने कृषिमंत्री कोकाटे हे आतापर्यंत केवळ दोनदा येथे दौऱ्यावर गेले आहेत. संघटनात्मक कामकाजासाठी मंत्री कोकाटे यांचा फारसा लौकिक नाही. त्यामुळे स्थानिक स्तरावर पक्षात नाराजी वाढत आहे.

नंदुरबार जिल्ह्यात भाजपचे माजी मंत्री डॉ विजयकुमार गावित आणि शिवसेना एकनाथ शिंदे पक्षाचे विधान परिषद सदस्य चंद्रकांत रघुवंशी यांचा प्रभाव आहे. या दोन्ही नेत्यांतच पारंपारीक राजकारण विभागले आहे. काँग्रेस पक्ष येथे स्वतःच्या ताकदीमुळे अद्यापही टिकून आहे. नव्या नेत्याला अथवा पक्षाला येथे फारशी संधी दिसत नाही.

त्यावर पर्याय म्हणून नुकतेच पक्षात आलेले गुलाबराव देवकर अथवा सतीश पाटील या दोन माजी मंत्र्यांना सत्तेत स्थान देऊन जळगाव व लगतच्या धुळे जिल्ह्यात राष्ट्रवादीचा विस्तार करण्याचा प्रयत्न असल्याचे बोलले जाते. त्यासाठी विधानपरिषद अथवा एखाद्या महामंडळाचे अध्यक्षपद देऊन या नेत्यांचे पुनर्वसन केले जाऊ शकते. या माध्यमातून पक्षाला विस्ताराचे संधी मिळेल असे बोलले जाते. मात्र पदाचे हे गिफ्ट कोणत्या नेत्याला मिळेल याची आता उत्सुकता आहे.

-----

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com