Anil Patil : 'काँग्रेसला उद्धव ठाकरे, शरद पवार धोका देणार', राज्यातील बड्या नेत्याचा खळबळजनक दावा

Anil Patil Congress NCP : काँग्रेस नेत्यांना उद्धव ठाकरे, शरद पवार त्यांना सोडून जातील, अशी भीती सतावत असल्याचा दावा देखील मंत्री अनिल पाटील यांनी केला आहे.
Anil Patil
Anil Patil Anil Patil
Published on
Updated on

सागर निकवाडे

Anil Patil News : सध्या काँग्रेस पक्षामध्ये दहा जण मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीत असल्याने त्यांना 288 जागा लढवल्या खेरीज पर्याय नाही. शिवसेनेचा मुखवटा पुढे करुन काँग्रेसमध्ये खलबत्ते सुरु आहेत. राज्यात शिवसेना ठाकरे गट आणि राष्ट्रवादी शरद पवार गट हे कधीही काँग्रेसला धोका देऊ शकतो, असे माझे मत काँग्रेस पक्षातील काही नेत्यांशी चर्चेनंतर झाले असल्याचे राष्ट्रवादीचे नेते (अजित पवार गट), राज्याचे मदत व पुर्नवसन मंत्री अनिल पाटील म्हणाले आहेत.

काँग्रेस नेत्यांना उद्धव ठाकरे, शरद पवार त्यांना सोडून जातील, अशी भीती सतावत असल्याचा दावा देखील मंत्री अनिल पाटील यांनी केला आहे.

विधान परिषदेच्या निवडणूकीसाठी राष्ट्रवादीकडे संख्याबळ असून आमचे दोन्हीही उमेदवार जिंकतील. महायूतीकडे पूर्ण संख्याबळ आहे. त्यामुळे महाविकास आघाडीनेच आपल्याकडे संख्याबळ आहे की नाही ते तपासावे. पैशाच्या भरवश्यावर महाविकास आघाडीने जास्तीचा उमेदवार उभा केला असल्याचा टोला देखील मंत्री अनिल पाटील यांनी लगावला आहे.

Anil Patil
Video Maratha Reservation : 'मुख्यमंत्री शिंदेंनी घरातूनच विठ्ठलाची शासकीय पूजा करावी', मराठा क्रांती मोर्चाचा इशारा

आरक्षणासाठी सरकार सकारात्मक

'सगेसोयरे'बाबत सरकार सकारात्मक असून मराठा समाजाला आरक्षण ही दिले गेले आहे. कुठल्याही गोष्ट अंमलात आणण्यासाठी शासनाला काही कालावधी लागतो. राज्यात मराठा आणि ओबीसी दोघांना न्याय दिला पाहीजे , यासाठी मुख्यमंत्री प्रयत्न करत आहे. मात्र, मनोज जरांगे-पाटील यांनी सुरु केलेला दौरा हा त्यांचा प्रश्न असून त्यांनी काय करावे हे शासन ठरवू शकत नाही. महाराष्ट्रात 288 उमेदवार उभे करावे की नाही हा मनोज जरांगे पाटील यांचा प्रश्न आहे, पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना अनिल पाटील म्हणाले.

लाडकी बहिणी योजनेचा लाभ मिळणार

विधानसभेमध्ये लाडकी बहिण योजनेला 31 ऑगस्ट पर्यत मुदत देण्यात आली आहे. ही निरंतर चालणारी योजना आहे. 31 ऑगस्टपर्यंत जरी कागदपत्रांची पुर्तता करता आली नाही त्यानंतर कधीही अर्ज भरला तरी अनुदान दिले जाईल. कोणत्याही महिलेचे नुकसान होणार नाही. त्या अनुदानापासून वंचित राहणार नाही. याची काळजी हे सरकार करेल.

(Edited By Roshan More)

Anil Patil
Rahul Patil : साहेबांच्या माघारी आता 'राहुल'ची जबाबदारी; पी. एन. पाटलांचे चिरंजीव लागले कामाला ?

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com