Minister Anil Patil's Mother: मुलगा मंत्री, मात्र आई करतेय एसटी बसने प्रवास!

Anil Patil's Mother Traveling by ST Bus: अंमळनेरचे अनिल पाटील यांनी रविवारी मंत्रीपदाची शपथ घेतली.
Minister Anil Patil`s Mother Pushpabai Patil
Minister Anil Patil`s Mother Pushpabai PatilSarkarnama

Amalner News : अनेकदा साधेपणा, सवयीचा भाग अथवा विविध कारणाने व्यक्तीची ओळख होत असते. अंमळनेरचे आमदार अनिल पाटील यांच्या मातोश्री त्यापैकीच एक आहेत. मुलाने मंत्रीपदाची शपथ घेतली तरीही त्या `एसटी`ने प्रवास करतात आणि शेतीची देखभाल देखील करतात. मुलाने मंत्रीपदाची शपथ घेतल्यावर देखील त्यांनी बसने प्रवास केल्याने त्या चर्चेचा विषय ठरल्या आहेत. (Amalner`s Minister Anil Patil`s Mother frequintly travels by BUS)

अंमळनेर (Jalgaon) येथील राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) आमदार अनिल पाटील (Anil Patil) यांनी रविवारी मंत्रीपदाची शपथ घेतली. त्यामुळे मतदारसंघात त्याची चर्चा होती. यावेळी आणखी एक बातमीचा विषय बनला, तो म्हणजे त्यांच्या मातोश्री पुष्पाबाई पाटील यांचा एसटी बस (ST) प्रवास.

Minister Anil Patil`s Mother Pushpabai Patil
NCP Crisis And Eknath Shinde : राष्ट्रवादीनंतर आता काँग्रेसचा नंबर? मुख्यमंत्र्यांनी स्पष्टच सांगितलं; म्हणाले, "आता आम्ही..."

अमळनेर (जि. जळगाव) रविवारी अनिल पाटील यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. मात्र, त्यांच्या मातोश्री पुष्पाबाई पाटील यांनी आपला साधेपणा सोडला नाही. एसटी बसने त्या सोमवारी सकाळी अमळनेरहून हिंगोणे (ता. अमळनेर) या गावी त्या आपल्या शेतात पोहोचल्या. आधीपासूनचा त्या साधेपणाने जीवन व्यतीत करतात. मुलाला पद मिळाल्यानंतरही त्यात बदल झालेला नाही.

अनिल पाटील यांचे वडील सार्वजनिक बांधकाम विभागात कार्यकारी अभियंता होते. तेव्हाही घरात चारा आणि आज चार चारचाकी आहे. मात्र अनिल पाटील यांच्या मातोश्री पुष्पाबाई पाटील ह्या नियमितपणे आपल्या मूळ हिंगोणे गावी शेती करायला जातात. हे अंतर पंचवीस किलोमीटर आहे. विशेष म्हणजे त्या नेहमी साध्या एसटी बसने जा ये करतात.

Minister Anil Patil`s Mother Pushpabai Patil
NCP Crisis Nashik : शरद पवारांचे सर्व ६ आमदार गेले अजित पवारांबरोबर!

पाटील यांच्या परिवारातील सदस्य सोमवारी मुंबईला रवाना झाले. पुष्पाबाईंनी मात्र सकाळीच बसस्थानकात जाऊन एसटीने हिंगोणे गाठले, मंत्री अनिल पाटील यांच्या आई आपल्यासोबत बसने प्रवास करत आहेत, म्हणून वाहक मनोज पाटील यांनी साधेपणाचा हा क्षण आपल्या मोबाइलमध्ये टिपला. मुलगा मंत्री असूनही त्या बसने प्रवास करतात. माझ्या बसने अशा प्रवासी जा ये करतात याचे मला नेहेमीच कौतुक आहे, असी वाहक मनोज पाटील म्हणाले.

मुलगा मंत्री झाल्याने पुष्पाबाईनी हिंगोण्यातील ग्रामदेवतेला पेढे अर्पण केले. त्या शेतकरी आहेत. आपल्या मुलाने लोकांची सेवा करावी आणि त्यांच्या अपेक्षा पुर्ण कराव्यात, अशी प्रतिक्रीया त्यांनी व्यक्त केली. त्यांच्या दुसऱ्या मुलाची पत्नी अर्थात त्यांची सून ही देखील गावची सरपंच आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
sarkarnama.esakal.com