Mangesh Chavan : पोलीस कर्मचाऱ्यावर तीन लाखांच्या खंडणीचा आरोप, भाजप आमदाराचा पोलिस ठाण्यातच ठिय्या

BJP MLA Mangesh Chavan Accuses Police of Extortion : जिल्ह्यातील चाळीसगाव शहर पोलिसांवर भाजपचे आमदार मंगेश चव्हाण यांनी गंभीर स्वरूपाचे आरोप करत वातावरण तापवले आहे. त्यांनी पोलिस ठाण्यातच ठिय्या दिला आहे.
Mangesh Chavan
Mangesh ChavanSarkarnama
Published on
Updated on

Jalgaon police news : जळगाव जिल्ह्यातील एका पोलीस कर्मचाऱ्यावर गंभीर आरोप झाला असून, त्याने एका गुन्ह्यातून नाव वगळण्यासाठी तीन लाख रुपयांची मागणी केली होती, असा दावा भाजपाचे आमदार मंगेश चव्हाण यांनी केला आहे. या व्यवहारात नंतर एक लाख रुपये घेतल्याचेही ते म्हणाले. या प्रकरणात संबंधित पोलीस कर्मचाऱ्यावर गुन्हा दाखल करावा आणि तत्काळ अटक करावी, या मागणीसाठी आमदार चव्हाण यांनी थेट पोलीस ठाण्यात ठिय्या मांडला आहे. त्यांनी स्पष्टपणे सांगितले की, "जोपर्यंत गुन्हा दाखल होत नाही, तोपर्यंत आम्ही पोलिस ठाणे सोडणार नाही."

जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव शहर पोलिसांवर भाजपचे आमदार मंगेश चव्हाण यांनी गंभीर स्वरूपाचे आरोप करत वातावरण तापवले आहे. एका गुन्ह्यातून नाव वगळण्यासाठी पोलिसांनी एका तरुणाकडून तब्बल तीन लाख रुपयांची मागणी केली, असा ठपका आमदार चव्हाण यांनी ठेवला आहे. यानंतर तडजोड करत एक लाख रुपये स्वीकारल्याचा आरोपही त्यांनी केला.

ही माहिती समोर आल्यानंतर आमदार चव्हाण यांनी संबंधित पोलीस अधिकाऱ्याच्या उपस्थितीत त्या तरुणाशी थेट संवाद साधला. संवादादरम्यान पोलिस अधिकाऱ्याने चौकशी करून योग्य ती कारवाई केली जाईल, असे आश्वासन दिले. मात्र, आमदारांनी स्पष्ट भूमिका घेत "जोपर्यंत आरोपी पोलीस कर्मचाऱ्यावर गुन्हा दाखल होत नाही, तोपर्यंत पोलीस ठाणे सोडणार नाही," असा इशारा दिला.

Mangesh Chavan
Nashik News : भर सभेत लॉरेन्स बिश्नोईचे फोटो झळकवणारे राहुल हांडोरे, विशाल करकसे पोलिसांच्या ताब्यात

आमदार मंगेश चव्हाण हे चाळीसगाव शहर पोलीस ठाण्यात तळ ठोकून बसले आहेत. खंडणीखोर पोलिसांवर गुन्हा दाखल करून अटक करा, अशी मागणी त्यांनी लावून धरली आहे. यावेळी पोलीस अधिकाऱ्याशी संवाद साधताना आमदार चव्हाण म्हणाले, आताच्या आता त्या पोलीस कर्मचाऱ्यावर खंडणीचा गुन्हा दाखल करा, त्याला अटक करा. पोलीस ठाण्याजवळ अनेक अवैध व्यवसाय सुरु आहे. त्यासंदर्भात कारवाई का होत नाही? असा सवाल चव्हाण यांनी पोलिसांना केला.

Mangesh Chavan
Uddhav Thackeray : आपल्या फायरब्रॅण्ड नेत्यावर उद्धव ठाकरेंनी सोपवली 'या' प्रमुख जिल्ह्यांची जबाबदारी

चाळीसगावमधील पंचायत समितीमध्ये शेतकऱ्यांकडून अनुदान मंजुरीसाठी लाच मागितली जात असल्याचा गंभीर आरोप भाजप आमदार मंगेश चव्हाण यांनी केला होता. काही दिवसांपूर्वी त्यांच्या निदर्शनास आले की, विहिरीसारख्या योजनांसाठी शेतकऱ्यांकडून २० ते ३० हजार रुपये मागितले जात आहेत, अशी तक्रार लाभार्थी शेतकऱ्यांनी त्यांच्याकडे केली होती. ही माहिती मिळताच आमदार चव्हाण यांनी थेट पंचायत समितीला भेट दिली. तेथील संबंधित कर्मचाऱ्यांना त्यांनी याबाबत थेट जाब विचारत दोन दिवसांची मुदत दिली. “दोन दिवसांत दोषींवर कारवाई झाली नाही, तर तीव्र आंदोलन छेडू,” असा इशारा दिला होता.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com