Ashok Chavan Resignation : परदेश दौऱ्यावर असताना काँग्रेस सोडण्याच्या चर्चा; आमदार हिरामण खोसकरांची भूमिका जाहीर

Hiraman Khoskar : माजी मुख्यमंत्री चव्हाण यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. त्यानंतर त्यांच्यासोबत काही आमदार जातील, अशा चर्चा होत आहेत.
Hiraman Khoskar
Hiraman Khoskarsarkarnama
Published on
Updated on

Nashik News : माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी काँग्रेस प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा देत भाजपमध्ये प्रवेश केला आहे. चव्हाण यांच्या सोबत आणखी 12 ते 13 आमदार काँग्रेस सोडणार असल्याची चर्चा आहे. या चर्चांमध्ये इगतपुरीचे आमदार हिरामण खोसकर हे देखील चव्हाण यांच्यासोबत भाजपमध्ये जाणार असल्याच्या चर्चा होत्या. या संदर्भात आमदार खोसकर यांनी आपली भूमिका जाहीर केली आहे. (Ashok Chavan Resignation)

Hiraman Khoskar
Uddhav Thackeray : "विखेंच्या वडिलांना बाळासाहेबांनी पहिल्यांदा मंत्री केलं, पण...", ठाकरेंनी सगळंच काढलं

'अशोक चव्हाण (Ashok Chavan) पक्षाचे नेते होते. त्यांचे काय विषय असतील ते त्यांनाच माहीत. मी मात्र एक आमदार आहे. काँग्रेस पक्षाचा आमदार असून कार्यकर्ते आणि काँग्रेस पक्षाच्या बरोबरच राहणार आहे. अन्य कुठेही जाण्याचा आपला विचार नाही, या संदर्भात आलेल्या बातम्या या केवळ अफवा होत्या.' असे आमदार हिरामण खोसकर (Hiraman Khoskar) यांनी स्पष्ट केले.

माजी मुख्यमंत्री चव्हाण यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. त्यानंतर त्यांच्यासोबत काही आमदार जातील, अशा बातम्या येत आहेत. त्यात खोसकर यांचे देखील नाव होते. मात्र खोसकर 5 फेब्रुवारीपासून राज्यातील आदिवासी आमदारांसोबत केनियाच्या दौऱ्यावर होते. आज ( बुधवारी) त्यांचे पहाटे मुंबईत आगमन झाले. यावेळी त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केले.

खोसकर इगतपुरी मतदारसंघाचे (नाशिक) आमदार आहेत. ते पक्ष सोडणार या चर्चेमुळे कार्यकर्ते अस्वस्थत होते. याबाबत अनेक कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांनी त्यांच्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र परदेशात असल्याने त्यांच्याशी संपर्क होत नव्हता. बहुतांशी पदाधिकाऱ्यांनी आमदार खोसकर पक्षातच राहतील, असा विश्वास व्यक्त केला होता. त्या अनुषंगाने आज खोसकर यांनी काँग्रेससोबतच आहोत, हे स्पष्ट केल्याने मतदारसंघातील कार्यकर्त्यांना दिलासा मिळाला आहे.

(Edited By Roshan More)

Hiraman Khoskar
Loksabha Election 2024 : संजयकाका Vs सुरेश खाडे Vs पृथ्वीराज देशमुख; सांगली भाजपमधील अंतर्गत वाद उफाळला

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com