Navy officer Crime : राजकारण्यांचे भविष्य सांगणारा 'हायप्रोफाईल ज्योतिषाला' बलात्कार प्रकरणी बेड्या; 58 आक्षेपार्ह व्हिडिओ जप्त; मर्चंट नेव्हीच्या माजी अधिकाऱ्याचा काळा कारनामा

58 objectionable videos seized astrologer Rape case: मर्चंट नेव्हीच्या माजी अधिकाऱ्याला, जो हायप्रोफाईल ज्योतिष म्हणून ओळखला जात होता, बलात्कार प्रकरणी अटक. पोलिसांनी 58 आक्षेपार्ह व्हिडिओ जप्त केले.
Ashok Kharat former Merchant Navy officer crime case
Ashok Kharat former Merchant Navy officer crime caseSarkarnama
Published on
Updated on

High-Profile Astrologer Arrested in Rape Case: नाशिकमध्ये एक धक्कादायक प्रकरण समोर आले असून, मर्चंट नेव्हीचा माजी अधिकारी आणि ज्योतिषाच्या नावाखाली प्रसिद्ध झालेल्या अशोक खरात उर्फ स्वघोषित ‘कॅप्टन’ याला पोलिसांनी बलात्काराच्या आरोपाखाली अटक केली आहे. आज त्याला नाशिक जिल्हा न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. या घटनेमुळे शहरात मोठी खळबळ उडाली आहे.

पीडित महिलेने दिलेल्या तक्रारीनुसार, अशोक खरात लोकांचे भविष्य सांगण्याच्या बहाण्याने त्यांच्याशी जवळीक साधत होता. स्वतःकडे दैवी शक्ती असल्याचा दावा करून तो मंत्र-तंत्र आणि धार्मिक विधींच्या नावाखाली लोकांचा विश्वास जिंकत असे.

त्यानंतर त्याने एका महिलेला आपल्या कार्यालयात बोलावून तिला गुंगीकारक पदार्थ दिला आणि तिच्यावर अत्याचार केल्याचा आरोप आहे. हा प्रकार 2022 पासून डिसेंबर 2025 पर्यंत सुरू असल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.

Ashok Kharat former Merchant Navy officer crime case
Vadgaon Pan Protest : पोलिसांची 10 पथकं अलर्टवर; अ‍ॅसिड हल्ल्यात 18 तासांनंतरही हल्लेखोरांचा मागमूस नाही, संतप्त मुली रस्त्यावर...

या प्रकरणात पोलिसांनी सखोल चौकशी केली असता अशोक खरातकडून तब्बल 58 आक्षेपार्ह व्हिडिओ जप्त करण्यात आले आहेत. या व्हिडिओंमध्ये काही नामांकित महिला आणि सेलिब्रिटींचा समावेश असल्याची माहिती समोर येत असून, त्यांची सत्यता तपासली जात आहे. त्यामुळे या प्रकरणाचे गांभीर्य अधिक वाढले आहे.

अंधश्रद्धा निर्मूलन समितीने या घटनेची दखल घेत आरोपीवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. तसेच अशोक खरातचे अनेक राजकीय नेते, अधिकारी आणि प्रसिद्ध व्यक्तींशी संबंध असल्याचाही मुद्दा पुढे आला आहे.

दरम्यान, सिन्नर तालुक्यातील मिरगाव येथे त्याने स्थापन केलेल्या धार्मिक संस्थेमुळे तो चर्चेत आला होता. या संस्थेशी संबंधित काही मोठी नावेही समोर येत असल्याने राजकीय वर्तुळातही चर्चा रंगली आहे. पोलिस तपासात आणखी धक्कादायक माहिती समोर येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Ashok Kharat former Merchant Navy officer crime case
PM Kisan Yojana : पीएम किसानचे ₹२००० मिळाले नाहीत? घाबरू नका! या सोप्या पद्धतीने तक्रार करा अन् लगेच पैसे मिळवा

कोण आहे अशोक खरात?

अशोक खरात हा मर्चंट नेव्हीमधील निवृत्त अधिकारी असून त्याने सुमारे 22 वर्ष सेवा केली आहे. या काळात त्याने 154 देशांचा दौरा केल्याचे सांगितले जाते. त्यानंतर त्याने अंकशास्त्र आणि विश्वशास्त्राचा अभ्यास करत स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली होती. मात्र आता त्याचं खरे स्वरूप उघड झाल्याने सर्वत्र संताप व्यक्त केला जात आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com