Kumbh Mela Controversy : "गिरीश महाजन कुंभमेळ्याची दलाली खाण्यात मग्न, त्यांचे नातेवाईक बोगस ऑर्डर..."; ठाकरेंच्या नेत्याचा गंभीर आरोप

Ambadas Danve on Girish Mahajan : मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी समोर आणलेल्या ५०० कोटी रुपयांच्या कथित ऑडिओ क्लिपवरही दानवे यांनी प्रतिक्रिया दिली. ५०० कोटी रुपये कोणी दिले आणि कोणाला दिले, याची माहिती संबंधित महिलेला आहे. ही महिला भाजपच्या मीडिया टीमशी संबंधित असल्याचा दावाही त्यांनी केला.
Girish Mahajan | Kumbh Mela
Girish Mahajan | Kumbh Mela Sarkarnama
Published on: 
Updated on: 

Kumbh Mela Controversy : मंत्री गिरीश महाजन यांच्यावर शिवसेना ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते अंबादास दानवे यांनी जोरदार निशाणा साधला आहे. कुंभमेळ्याच्या कामांमध्ये महाजन दलाली करण्यात व्यस्त असल्याचा गंभीर आरोप दानवे यांनी केला. जनतेच्या सुख-दुःखाशी त्यांना काहीही देणंघेणं नाही. सत्तेची फळं चाखण्यातच त्यांचा वेळ जात आहे, अशा शब्दांत दानवे यांनी महाजनांवर टीका केली. जळगावमध्ये प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी हा हल्लाबोल केला.

गिरीश महाजन यांचे नातेवाईक बोगस ऑर्डर प्रकरणात पकडले गेल्याचा दावाही दानवे यांनी केला. सत्तेत असलेले नेते आता मोठे भांडवलदार आणि सरंजामदार झाले आहेत. त्यांना सर्वसामान्य जनतेच्या अडचणींशी काहीही देणंघेणं राहिलेलं नाही. हे नेते मुंबई आणि पुण्यातच असतात. जनतेच्या सुख-दुःखात सहभागी होण्यासाठी त्यांच्याकडे वेळ नसतो, अशी टीका त्यांनी केली.

५०० कोटींच्या प्रकरणात महिलेवर कारवाईची मागणी

दरम्यान, मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी समोर आणलेल्या ५०० कोटी रुपयांच्या कथित ऑडिओ क्लिपवरही दानवे यांनी प्रतिक्रिया दिली. ५०० कोटी रुपये कोणी दिले आणि कोणाला दिले, याची माहिती संबंधित महिलेला आहे. ही महिला भाजपच्या मीडिया टीमशी संबंधित असल्याचा दावाही त्यांनी केला.

Girish Mahajan | Kumbh Mela
Nanded Farmer Death : 10 हजारांच्या वसुलीसाठी शेतकऱ्याला घरातून उचललं; दोन दिवसांनी फायनान्स ऑफिसमध्ये आढळला मृतदेह, कुटुंबीयांच्या आरोपाने खळबळ

या प्रकरणात संबंधित महिलेवर गुन्हा दाखल करून तिची चौकशी केली पाहिजे. तिला तुरुंगात टाकलं पाहिजे, अशी मागणी दानवे यांनी केली. एखाद्या सामान्य व्यक्तीच्या बाबतीत असा प्रकार घडला असता, तर पोलिसांनी तातडीने कारवाई केली असती. मग राज्यातील पोलीस यंत्रणा झोपली आहे का? असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

या संपूर्ण प्रकरणाचा तपास होणं गरजेचं असल्याचं दानवे म्हणाले. ५०० कोटी रुपये नेमके कुठून आले आणि ते कोणाला देण्यात आले, याचा शोध घेतला पाहिजे. केवळ आरोप-प्रत्यारोप न करता या प्रकरणातील सत्य बाहेर आणण्यासाठी चौकशी झाली पाहिजे, अशी भूमिका त्यांनी मांडली.

Girish Mahajan | Kumbh Mela
Baramati Crime: बारामतीतून हादरवणारी अपडेट; उद्योजक राणा सूर्यवंशींचा स्वत:वरच हल्ला...,'व्हीआयपी' पोलिस संरक्षणाची हौस पडली महागात

एकीकडे कुंभमेळ्याच्या कामांवरून गिरीश महाजन यांना लक्ष्य करत दानवे यांनी गंभीर आरोप केले आहेत, तर दुसरीकडे ५०० कोटींच्या कथित प्रकरणावरूनही सरकारला घेरण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे दानवे यांच्या टीकेला महाजन आणि भाजपकडून काय प्रत्युत्तर दिलं जातं, याकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलं आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com