

Jalgaon politics : विधानसभेच्या निवडणुकीत झालेल्या दारूण पराभवानंतर जिल्ह्यातील माजी मंत्री गुलाबराव देवकर, डॉ. सतीश पाटील, माजी आमदार कैलास पाटील, दिलीप सोनवणे यांच्यासह बऱ्याच दिग्गज नेते व पदाधिकाऱ्यांनी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाला सोडचिठ्ठी देत अजित पवारांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादीत प्रवेश केला. मात्र त्यावेळी अजित पवारांचे खंदे समर्थक अमळनेरचे माजी आमदार कृषिभूषण साहेबराव पाटील यांनी तटस्थ भूमिका घेतली होती.
मात्र आता आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जवळ आल्याच्या पार्श्वभूमीवर त्यांनी मी कुठेच गेलेलो नाही. एकच वादा अजितदादा अशी भूमिका स्पष्ट केली आहे. एकच वादा अजितदादा करून पाच वर्षे राष्ट्रवादीत राहिलो, आताही राष्ट्रवादीतच आहे असे त्यांनी स्पष्ट केले.
स्थानिक निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर बुधवारी राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) आणि अमळनेर तालुका शहर विकास आघाडीचा बूथ मेळावा पार पडला. या मेळाव्यात राष्ट्रवादीचे आमदार अनिल पाटील यांच्यासह माजी आमदार साहेबराव पाटील यांनीही हजेरी लावली. यावेळी अनिल पाटील यांच्या शेजारीच ते बसले होते. विशेष म्हणजे त्यांच्या गळ्यात अजित पवार यांच्या राष्ट्रवादी पक्षाचा गमछा होता.
या कार्यक्रमात बोलताना अनिल पाटील यांनी तुफान फटकेबाजी केली. मला आणि साहेबराव पाटील यांना वेगळे करण्याचा अनेकांनी प्रयत्न केला. आता निवडणुकीवेळी आम्ही एकत्र आलो, की काहींना घाम फुटतो. या वेळी माझे नंदुरबारकडे विशेष लक्ष राहणार आहे. मी अपघाताने नव्हे, तर जनतेच्या विश्वासाने ३० वर्षांपासून राजकारणात आहे. काही जण पाच वर्षे अपघाताने आमदार झाले आणि ते स्वतःला नेते समजू लागले, असा टोला त्यांनी माजी आमदार शिरीष चौधरी यांना लगावला.
दरम्यान यावेळी बोलताना माजी आमदार कृषीभूषण साहेबराव पाटील म्हणाले, की अमळनेरची जनता उदार आहे. मी अपक्ष निवडून आलो आणि माझ्या पत्नीला नगराध्यक्षा बनविले. अनिल पाटलांना राष्ट्रवादीत आणण्यासाठी मीच प्रयत्न केले. आम्ही दोघे एकत्र आलो, तर अमळनेरमध्ये बिनविरोध निवडणूक होणे अशक्य नाही.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.