Lok Sabha Election 2024 News :'गेम ओव्हर फॉर मोदी!'; वाढदिवस डी. के. शिवकुमारांचा अन् चर्चा केरळ काँग्रेसच्या ट्विटची

Political News : लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने धडाकेबाज समजले जाणारे कर्नाटकचे उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार पुन्हा चर्चेत आले आहेत. दक्षिणेतील राज्यांमध्ये भाजपला किती जागा मिळू शकतात, याबाबत त्यांनी छातीठोकपणे दावा केला आहे.
Narendra Modi, Dk shivkumar
Narendra Modi, Dk shivkumar Sarkarnama

Congress News : कर्नाटक विधानसभेच्या 2023 मध्ये झालेल्या निवडणुकीत काँग्रेसला किती जागा मिळतील, याचा अंदाज डी. के. शिवकुमार यांनी वर्तवला होता. तो तंतोतंत खरा ठरला होता. लोकसभा निवडणुकीत दक्षिणेतील राज्यांत भाजपला किती जागा मिळणार, याबाबही त्यांनी अंदाज व्यक्त केला आहे. केरळ काँग्रसेने त्याचा हवाला डी. के. यांच्या वाढदिवसानिमित्त देत गेम ओव्हर फॉर मोदी... असे ट्वीट केले आहे. त्यावर राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे.

लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने कर्नाटकचे उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार (D. K. Shivkuamar) पुन्हा चर्चेत आले आहेत. दक्षिणेतील राज्यांमध्ये भाजपला (Bjp) किती जागा मिळू शकतात, याबाबत त्यांनी छातीठोकपणे दावा केला आहे. गेल्यावर्षी झालेल्या कर्नाटक विधानसभेच्या निवडणुकीतही त्यांनी काँग्रेसला (Congress) किती जागा मिळतील, याबाबत अंदाज व्यक्त केला होता. तो अचूक ठरला होता. त्याचा दाखला देत केरळ काँग्रेसने ट्वीटरवर (X)एक पोस्ट केली आहे. त्यावरून राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे. (Lok Sabha Election 2024 News)

Narendra Modi, Dk shivkumar
Dindori constituency 2024: दिंडोरीचे वातावरण अनुकूल करण्यात नरेंद्र मोदींची सभा यशस्वी

डी. के. शिवकुमार यांचा 15 मे रोजी वाढदिवस होता. त्यानिमित्ताने केरळ काँग्रेसने हे ट्वीट केले आहे. कर्नाटक विधानसभेच्या निवडणुकीत डी. के. शिवकुमार आणि मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी भाजपच्या शक्तिशाली, प्रभावी यंत्रणेचा अत्यंत कौशल्याने सामना करत सत्ता खेचून आणली होती. भाजपने ध्रुवीकरणाचा प्रयत्न केला होता, मात्र काँग्रेसने उचललेल्या महागाई, भ्रष्टाचाराच्या मुद्द्यांसमोर भाजपची रणनिती अयशस्वी ठरली होती.

136 जागा जिंकत काँग्रेसने स्पष्ट बहुमत मिळवले होते. डी. के. शिवकुमार यांना मुख्यमंत्रिपद मिळेल, अशी चर्चा होती, मात्र अनुभवाच्या बळावर सिद्धरामय्या मुख्यमंत्री बनले. डी. के. शिवकुमार यांनी हा निर्णय स्वीकारला. त्यानंतर डी. के. शिवकुमार आणखी प्रसिद्धीच्या झोतात आले.

