Ashok Kharat Case : खरातच्या कार्यालयात सापडले महिलेच्या नावाचे चेक अन् 35 रिंग मेजरमेंट ; तपासाला नवे वळण

Ashok Kharat Case, Nashik SIT : अशोक खरातला सातव्या गुन्ह्यात दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. एक गुन्हा संपला की लगेच दुसऱ्या गुन्ह्यात त्याला एसआयटीकडून आपल्या ताब्यात घेतले जात आहे.
Ashok Kharat
Ashok Kharat Nashik Office RaidSarkarnama
Published on
Updated on

Ashok Kharat Case : भोंदू अशोक खरातच्या नाशिकमधील कॅनडा कॉर्नर परिसरात असलेल्या ओकस प्रॉपर्टी या कार्यालयात झाडाझडती दरम्यान, SIT ला एका महिलेच्या नावाचा धनादेश (Cheque) व अंगठीचे माप घेण्यासाठीचे 13.0 ते 14.2 साइजचे 35 गोलाकार रिंग मेजरमेंटही (Ring Measurement) सापडले. त्यामुळे याप्रकरणात आता तपासाला नवे वळण मिळाले आहे.

अशोक खरातच्या कार्यालयाची झडती घेतली असता पथकाच्या हाती ‘हिराबाई सुदाम मुळाणे’ या नावाचे धनादेश (Cheque) हाती लागले आहेत. त्यामुळे संबधित महिला पीडिता आहे की, खरातच्या गुन्ह्यात या महिलेचा सहभाग आहे, याचा शोध SIT चे पथक घेत आहे. पथकाने धनादेश जप्त केला असून या महिलेचा शोध सुरु आहे. या चेकमुळे आर्थिक गैरव्यवहाराचे धागेदोरेही समोर येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

तर, खरातच्या कार्यालयात सापडलेल्या 35 गोलाकार रिंग मेजरमेंटचा वापर खरात नेमका कशासाठी करीत होता, याचा तपास केला जात आहे. अनेकांना त्याने खड्ड्यांच्या अंगठ्या दिल्या आहेत. त्यावेळी पीडितांच्या बोटांची मापे घेण्यासाठी त्याने या मेजरमेंटचा वापर केला असावा, अशी शक्यता असून त्या दिशेने एसआयटीचे पथक तपास करीत आहे.

Ashok Kharat
Ashok Kharat Case : कुकच्या रुपाने फार्महाउसवर पाठवला गुप्तहेर; सीए ललित पोफळेंचा मास्टरप्लॅन, खरातच्या कुकर्मांचा पेटारा खुला...

दरम्यान महिलांचे लैंगिक अत्याचार व फसवणूक प्रकरणी भोंदू अशोक खरात यास एसआयटीने सातव्या गुन्ह्यात अटक केली आहे. त्याला न्यायालयाने बुधवार (दि. २९)पर्यंत पोलिस कोठडी सुनावली. गेल्या ४१ दिवसांपासून अशोक खरातचा प्रवास पोलीस कोठडी ते नाशिकरोड मध्यवर्ती कारागृह असा सुरू आहे. एक गुन्हा संपला की लगेच दुसऱ्या गुन्ह्यात त्याला एसआयटीकडून आपल्या ताब्यात घेतले जात आहे. १८ मार्चला खरातला पहिल्या गुन्ह्यात एसआयटीने ताब्यात घेतलं होतं. लैगिंक अत्याचाराचे व फसवणुकीचे १८ गुन्हे खरातवर दाखल असून यातील ९ गुन्ह्यांचा तपास एसआयटी करत आहे.

Ashok Kharat
Ashok Kharat Case: अशोक खरात प्रकरणात चाकणकरानंतर दुसरी विकेट पडली; 15000 पतसंस्थांचं जाळं असलेल्या फेडरेशनच्या अध्यक्षपदाचा नेत्यानं दिला राजीनामा

गजनी ट्रीक

दरम्यान खरात SIT ला तपासात पाहिजे तसे सहकार्य करत नसल्याची माहिती आहे. खरात ‘माहीत नाही, लक्षात नाही, विसरलो...’ अशी काही उत्तरे देत असल्याचे समजते. तपास अधिकाऱ्यांनी विचारलेल्या प्रश्नांना टाळण्यासाठी खरात गजनी ट्रीक वापरत असल्याची चर्चा आहे. तो विसरण्याचे नाटक करीत असल्याचे बोलले जात आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com