Rajabhau Waje And Hemant Godse : वाद निवळला, विरोध मावळला! एकमेकांवर तुटून पडलेल्या वाजे-गोडसेंची गळाभेट, पण...

Nashik Shiv Sena News : नाशिक शिक्षक विधान परिषदेच्या उमेदवाराच्या अर्ज भरताना खासदार राजाभाऊ वाजे आणि हेमंत गोडसे आमने-सामने येताच गळाभेट घेतली. मात्र शिवसेनेच्या दोन्ही गटाकडून यावेळी जोरदार घोषणायुद्ध रंगले.
Rajabhau Waje And Hemant Godse
Rajabhau Waje And Hemant Godsesarkarnama

Nashik News : शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फुटीनंतर लोकसभाची ही निवडणूक राज्यात वेगळ्याच पातळी झाली. 'निष्ठावान आणि गद्दार', अशी ही निवडणूक झाली. पण, राजकारणात नेत्यांचे कधी मनोमिलन होईल, याचा नेम नसतो. असंच काहीसा अनुभव राज्यात गाजलेल्या नाशिक लोकसभा मतदारसंघातील शिवसेना नेत्यांचा आला आहे. नाशिकचे नवनिर्वाचित खासदार राजाभाऊ वाजे आणि पराभूत उमेदवार हेमंत गोडसे समोरासमोर आल्यावर एकमेकांची गळाभेट घेतली. या दोन नेत्यांची 'जादू की झप्पी', रंगात आली असतानाच तिथं समोरासमोर आलेल्या शिवसेनेच्या दोन्ही गटात जोरदार घोषणाबाजी झाली.

नाशिक लोकसभा मतदारसंघात शिवसेनाविरुद्ध शिवसेना, असा 'सामना' झाला. निष्ठावानविरुद्ध गद्दार, अशी तिथे निवडणूक झाली. शिवसेना पक्षफुटीनंतर हेमंत गोडसे यांनी शिवसेना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांची साथ दिली. हेमंत गोडसे दोन वेळा तेथून खासदार झाले होते. आता त्यांची हॅटट्रिकची संधी होती.

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी नाशिक मतदारसंघात राजाभाऊ वाजे यांच्या माध्यमातून गोडसे यांच्याविरोधात आव्हान उभे केले. महायुतीच्या गोंधळामुळे हेमंत गोडसे यांचे तिकीटाची निश्चिती होत नव्हती. त्यामुळे तळ्यात-मळ्यात असलेल्या गोडसेंना तिकीटासाठी बरंच धावपळ करावी लागली. तिकीट मिळवण्यातच त्यांची अर्धी शक्ती खर्ची पडली. निवडणुकीच्या मैदानात त्यांचा पराभव झाला.

लोकसभेची निवडणूक संपताच आता विधानपरिषदेच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे. नाशिक शिक्षक विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी आज अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस आहे. महाविकास आघाडीकडून संदीप गुळवे यांना उमेदवारी दिली आहे. महायुतीत जागा वाटपाचा तिढा कायम आहे.

नाशिक शिक्षक विधानपरिषदेच्या निवडणुकीच्या निमित्ताने शिवसेनेचे दोन्ही गट समोरासमोर आले. नवनिर्वाचित खासदार राजाभाऊ वाजे आणि पराभूत उमेदवार हेमंत गोडसे यावेळी लोकसभेच्या निवडणुकीनंतर आमनेसामने आले. अचानक समोरासमोर आल्यानंतर वाजे आणि गोडसे यांनी एकमेकांनी गळाभेट घेतली. यावेळी मंत्री दादा भुसे देखील उपस्थित होते.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Rajabhau Waje And Hemant Godse
Nashik Politics : नाशिकमध्ये हायव्होल्टेज ड्रामा; आमदार किशोर दराडेंची किशोर दराडेंनाच मारहाण, शिवीगाळ

वाजे आणि गोडसे यांची गळाभेट सुरू असतानाच त्यांच्याबरोबर असलेल्या शिवसैनिकांचे घोषणायुद्ध रंगले होते. दोन्ही बाजूचे कार्यकर्त्यांकडून घोषणांचा पाऊस पाडला गेला. त्यामुळे कार्यालयात काहीसे तणाव पसरला होता. तिथे बंदोबस्तावर असलेल्या पोलिसांनी पुढे होत, या घोषणा युद्धाला विराम दिला. यानिमित्ताने 'नेत्यांचे मनोमिलन होऊ शकते, पण कार्यकर्त्यांचे नाही', असाच हा प्रत्यय आला.

Rajabhau Waje And Hemant Godse
Hemant Godse On Chhagan Bhujbal: पराभव गोडसेंचा, खापर भुजबळांवर? म्हणाले, निवडणुकीत माझं कामं कोणी केलं नाही ते...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com