Anandacha Shidha : गरीबांच्या आनंदाच्या शिध्यावर कुणी मारला डल्ला?

Pathardi Fraud : पाथर्डीच्या रेशन दुकानदारांना 50 लाखांचा गंडा; आनंदाचा शिधा योजनेचे पैसे कोणी पळविले?
Pathardi Fraud
Pathardi FraudSarkarnama
Published on
Updated on

Anandacha Shidha : राज्य सरकारच्या आनंदाचा शिधा वितरणाची रक्कम देऊन देखील पैसे भरण्याचा आदेश पाथर्डीतील रेशन दुकानदारांना आला आहे. पुरवठा विभागातील एका अधिकाऱ्यांच्या सूचनेनुसार एका तरुणाकडे पैसे दिल्याचा दावा या रेशन दुकानदारांनी केला आहे. परंतु हे पैसे पुढे भरले गेले नसल्याचे समोर आल्याने या पैशावर कोणी हात मारला? असा प्रश्न निर्माण झाला आहे. दरम्यान, कोषागारात रक्कम भरली गेली नसल्याने महसूल विभागाने पाथर्डीतील रेशन दुकानदारांना ही रक्कम भरण्याचा आदेश केल्याने खळबळ उडाली आहे.

पाथर्डीतील तालुक्यात एकूण 164 रेशन दुकानदार आहेत. दीपावली, पाडवा आणि गणपती उत्सव काळात या रेशन दुकानदारांना पुरवठा शाखेने आनंदाच्या शिध्याचे वाटप केले. तीन टप्य्यात दिलेल्या या शिध्याची रक्कम जवळपास 50 लाख रुपयांच्या आसपास होती. हा शिधा वाटप केल्यानंतर त्याची रक्कम रेशन दुकानदार सरकारच्या कोषागारात भरतात. तशी ती भरावीच लागते. मात्र दुकानदारांच्या म्हणण्यानुसार पुरवठा शाखेत गेल्या सात ते आठ वर्षांपासून कार्यरत असलेल्या एका खासगी व्यक्तीकडे ही रक्कम जमा करावी, असे तोंडी आदेश आम्हाला पुरवठा शाखेत काम करणाऱ्या एका अधिकाऱ्याने दिले होते.

त्यानुसार आम्ही शिधा विक्रीतून आलेली रक्कम या तरुणाकडे जमा केली असल्याने आम्ही आता परत पैसे भरणार नाही, असा पवित्रा दुकानदारांनी घेतला आहे. तर दुसरीकडे महसूल प्रशासनाने रेशन दुकानदारांना ही रक्कम तातडीने सरकारी खात्यात भरावी, असे तोंडी आदेश दिले आहेत.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

गेल्या दोन ते तीन दिवसांपासून या विषयावर पुरवठा शाखेत उलटसुलट चर्चा चालू आहे. आज याच विषयावर सर्व रेशन दुकानदारांनी बैठक घेत आम्ही आमचे पैसे जमा केले असल्याने हे पैसे भरणार नसल्याचा पवित्रा घेतला आहे. तर दोन दिवसांपूर्वी तहसीलदार शाम वाडकर यांनी रेशन दुकानदार संघटनेच्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा करत ज्यांच्याकडे शिध्याची थकीत बाकी आहे, ती त्यांनी जमा करावी, असा आदेश दिला आहे.

तीन टप्प्यात हा शिधा दुकानदारांना देण्यात आला असून पहिल्या टप्प्यात दिलेल्या मालाचे पैसे पूर्ण जमा झाले की नाही हे न पाहताच पुरवठा शाखेने दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्यात दुकानदारांना पुन्हा शिधा कसा दिला हे समजू शकलेले नाही. दुसरीकडे रेशन दुकानदारांनी विकलेल्या मालाचे पैसे सरकारी कोषागारात भरणे बंधनकारक असताना एका खासगी तरुणाकडे पैसे का जमा केले, असाही प्रश्न निर्माण झाला आहे. आता रेशन दुकानदार हे पैसे भरणार की नाही आणि न भरल्यास महसूल खाते काय कारवाई करणार, असा प्रश्न आहे. या संदर्भात पुरवठा अधिकारी ज्योती अकोलकर आणि पुरवठा विभागातील संबंधित अधिकारी संदीप बडे यांच्याशी संपर्क केला असता त्यांनी प्रतिसाद दिला नाही.

Pathardi Fraud
Nashik IT Raids News : जागरण गोंधळात 108 बोकडांचा बळी अन् 'इन्कम टॅक्स'चा छापा!

पुरवठा शाखेत कोणीही खाजगी व्यक्ती काम करत नाही. रेशन दुकानदारांनी परस्पर कोणाकडे पैसे दिले असेल तर त्यांनी भरणा केलेले चलन ताब्यात घ्यायला हवे होते. ज्यांच्याकडे पैसे येणे बाकी आहे, त्यांच्याशी आपण चर्चा केली असून येत्या 15 दिवसात पैसे भरू, असे आश्वासन दुकानदारांनी दिले आहे. त्यांची कोणी फसवणूक केली असल्यास त्यांनी संबंधितांवर गुन्हा दाखल करावा.

- शाम वाडकर

तहसीलदार, पाथर्डी

पुरवठा शाखेत आठ वर्षांपासून काम करणाऱ्या तरुणाकडे पैसे द्या असे पुरवठा शाखेतील अधिकाऱ्यांनी सांगितल्याने आम्ही त्यांच्याकडे पैसे दिले. मी स्वतः फोन-पेवरून दीड लाख रुपये दिले असून, त्याने जर पैसे भरले नसेल तर आमचा काय दोष आहे. हा मोठा घोटाळा असून वेळ पडल्यास गुन्हा दाखल करू.

- रवींद्र मुळे उर्फ पिनू

रेशन दुकानदार, शिराळ (ता. पाथर्डी)

Edited By : Rashmi Mane

Pathardi Fraud
Chhagan Bhujbal : मराठा आरक्षणावरून महायुतीला नडले, पण बजेटवर नरमले; भुजबळ नेमकं काय म्हणाले ?

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com