माझी बांधिलकी जनतेशीच, फक्त विकासासाठी भाजप बरोबर!

बलकुवे येथे राजकीय पक्षाच्या पदाधिकाऱ्यांचा भाजपमध्ये प्रवेश
Amrishbhai Patel
Amrishbhai PatelSarkarnama
Published on
Updated on

शिरपूर : केंद्र, (Centre) राज्यासह (State) स्थानिक स्वराज्य संस्थेतही (Local self Government) एका पक्षाची सत्ता असल्यास विकासाचा (Devolopment) वेग वाढतो. निधी मिळवणे सुलभ (Funds availablity) होते. गेल्या ४० वर्षांपासून सुरु असलेल्या विकासकामांची गती वाढवण्यासाठी भारतीय जनता पक्षात (BJP) सहभागी झालो. आपली बांधिलकी जनतेशी आहे हे नेहमी लक्षात ठेवा असे आवाहन माजी मंत्री आमदार अमरिशभाई पटेल (Amrishbhai Patel) यांनी केले. (If centre & State hav same party government then easy for devolopment)

Amrishbhai Patel
आनंदाचा शिधा... शिंदे सरकारच्या घोषणेतील गोडवा गायब!

बलकुवे (ता.शिरपूर) येथील सरपंच प्रदीप चव्हाण, ग्रामपंचायत सदस्य व तरुणांनी मोठ्या संख्येने भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. त्या वेळी ते बोलत होते.

Amrishbhai Patel
शिंदे- ठाकरे वाद; नाशिक पोलिस जरा जास्तच सक्रीय झाले!

यावेळी डॉ. तुषार रंधे म्हणाले, आमदार पटेल यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा परिषदेअंतर्गत विविध योजनांमधून विकास कामांना गती दिली. बलकुवे गावासाठी मोठ्या प्रमाणात विकासासाठी निधी उपलब्ध करुन दिला. आ. पटेल यांच्या विकासाभिमुख धोरणाचे अनुकरण सुरु आहे.

ग्रामीण भागाचा विकास आ.पटेल यांच्या माध्यमातूनच शक्य आहे हे दिसून आल्याने भाजप प्रवेशाचा निर्णय घेतला. त्यांच्या नेतृत्वाखाली काम करणार असून, गावाच्या विकासासाठी विशेष लक्ष द्यावे अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

यावेळी आमदार काशिराम पावरा, प्रियदर्शिनी सूतगिरणीचे अध्यक्ष भूपेशभाई पटेल, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष डॉ. तुषार रंधे, जिल्हा परिषद उपाध्यक्ष देवेंद्र पाटील, जिल्हा बँकेचे संचालक प्रभाकर चव्हाण, भाजपचे माजी तालुकाध्यक्ष राहुल रंधे, शहराध्यक्ष हेमंत पाटील, सरपंच प्रदीप चव्हाण, दीपक गुजर, विजय बागूल आदी उपस्थित होते.

...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com