
NCP News Nashik : जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे सहा आमदार आहेत. हे सर्व सहा आमदार अजित पवार यांच्या बंडात सहभागी होत त्यांच्या गटात दाखल झाले आहेत. त्यामुळे शरद पवार यांच्या बाजूने एकही आमदार राहिलेला नाही. त्यामुळे आगामी निवडणुकीत नव्या व आश्वासक चेहऱ्यांना संधी मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. (Nashik`s all six MLA joins Ajit Pawar group in Nashik)
राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये (NCP) दोन दिवसांपूर्वी बंड झाले. अजित पवार (Ajit Pawar) यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांनी एकनाथ शिंदे- भाजप (BJP) सरकारला पाठींबा दिला. त्यानंतर आता सर्व स्पष्ट झाले असून राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व सहा आमदार अजित पवार यांच्याबरोबर गेले आहेत.
जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे छगन भुजबळ (येवला), नरहरी झिरवाळ (दिंडोरी), नितीन पवार (कळवण), दिलीप बनकर (निफाड), माणिकराव कोकाटे (सिन्नर) आणि सरोज अहिरे (देवळाली) हे सहा आमदार आहेत. या आमदारांनी आता अजित पवार यांच्याबरोबर असल्याचे जाहीर केले आहे. कालही आम्ही अजित पवार यांच्यासोबतच होतो. या सर्व आमदारांनी नेहेमीप्रमाणे `मतदारसंघाच्या विकासासाठी अजित पवार आणि भाजप सरकारबरोबर गेलो` हे गुळगुळीत विधान केले आहे.
शरद पवार यांचे नाशिक जिल्ह्याशी राजकीय, कृषी, सहकार तसेच विविध विषयांच्या अनुषंगाने ऋणानुबंध आहेत. विविध क्षेत्रातील नागरिकांशी त्यांचे संबंध आहेत. विधानसभेच्या २०१९ मधील जागावाटपात जिल्ह्यातील १५ पैकी ९ जागा त्यांच्या पक्षाने लढविल्या होत्या. त्यात सहा जागांवर विजय मिळाला. यामध्ये सिन्नरला निसटता विजय होता. मात्र त्यांची लढत प्रामुख्याने शिवसेना आणि भाजपशी होती.
आता राष्ट्रवादी काँग्रेसचे नितीन पवार वगळता उर्वरीत पाच आमदारांची लढत प्रामुख्याने भाजप व शिवसेना (एकनाथ शिंदे गट) आमदारांशीच होणार आहे. त्यामुळे आज राष्ट्रवादी काँग्रेसच्या मंत्रीमंडळातील प्रवेशामुळे जी स्थिती एकनाथ शिंदे यांची झाली, तशीची काहीशी राजकीय कोंडी आणि गोंधळ राज्य सरकारला पाठींबा दिलेल्या आमदारांचा येत्या निवडणुकीत होण्याची शक्यता आहे. त्यामुळे यातील काही आमदारांनी बंडात भाग घेऊन स्वतःच्या पायावर धोंडा पाडून घेतल्याची प्रतिक्रीया व्यक्त होत आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.