Arjun Khotkar Politics: धुळे रोकड प्रकरणी आमदार अर्जुन खोतकर यांचे कानावर हात, म्हणाले, ‘हा तर बदनामीचा डाव’

Arjun Khotkar; Arjun Khotkar's counterattack, this is the opposition's plan to defame the state Government-विधिमंडळ अंदाज समितीच्या दौऱ्यात अध्यक्ष अर्जुन खोतकर यांच्या स्वीय सहाय्यकाच्या कक्षात शासकीय विश्रामगृहावर सापडली १.८४ कोटींची रोकड.
Anil-Gote-Arjun-Khotkar.jpg
Anil-Gote-Arjun-Khotkar.jpgSarkarnama
Published on
Updated on

Arjun Khotkar: विधिमंडळ अंदाज समितीचा दौरा धुळे येथे सुरू आहे. पार्श्वभूमीवर माजी आमदार अनिल गोटे यांनी विश्रामगृहावर धाड टाकली. अंदाज समितीच्या सदस्यांच्या कक्षात रोकड असल्याचा आरोप केला होता. त्यामुळे हे प्रकरण राज्यभर गाजत आहे.

शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे माजी आमदार अनिल गोटे यांनी स्टिंग ऑपरेशन केले. यामध्ये कक्ष अधिकारी किशोर पाटील यांच्या ताब्यात असलेल्या कक्ष क्रमांक एकशे दोन मध्ये १.८४ कोटी रुपये जप्त करण्यात आले होते. येथे पाच कोटी रुपये होते मात्र त्यातील काही पैसे लंपास करण्यात आले असा माजी आमदार गोटे यांचा आरोप आहे.

यामध्ये विधिमंडळ अंदाज समितीचे अध्यक्ष आणि शिवसेना एकनाथ शिंदे पक्षाचे आमदार अर्जुन खोतकर यांच्यावर थेट आरोप झाला आहे. विविध शासकीय विभागांना पैसे जमा करण्याचे टार्गेट दिले होते, असा आरोप गोटे यांनी केला. त्याला आमदार खोतकर यांनी देखील उत्तर दिले. या प्रकरणाशी आपला काहीच संबंध नाही. हा विरोधी पक्षांचा राज्य सरकार आणि विधिमंडळ अंदाज समितीची बदनामी करण्याचा डाव असल्याचा पलटवार, खोतकर यांनी केला आहे.

Anil-Gote-Arjun-Khotkar.jpg
Dhule Cash Controversy : धुळे कॅश प्रकरणातील रक्कम लंपास केली, अनिल गोटेंचा गंभीर आरोप; तुकाराम मुंडेंचे नाव घेत म्हणाले...

आमदार खोतकर म्हणाले, आमची समिती नंदुरबार दौऱ्यावर होती. शुक्रवारी धुळे जिल्ह्याचा दौरा आहे. आम्ही कोणीही विश्रामगृहावर गेलेलो नाही. ज्या खोलीत पैसे सापडले त्याच्या शेजारच्या खोलीत माझा स्वीय सहाय्यक रहात होता. त्यामुळे याबाबत होणारे आरोप निराधार असून आपल्या याच्याशी काहीही संबंध नाही.

Anil-Gote-Arjun-Khotkar.jpg
Chhagan Bhujbal Politics: पालकमंत्री विषय निघताच, मिश्किल भुजबळ म्हणाले, ‘मी तर नाशिकचा बालक, पालक कशाला हवा’

माजी आमदार गोटे यांना आरोप करण्याची जुनी सवय आहे. राज्य सरकार आणि विधिमंडळ अंदाज समितीला बदनाम करण्याचा त्यांचा डाव आहे, हे लपून राहिलेले नाही. यासंदर्भात मुख्यमंत्र्यांनी एसआयटी स्थापन करण्याची घोषणा केली आहे. चौकशीत दूध का दूध आणि पाणी का पाणी होईल.

दरम्यान गेले दोन दिवस शहरात धुळे येथील वादग्रस्त रक्कम आणि आरोप प्रत्यारोप सुरू आहेत. या पार्श्वभूमीवर विधिमंडळ अंदाज समितीची आज धुळे जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक होत आहे. या समितीत ३८ सदस्य आहेत. यातील बहुतांशी सदस्यांनी या दौऱ्याला दांडी मारली. तो देखील चर्चेचा विषय ठरला आहे.

-------

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com