Ahilyanagar Anti Corruption Bureau : तिघांचं लाच घेण्याचं नियोजन, अडकले कारवाईच्या सापळ्यात; दोघांना अटक, तिसरा धाप लागेपर्यंत पळत सुटला!

Ahilyanagar ACB Catches Three Parner Panchayat Samiti Officials Accepting Bribe : पारनेर पंचायत समितीमधील तिघा अधिकारी-कर्मचाऱ्यांना लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंध विभागाच्या अहिल्यानगर पथकाने मोठी कारवाई केली.
Ahilyanagar Anti Corruption Bureau
Ahilyanagar Anti Corruption BureauSarkarnama
Published on
Updated on

Parner Panchayat Samiti bribery case : देयक मंजूर करण्यासाठी अधिकाऱ्याने दोन कर्मचाऱ्यांमार्फत लाच स्वीकारल्याचा प्रकारानं खळबळ उडाली. पारनेर नगरपंचायत समितीच्या तिघा अधिकारी-कर्मचाऱ्यांविरोधात ही कारवाई झाली.

यातील दोघांना अटक करण्यात आली असून, तिसरा कारवाई दरम्यान पसार झाला. लाचलुचपत प्रतिबंध विभागाच्या (ACB) अहिल्यानगरमधील पथकाने पोलिस उपअधीक्षक अजित त्रिपुटे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई केली.

राज्य सरकारने गाव पातळीवरील शेतीकडे जाणारे रस्ते विकासासाठी 'मातोश्री ग्राम समृद्धी पाणंद रस्ते योजना' सुरू केली आहे. या योजनेसाठी मोठी तरतूद केली आहे. अहिल्यानगर जिल्ह्यात ही योजना मोठ्या प्रमाणात राबवली जात आहे. या कामाचे देयक मंजूर करण्यासाठी 65 हजार 600 रुपयांची लाच घेत असताना पारनेर पंचायत समितीच्या तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पारनेर (Parner) तालुक्यातील कारेगाव ते वाघोबा रस्ता खडीकरण व मजबुतीकरणाचे एका फर्मला काम मिळाले होते. कामाचे मोजमाप होऊन बिले तयार करून ते मंज़ुरी करता पाठविण्याचे काम रोजगार हमी योजनेचे पॅनल तांत्रिक अधिकारी विलास चौधरी, तांत्रिक सहायक दिनकर मगर, पंचायत समितीचे उपअभियंता अजय जगदाळे यांच्याकडे होते.

Ahilyanagar Anti Corruption Bureau
Voter List Correction : मतदार यादीवर हरकत, मतदारांना किती आहेत अधिकार? एकगठ्ठा हरकतीसंदर्भात आयोगाचा मोठा निर्णय

यातील विलास चौधरी यांनी बिल मंजुरीसाठी पाठविण्याकरिता स्वतःसह अजय जगदाळे व इतर तिघांकरिता, असे सर्वांचे मिळून 65 हजार 600 रुपये लाचेची मागणी केली. त्यामुळे संबंधित फर्मने लाचलुचपत विभागाच्या अहिल्यानगरमधील पथकाकडे तक्रार केली. पथकाने लाच मागितल्याच्या तक्रारीची 18 नोव्हेंबरला पंचासमक्ष पडताळणी केली. पथकाला तक्रारीत तथ्य आढळले.

Ahilyanagar Anti Corruption Bureau
Ulhasnagar politics : CM फडणवीसांनी नाव काढताच 'उल्हासनगर' चर्चेत : श्रीकांत शिंदे-ओम कलानींमुळे सरकला राजकीय केंद्रबिंदू

यानंतर लाचलुचपत विभागाच्या अहिल्यानगरमधील पथकाने पारनेर पंचायत समिती कार्यालयात सापळा लावला. विलास चौधरी यांनी स्वतः करिता, अजय जगदाळे आणि दिनकर मगर यांच्यासाठी पंचासमक्ष 65 हजार 600 रुपयांची लाच स्वीकारली. संबंधित आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई सुरू असतानाच, तिघांपैकी एक जण पसार झाला. हा असा पसार झाला की, त्याला धाप लागेपर्यंत पळत होता, अशी चर्चा होती. या कारवाईने जिल्हा परिषदेच्या वर्तूळातही खळबळ उडाली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com