Child Marriage Crisis : धक्कादायक वास्तव! 55 ‘बालमाता’, बालविवाह रोखा, महिला आयोगाकडे तातडीच्या उपाययोजनांची मागणी

Child marriage and teenage pregnancy concerns : वंचित बहुजन आघाडीच्या उत्कर्षा रूपवते यांनी राज्य महिला आयोगाकडे अहिल्यानगर जिल्ह्यातील अकोले या आदिवासी भागातील गंभीर सामाजिक संकटावर लक्ष वेधलं आहे.
Child Marriage Under Spotlight After 55 Child Mothers Identified
Child Marriage Under Spotlight After 55 Child Mothers IdentifiedSarkarnama
Published on
Updated on

Ahilyanagar Child Marriage Issue : राज्य महिला आयोग सदस्या तथा वंचित बहुजन आघाडीच्या राज्य प्रवक्त्या उत्कर्षा रूपवते यांनी महाराष्ट्र राज्य सरकारच्या महिला आयोगाकडे गंभीर मुद्दा उपस्थित करत, अहिल्यानगरच्या अकोले तालुक्यात वाढत असलेल्या बालविवाह आणि बालमाता समस्येवर तातडीने ठोस कृती कार्यक्रम राबविण्याची मागणी केली आहे.

या संदर्भात माजी राज्य महिला आयोग सदस्या आणि वंचित बहुजन आघाडीच्या राज्य प्रवक्त्या उत्कर्षा रूपवते यांनी महिला आयोगाच्या सदस्य सचिव नंदिनी आवडे यांची भेट घेत सविस्तर चर्चा केली.

अकोले हा आदिवासीबहुल तालुका असून शिक्षण (Education), आरोग्य आणि मूलभूत सुविधांमध्ये काही प्रमाणात प्रगती होत असली, तरी दुर्गम भागांमध्ये बालविवाहासारख्या अनिष्ट प्रथा अजूनही सुरू असल्याचे चिंताजनक वास्तव त्यांनी आयोगासमोर मांडले.

उपलब्ध प्राथमिक माहितीनुसार ऑगस्ट ते ऑक्टोबर 2025 या केवळ तीन महिन्यांच्या कालावधीत अकोले (Akole) तालुक्यातील विविध गावांमध्ये तब्बल 55 बालमाता (Woman) आढळून आल्या आहेत. प्रत्यक्षातील संख्या यापेक्षा अधिक असण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली असून, यामुळे प्रशासन आणि सामाजिक यंत्रणांसमोर गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे.

Child Marriage Under Spotlight After 55 Child Mothers Identified
55 Minor Girls Mothers : अकोले हादरलं! 55 अल्पवयीन माता; आदिती तटकरे यांच्या खात्याच्या कारभारावर प्रश्नचिन्ह, राज्य बालहक्क आयोग 'अ‍ॅक्शन मोड'वर

या गंभीर परिस्थितीचा सखोल अभ्यास करण्यासाठी महिला आयोगामार्फत विशेष अभ्यास गट किंवा उच्चस्तरीय समिती स्थापन करावी, अशी मागणी करण्यात आली. त्याचबरोबर शासकीय विभाग, स्वयंसेवी संस्था, शैक्षणिक संस्था आणि सामाजिक संघटनांना एकत्र आणून व्यापक जनजागृती मोहीम आणि प्रतिबंधात्मक उपाययोजना राबविण्याची आवश्यकता अधोरेखित करण्यात आली.

Child Marriage Under Spotlight After 55 Child Mothers Identified
Doctor Controversy : ‘बाबासाहेबांवर आक्षेपार्ह पोस्ट’; संतप्त भीमसैनिकांचा डॉक्टरला धडा, तोंडाला शाई फासत चपलांचा हार

याबाबत बोलताना उत्कर्षा रूपवते म्हणाल्या की, बालविवाह आणि बालमाता ही केवळ सामाजिक समस्या नाही, तर भावी पिढीच्या आरोग्य, शिक्षण आणि सुरक्षित भविष्याशी संबंधित गंभीर बाब आहे. यासाठी सर्व संबंधित घटकांना सोबत घेऊन प्रभावी हस्तक्षेप करणे अत्यावश्यक आहे.

महिला आयोगाने या विषयाची गांभीर्याने दखल घेऊन योग्य स्तरावर तातडीने कारवाई करावी, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली. बालकांचे शिक्षण, आरोग्य आणि सुरक्षित भविष्य वाचवण्यासाठी समाजातील प्रत्येक घटकाने आता एकत्र येण्याची वेळ आली आहे, असेही मत यावेळी मांडण्यात आले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com