

Nashik TCS case : नाशिकमधील टीसीएस (TCS) कंपनीत मुस्लीम धर्मीय संशयितांकडून हिंदू महिला कर्मचाऱ्यांचे लैंगिक शोषण, विनयभंग व जबरदस्तीने धर्मांतर करण्याचा प्रयत्न झाल्याचे उघडकीस आले आहे. देशभरात या धक्कादायक प्रकरणाची चर्चा असताना आता राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी एक मोठा गौप्यस्फोट केला आहे.
कॉर्पोरेट सेक्टरमध्ये अमृता फडणवीस यांनीही बराच काळ काम केले आहे. त्याअनुषंगाने नाशिकच्या TCS कंपनीत घडलेल्या प्रकाराकडे आपण कसे बघता असा सवाल माध्यम प्रतिनिंधीनी त्यांना विचारला. त्यावर अमृता फडणवीस यांनी प्रतिक्रिया देताना म्हटले की, खूप खराब वाटत आहे आणि खेद वाटतो की, कॉर्पोरेट सेक्टरमध्ये असे प्रकार होत आहे. हे अतिशय वाईट आहे.
मी ॲक्सिस बँकेत काम करत असताना माझ्यासमोर अशी प्रकरणे झाली होती. मात्र, त्याविरोधात व्हिसल ब्लोइंग होऊन कायदेशीर आणि कॉर्पोरेट कायद्यांतर्गत कारवाई झाली आहे. वरिष्ठांनी तत्काळ त्या प्रकरणात कारवाई केली होती, अशी माहिती माध्यमांशी बोलताना अमृता फडणवीस यांनी दिली.
नेमकं काय झालं होतं असं विचारल्यावर अमृता फडणवीस म्हणाल्या, माझ्याही वेळेस, मी जेव्हा ॲक्सिस बँकेत नोकरी करत होती तेव्हा अशा केसेस माझ्यासमोर झालेल्या आहेत. त्यावेळी वरिष्ठांकडून त्या मुलांच्या विरोधात योग्य ती कारवाई करण्यात आली होती. मला असं वाटतं की, असं झाल्यानंतर तत्काळ कारवाई करणे गरजेचे आहे. तसेच सर्वात महत्वाचे म्हणजे समाजाला आणि आपल्या वरिष्ठांना सांगणे जरुरीचं आहे. त्याच्यानेच हे पुढे जाऊन बंद होणार असल्याचे मत अमृता फडणवीस यांनी मांडलं.
तसेच, परतवाडा येथील सेक्स स्कँडलच्या मुद्द्यावरदेखील अमृता फडणवीस यांनी भाष्य केलं. लव्ह जिहाद प्रकरण भयानकच असून आपल्या मुलींना देखील थोडं अलर्ट राहायला सांगणे गरजेचे आहे. आपण आपल्या संस्कृतीवर प्रामाणिकपणे प्रेम केल्यास असे प्रकार होत नाही. (Nashik News)
लव्ह जिहादसारख्या प्रकरणांवर योग्य कारवाई होत आहे. परंतु आता मुलींनी जास्त सावध राहण्याची गरज असल्याचं त्या म्हणाल्या. आपले तरुण सध्या संभ्रमात असून त्यांना आपल्या पुराणांची आणि वेदांची माहिती नाही. त्यामुळे भारतीय संस्कृतीवर आधारित शिक्षण देणं आवश्यक असल्याचे अमृता फडणवीस म्हणाल्या.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.