निवडणूक लढवताना भाजप एकही संधी सोडत नाही, एकही उणीव राहू देत नाही. त्यानुसार भाजपने या लोकसभा निवडणुकीत दक्षिणेतील राज्यांवर लक्ष केंद्रीत केले आहे. कर्नाटकात लोकसभेच्या 28 जागा आहेत. गेल्या निवडणुकीत भाजपने 26 जागा जिंकल्या होत्या. त्या कामगिरीची पुनरावृत्ती करण्यासाठी भाजपने जोर लावला आहे, मात्र अंतर्गत गटबाजीचा भाजपला याही निवडणुकीत सामना करावा लागत आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

काँग्रेसची धुरा अर्थातच डी. के. शिवकुमार यांच्या खांद्यावर आहे. अशातच केरळ काँग्रेसने डी. के. यांच्या वाढदिवसानिमित्त एक ट्वीट केले असून, त्याची चर्चा सुरू झाली आहे. कर्नाटक विधानसभेच्या निवडणुकीत काँग्रेसला किती जागा मिळतील, याबात डी. के. यांनी अंदाज वर्तवला होता. तेवढ्याच जागा काँग्रेसला मिळाल्या होत्या. केरळ काँग्रसेने केलेले ट्वीट याच्याशी संबंधितच आहेत.

दक्षिणेतील राज्यांत लोकसभेच्या 130 जागा आहेत. भाजपला त्यापैकी फक्त 10 जागा मिळतील, असा दावा डी. के. यांनी केला आहे. त्यावरून, गेम ओव्हर फॉर मोदी..! अशी टॅगलाइन देऊन हे ट्वीट करण्यात आले आहे. 2023 मध्ये कर्नाटक विधानसभेची निवडणूक झाली होती. त्यावेळी डी. के. यांनी काँग्रेसला 136 जागा मिळतील असा अंदाज व्यक्त केला होता आणि तो खरा ठरला.

आता लोकसभेच्या निवडणुकीतही डी. के. यांचा अंदाज खरा ठरणार आहे. पोस्टल मतांची रात्री उशीरापर्यंत पुन्हा पुन्हा मोजणी करून भाजपने जयनगरची जागा चोरली होती. आता डी. के. यांनी दक्षिणेतील राज्यांतील 130 जागांपैकी भाजपला फक्त 10 जागा मिळतील, असा अंदाज वर्तवला आहे आणि मोदींचा खेळ खल्लास झाला आहे, असे या ट्वीटमध्ये म्हटले आहे.

Narendra Modi, Dk shivkumar
Ajit Pawar 'Not Reachable' : अजित पवारांच्या ‘नॉट रिचेबल’चे कारण आले पुढे; राष्ट्रवादीकडून स्पष्टीकरण

डी. के. यांनी अंदाज वर्तवल्याप्रमाणे विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला 136 जागा मिळाल्या होत्या, हे विशेष. ते असा दावा करत असलेला व्हिडीओही केरळ काँग्रसेने या ट्वीटसोबत जोडला आहे. या निवडणुकीनंतर काँग्रेस आणि इंडिया आघाडी बहुमत मिळवत सत्तेवर येईल, असा दावाही डी. के. यांनी नुकताच केला आहे.

आता देशात भाजपची सत्ता येणार नाही. काँग्रेसच्या नेतृत्वाखाली इंडिया आघाडीची देशात सत्ता येईल, याचा आम्हाला पूर्ण विश्वास आहे, असे डी. के. यांनी गेल्या रविवारीच म्हटले होते. दरम्यान, दुष्काळी परिस्थितीमुळे माझा वाढदिवस साजरा करू नये, असे आवाहन त्यांनी कार्यकर्ते आणि चाहत्यांना केले होते.

दरम्यान, डी. के. यांनी विधानसभा निवडणुकीत वर्तवलेला अंदाज अचूक ठरला होता. आता भाजपला दक्षिणेतील राज्यांत किती जागा मिळतील, याबाबतही त्यांनी अंदाज व्यक्त केला आहे. केरळ काँग्रेसने त्याची आठवण करून दिल्याने राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे.

(Edited By : Sachin Waghmare)

Narendra Modi, Dk shivkumar
DK Shivakumar News : सुप्रीम कोर्टाकडून ‘ईडी’ला दणका; काँग्रेस संकटमोचक शिवकुमारांवरील ‘ती’ केस रद्द

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com