Sunil Tatkare News : नाशिकची जागा गमावल्याचं अजित पवार गटाला अद्यापही दुःख; सुनील तटकरे म्हणतात..

Political News : लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यात नाशिक मतदारसंघासाठी मतदान होणार आहे. त्यामुळे त्याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. २० मे ला नाशिकमध्ये मतदान होणार असले तरी या जागेवरून महायुतीमधील वाद थांबण्याचे नाव घेत नाही.
Sunil Tatkare
Sunil Tatkare NewsSarkarnama
Published on
Updated on

Nashik News : लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यात नाशिक मतदारसंघासाठी मतदान होणार आहे. त्यामुळे त्याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. २० मे ला नाशिकमध्ये मतदान होणार असले तरी या जागेवरून महायुतीमधील वाद थांबण्याचे नाव घेत नाही. या जागेवरून शेवटच्या क्षणापर्यंत महायुतीत तिढा पाहावयास मिळाला. या जागेवरून शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी अजित पवार गटात जोरदार रस्सीखेच सुरु होती. मात्र अगदी शेवटच्या क्षणी महायुतीकडून शिवसेना शिंदे गटाचे विद्यमान खासदार हेमंत गोडसे यांना उमेदवारी जाहीर केली. त्यामुळे ही हातची जागा गेल्याची खंत अजूनही राष्ट्रवादी काँग्रेसला वाटत आहे.

नाशिकच्या जागेवर महायुतीमधील भाजप (Bjp), शिवसेना शिंदे गट, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार (Ajit Pawar) गट यांनी नाशिकच्या जागेवर दावा सांगितला होता. त्यासोबतच उमेदवाराना तयारी सुरु करण्यास सांगितली होती. त्यामुळे सुरुवातीला विद्यमान खासदार हेमंत गोडसे (Hemant Godse) यांची धाकधूक काहीशी वाढली होती. (Sunil Tatkare News)

Sunil Tatkare
Lok Sabha Election 2024 News :'गेम ओव्हर फॉर मोदी!'; वाढदिवस डी. के. शिवकुमारांचा अन् चर्चा केरळ काँग्रेसच्या ट्विटची

दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ हे नाशिक मतदारसंघासाठी प्रमुख इच्छुक उमेदवार होते. त्यामुळे खासदार गोडसे यांना उमेदवारी मिळणार नसल्याचे ते छातीठोकपणे सांगत त्यांनी तयारी केली होती. महायुतीमधील तीनही घटक पक्षात नाशिकच्या जागेवरून मोठी रस्सीखेच पाहवयास मिळाली. उमेदवारी मिळवण्यासाठी व जागा सोडून घेण्यासाठी गोडसेना आठवड्यातून दोन ते तीनवेळा मुंबईची वारी करावी लागत होती. त्यासाठी त्यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची वारंवार भेट घ्यावी लागत होती. यावर आता राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी विधान केले आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे गुरुवारी नाशिकमध्ये दाखल झाले. त्यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांची बैठक झाली. बैठकीनंतर माध्यमांशी संवाद साधताना सुनील तटकरे म्हणाले की, एनडीएचे आम्ही घटक आहोत. राहिलेल्या तीन दिवसात राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी प्रचार करण्यासाठी बैठक झाली आहे. नाशिकमधून उमेदवार घोषित करायला उशीर झाला हे निश्चित आहे. आम्ही भाजप व सेनेच्या पाठीशी राहणार आहोत. आतापर्यंत विरोधात निवडणूक लढलो आहोत. मात्र आता महायुतीत असल्याने अखेरच्या टप्यात सगळ्यांनी सक्रिय होण्याच्या सूचना दिल्या असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

राज्यात चार जागा मिळाल्यानंतरही नाशिकची लोकसभा उमेदवारी मिळवण्यात आम्हाच्या राष्ट्रवादी पक्षाला अपयश आले हे मान्य आहे. मात्र, आता आम्ही महायुतीत असून प्रचार सुरू केला आहे. अजितदादांची तब्येत ठीक नसल्याने ते बुधवारी सुद्धा मुंबईत हजर नव्हते. त्यामुळे आज मी नाशिकला आलो आहे. नाशिक आणि दिंडोरी या दोन्ही मतदारसंघातील पदाधिकाऱ्यांची गुरुवारी बैठक घेऊन त्यांना सूचना दिल्या असल्याचे तटकरे यांनी स्पष्ट केले.

माणिकराव कोकाटेंची नाराजी दूर

सिन्नरचे आमदार माणिकराव कोकाटे हेमंत गोडसे यांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर काही दिवस नाराज होते. त्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मध्यस्थी केल्यानंतर त्यांची नाराजी दूर झाली आहे. माणिकराव कोकाटे स्पष्ट वक्ते असल्याचे त्यांनी सांगितले.

Sunil Tatkare
Nashik Lok Sabha Analysis : नरेंद्र मोदींची सभा हेमंत गोडसेंना पुन्हा खासदारकीपर्यंत पोहचवणार का ?

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com