Girish Mahajan : हा अमित ठाकरेंचा बालिशपणा, PM मोदींना लिहलेल्या 'त्या' पत्रावरुन महाजन यांनी घेतला समाचार

Girish Mahajan criticizes Amit Thackeray over letter to PM Modi : हे लोक प्रसिद्धीसाठी का असे पत्र लिहितात? हे मला काही कळत नाही. असं पत्र लिहिण्याची काहीच आवश्यकता नाही असा टोला यावेळी महाजन यांनी अमित ठाकरे यांना लगावला आहे.
Girish Mahajan
Girish MahajanSarkarnama
Published on
Updated on

Amit Thackeray : मनसे प्रमुख राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना एक पत्र लिहलं आहे. त्या पत्रातून भारत-पाकिस्तान शस्त्रसंधीनंतर देशभरात निघणाऱ्या तिरंगा यात्रांवर आणि साजऱ्या होणाऱ्या जल्लोषावर त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. युद्धाचा निकाल अद्याप स्पष्ट नसताना विजयाचा जल्लोष टाळावा, थोडा संयम बाळगावा अशी विनंती अमित ठाकरे यांनी या पत्राच्या माध्यमातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना केली आहे. त्यावरुन भाजप नेते व मंत्री गिरीश महाजन यांनी अमित ठाकरे यांचा चांगलाच समाचार घेतला आहे.

गिरीश महाजन म्हणाले, संपूर्ण देशाने आणि जगाने बघितले आहे की, आपण काय केलं आहे. तुम्हाला त्याबाबतही काही शंका आहे का? हे लोक प्रसिद्धीसाठी का असे पत्र लिहितात? हे मला काही कळत नाही. असं पत्र लिहिण्याची काहीच आवश्यकता नाही असा टोला यावेळी महाजन यांनी अमित ठाकरे यांना लगावला आहे.

सगळ्या जगाने पाहिले आहे की, आमच्या सैन्याने काय केले आहे. तुम्हाला आता रिझल्ट पाहिजे, उत्तर पत्रिका पाहिजे, हा सगळा बालिशपणा सुरु आहे, असं गिरीश महाजन म्हणाले.

जळगावमधील ड्रग्स प्रकरण सध्या गाजत आहे. हे प्रकरण दडपण्यासाठी सत्ताधाऱ्यांमधील एक स्वीय सहायक काम करत असल्याचा दावा एकनाथ खडसे यांनी केला आहे. याबाबत विचारले असता गिरीश महाजन म्हणाले की, एकनाथ खडसे यांच्याबद्दल आता मी काय बोलणार? कुठेही काही झालं तरी त्यांना आता मीच दिसतो. पोलीस अधिकारी पोटे आरोपीसोबत फोनवर वारंवार बोलत होते. त्यांच्यावर तत्काळ निलंबनाची कारवाई झाली आहे. मग कशासाठी आपण फालतू बडबड करायची? असं महाजन म्हणाले.

Girish Mahajan
Mangesh Chavan : पोलीस कर्मचाऱ्यावर तीन लाखांच्या खंडणीचा आरोप, भाजप आमदाराचा पोलिस ठाण्यातच ठिय्या

बीडमध्ये एका टोळक्याकडून शिवराज दिवटे नावाच्या तरुणाला बेदम मारहाण करण्यात आल्याची घटना घडली आहे. यामध्ये तो तरुन गंभीर जखमी झाला होता. यावर देखील महाजन यांनी यावेळी प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले मी सुद्धा ही बातमी बघितली. त्या तरुणाला खूप अमानुषपणे मारहाण झाली. या प्रकरणात कारवाई होत आहे, अधिक कठोर कारवाई त्यात होईल. समाजामध्ये मानसिक विकृतीच एवढी वाढली आहे तर त्याला आता कोण काय करणार? पुढे असे काही घडणार नाही, असा चोख बंदोबस्त पोलीस करतील असं महाजन यांनी सांगितलं.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com