Arvind Sawant Politics: अनेक संकटे, दबाव, आमिष...तरीही मी शिवसेनेत! अरविंद सावंत यांनी सांगितले कारण...

Arvind Sawant; No matter how many challenges come, I will remain in Shiv Sena,That is the true motto -खासदार अरविंद सावंत यांनी मराठी युवकांसाठी शिवसेनेचा लढा विषद केला.
MP Arvind Sawant
MP Arvind SawantSarkarnama
Published on
Updated on

Arvind Sawant News: शिवसेनेच्या नाशिक जिल्हा निर्धार शिबिराची सुरुवात निष्ठावंत कार्यकर्त्यांच्या मुलाखतीने झाली. आम्ही शिवसेनेत का? ही भूमिका विविध खासदारांनी विषद केली. त्यामुळे अनेकांना निष्ठेची प्रेरणा मिळाली.

शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी मी शिवसेनेत का? या चाकोरीबाहेरच्या विषयाने आज शिवसेनेच्या निर्धार शिबिराची सुरवात झाली. मुलाखत वजा मार्गदर्शन असे त्याचे स्वरूप होते. वेळी खासदार अरविंद सावंत, खासदार राजाभाऊ वाजे, माजी खासदार राजन विचारे आणि चंद्रकांत खैरे यांनी शिवसेनेत का? यावर आपली भूमिका विषद केली. विविध संकटे, दबाव आणि अमिषे असतानाही शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांमुळे मनात वेगळा विचार आला नाही, असे त्यांनी सांगितले.

MP Arvind Sawant
Aditya Thackrey Politics: आदित्य ठाकरेंचे वर्मावर बोट, ‘वक्फ’ला विरोध करणाऱ्या ‘अण्णाद्रमूक’शी भाजपची युती कशी?

यावेळी खासदार अरविंद सावंत यांनी आपण गिरणगाव आणि लालबाग चे शिवसैनिक आहोत. बाळासाहेब ठाकरे यांच्या भाषणांनी प्रेरित होऊन बालपणीच शिवसेनेचे काम सुरू केले. नववीत असताना शाळेच्या आवारात काँग्रेसची सभा होती. यावेळी शिवसेना जिंदाबादच्या घोषणा दिल्या. मुख्याध्यापकाच्या काठ्या खाव्या लागल्या होत्या, ही आठवण त्यांनी सांगितली.

MP Arvind Sawant
Sanjay Raut Video : दर्ग्यावरील कारवाईवर संजय राऊतांचा मोठा दावा, म्हणाले, 'बुलडोझर चालवायचा...'

मराठी माणसांसाठी शिवसेनेने प्रचंड खस्ता खाल्ल्या. एक संकटे जल्ली. १९६९ मध्ये ‘बीएसएनएल’च्या भरतीत सर्वच्या सर्व दक्षिणात्य उमेदवारांची निवड झाली. या विरोधात आंदोलन केले. तेव्हा 'एसआरपी' चा गराडा पडला होता. पोलीस उपयुक्तांनी अटक करून पोलिसांच्या गाडीतून नेले.

मात्र हे आंदोलन मी स्वतःसाठी नव्हे तर मराठी मुलांसाठी करीत आहे. त्यात कदाचित तुमचा कोणी जवळचा मराठी मुलगा देखील असू शकेल, असे सांगितले. त्यावर उपायुक्तांनी अर्ध्या रस्त्यात गेल्यावर पोलीस गाडीतून उतरवून दिले, ही आठवण सावंत यांनी सांगितले.

शिवसेनेच्या विविध आंदोलनाच्या आणि निवडणुकांतील तयारी आणि प्रचार दौऱ्यांच्या आठवणी त्यांनी सांगितले. किती आले किती उडाले भरारा, मात्र कधी संपणार नाही शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचा दरारा, ही काव्याची ओळ त्यांनी शिवसेना पदाधिकाऱ्यांना ऐकवली.

आयुष्यात अनेक चढउतार येतात. १९७७ मध्ये जनता पक्षाची लाट आली. शिवसेना घटली. शिवसेना भवनावर हल्ला झाला. १९९५ मध्ये राज्यात सत्ता आली. मात्र आम्ही काम करणारे शिवसेनेतच होतो. अख्खी शिवसेना इथेच आहे. निष्ठावंत कुठेही गेलेले नाहीत कुठेही जाणार नाही एक वेळ राजकारण सोडू पण आम्ही शिवसेना सोडून कुठेही जाणार नाही, असे त्यांनी निक्षून सांगितले.

------

२५ वर्षे पूर्ण करणारा ई-सकाळ आता कॉमस्कोअरमध्ये Number One डिजिटल माध्यमांच्या क्षेत्रातील नवी झेप

-----

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com