Nashik Constituency 2024 : निलेश लंके प्रकरणाने नाशिकची शिवसेना सावध, स्ट्राँगरूम विषयी केली 'ही' सूचना !

Sudhakar Badgujar Politics : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नेत्यांनी निवडणूक आयोगाच्या कर्मचाऱ्यांवर दाखविला अविश्वास.
Sudhakar Badgujar politics
Sudhakar Badgujar politicsSarkarnama

Rajabhau Waje news : लोकसभा निवडणूक मतदान 20 मे ला झाले. सध्या सर्व मतदान यंत्रे अंबड येथील स्ट्रॉंग रूम मध्ये ठेवण्यात आली आहेत. या स्ट्रॉंग रूमला पोलिसांचा बंदोबस्त आहे. मात्र त्याबाबत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते साशंक आहेत.

नगर दक्षिण मतदार संघाच्या मतदान यंत्रांच्या स्ट्रॉंग रूममध्ये संशयास्पद कर्मचाऱ्यांच्या हालचाली टिपण्यात आले आहेत. या कर्मचाऱ्यासंदर्भात कोणतीही माहिती उपलब्ध होऊ शकली नाही. मात्र सीसीटीव्ही फुटेज मध्ये ती व्यक्ती आढळलेली आहे. त्यामुळे मतदान यंत्रांच्या सुरक्षिततेबाबत महाविकास आघाडीचे उमेदवार निलेश लंके यांनी शंका व्यक्त केली होती. तशी तक्रार देखील जिल्हा निवडणूक अधिकाऱ्याला देण्यात आली आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Sudhakar Badgujar politics
Nashik Loksabha Election : 'नाशिककर, व्होट कर', पण...बचत गटांकडून कोणाला कर?

त्यापासून बोध घेत नाशिकच्या (Nashik) शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्यांनी देखील सावध भूमिका घेतली. मतदान यंत्र ठेवलेल्या स्ट्राँग रूममध्ये निवडणूक आयोगाच्या कर्मचाऱ्यांकडूनच फेरफार होण्याची भीती यावेळी व्यक्त करण्यात आली. निवडणूक आयोगाचे कर्मचारी स्ट्राँग रूम मध्ये सातत्याने जा ये करत असतात. हा अतिशय संवेदनशील विषय आहे. त्यामुळे विश्वासहार्यतेचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्याची दखल घेऊन उमेदवारांचे प्रतिनिधी सोबत असल्याशिवाय कोणत्याही कर्मचाऱ्याला स्ट्राँग रूममध्ये प्रवेश देण्यात येऊ नये, अशी मागणी करण्यात आली.

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार राजाभाऊ वाजे यांनी जिल्हा निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना याबाबतचे लिखित पत्र दिले. या पत्रामध्ये विविध सूचना करण्यात आल्या आहेत. स्ट्राँग रूमला असलेल्या बंदोबस्तात अन्य कोणालाही हस्तक्षेप करू देऊ नये, अशी सूचनाही करण्यात आली. यासंदर्भात जिल्हाधिकारी (Collector) जलज शर्मा यांनी तातडीने योग्य त्या उपाययोजना करण्यात येतील, असे सांगितले. अशाच आशयाचे पत्र केंद्रीय निवडणूक आयोगाला देखील देण्यात यावे असे जिल्हाधिकारी शर्मा यांनी शिष्टमंडळाला सुचविले.

Sudhakar Badgujar politics
Nilesh Lanke V/S Sujay Vikhe : धनशक्ती की, जनशक्ती, विखे की, लंके; विजयाचा गुलाल कोणाचा? चर्चांना उधाण...

या संदर्भात पक्षाचे जिल्हाप्रमुख सुधाकर बडगुजर, शहर प्रमुख विलास शिंदे, दत्ता गायकवाड, माजी आमदार वसंत गीते, माजी महापौर विनायक पांडे, माजी आमदार योगेश घोलप यांसह विविध पदाधिकारी यावेळी उपस्थित होते. त्यांनी मतदान यंत्र असलेल्या अंबड येथील फूड कॉर्पोरेशन ऑफ इंडियाच्या गोदामातील सुरक्षेबाबत विविध मुद्दे उपस्थित केले.

(Edited by : Chaitanya Machale)

Sudhakar Badgujar politics
Pune Hit and Run Case : 'जनरेटा' वाढला की पोलिस आणि सरकारही 'सरळ' होतात, पण...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com